चोर घरी यावेत असे कुणाला वाटत असेल असे नाही पण चोराना मात्र सगळ्यांकडे जावेसे वाटते. चोर कोणाच्या घरी जावे हे कसे ठरवतात हा मला नेहमी प्रश्न पडतो. एकाद्या ठिकाणी डबोल मिळणार अशी कुणकुण लागल्यावर तेथे चोरांनी जाणे हे समजू शकते म्हणजे खूप परिश्रमपूर्वक बँका किंवा सोन्याचांदीच्या दुकानावर ते धाड घालतात यात काही आश्चर्य नाही पण आमच्यासारख्या कफल्लकांवरही मेहेरनजर करून आमची दारिद्र्यरेषेतून बढती केल्याचे पुण्य त्यांना लाभले तरी त्यांच्या गाठी मात्र काहीच पडत नाही हे त्यांना कसे समजत नाही कुणास ठाऊक, कदाचित कोणे एके काळी चारुदत्तासारख्या निष्कांचन माणसाकडे दागिन्यांचे घबाड सापडल्याचा दाखला शर्विलकांनी म्ह.चोरांच्या पूर्वजानी त्यांना दिल्यामुळे असाही एकादा प्रयत्न फुरसतीच्या काळात करायला हरकत नाही हाच आमच्या घराच्या भेटीमागे त्यांचा विचार असावा.
चोर येऊन गेल्याचा एक फायदा मात्र होतो तो म्हणजे आपली बरीच प्रसिद्धी होते. ज्याना येनकेन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत् अशी इच्छा असते त्यांना हा चांगला योग असतो पण ही प्रसिद्धी फार आनंददायक असते असे काही मला वाटत नाही.कारण ती बातमी कळताच आपल्या समाचारास येणाऱ्या लोकांकडून चोर येऊ नयेत म्हणून आपण दारेखिडक्या कशी बंद करायला हवी होती हा आता उपयोगी न पडणारा सल्ला आपल्याला ऐकावा लागतो. आपण ज्या घरात रहातो त्या घराच्या रचनेतील निरनिराळ्या इतक्या चुका ते आपल्याला दाखवतात की अशा असुरक्षित घरात इतके दिवस चोरी कशी झाली नाही याचेच आपल्याला नवल वाटायला लागते. येवढेच काय पण दुर्दैवाने ते घर आपणच बांधले असले तर ते पाडून पुन्हा नव्याने बांधावे असे वाटू लागते. चोरानी जर घरातील रोकड किंवा सोन्याचे दागिने वगैरे नेले असतील तर दागिने बॅंकेत लॉकरमध्ये का ठेवले नाहीत याचा जाब द्यावा लागतो तसेच एवढी रोकड घरात ठेवू नये अशी प्रेमळ दटावणी ऐकावी लागते.आपल्या पाठीमागे मात्र एवढी रक्कम अथवा दागिने ज्याअर्थी आपण घरात ठेवले त्याअर्थी त्यांच्या प्राप्तीमागे आपली काहीतरी भानगड असावी असा अंदाज केला जातो आणि हपापाचा माल गपापा झाल्याबद्दल हे असेच होणार असा अभिप्रायही व्यक्त केला जातो. अर्थात हे सर्व आपल्यावरील प्रेमापोटीच होते हे उघडच आहे.त्यातल्या काहीजणांना जर चोरी होऊनही आपले काहीच गेले नसेल तर त्याचेच ( मनातल्यामनात) वाईट वाटते कारण यापूर्वी या लोकांचे घर काही इतर चोरांनी धुवून नेलेले असते.
काही लोक चोरांना फारच आवडतात.या लोकांनी कितीही वेळा घरे बदलली असो वा त्यांच्या घरात काही ऐवज मिळालेला असो वा नसो पण त्यांच्या घरास मधूनमधून भेट देणे हे आपले कर्तव्यच आहे असे का कोण जाणे चोरांना वाटत असते. माझी गणना अशा चोरांच्या लाडक्या लोकांत होत नसली तरी चोरांनी कधीच भेट दिली माही अशा सुदैवी लोकांतही माझी गणना होत नाही.
मला आठवते तशी आमच्या घरात पहिली चोरी मी अगदी लहान असताना झाली. म्हणजे मी फार तर तीन चार वर्षाचा असेन त्यावेळी! अर्थात मी मोठा असतो तरी चोरांना हाकलून लावण्यात मी फार मोठा हातभार लावला असता अशातला भाग नाही. त्यावेळी प्लेगच्या साथीमुळे आम्ही सर्व ग्रामस्थ गावातील घरे सोडून गावाबाहेर माळावर झोपड्या बांधून रहात होतो अशावेळी गावातली आमची घरे आयती मोकळी पडलेली असताना आमच्या झोपड्याना भेट देण्याची लहर चोरांना का आली कुणास ठाऊक ? कदाचित त्या घरात शिरलो तर आपल्यालाही प्लेगची लागण होईल अशी भीती त्यांना वाटली असावी आणि समजा आमच्याकडे काही चीजवस्तु असलीच तर ती आम्ही झोपडीतच नेली असणार असा तर्क त्यानी केला असणार आणि तशी झोपडी बांधीव घरापेक्षा फोडायला सोपी हा त्यांचा अंदाज ! पण झोपड्यातले लोक जवळजवळ असल्याने एकमेकाला जागे करतील हे त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी होण्यापूर्वीच " चोर चोर" असा आरडाओरडा झाला आणि माझे वडील आणि शेजारी पळतपळत बाहेर पडल्याचे पहाटे कानावर पडल्यामुळे मलाही जाग आली आणि चोर घरात किंवा आसपास येऊन गेले हे मला समजले.
त्यानंतर मधल्या काळात बरीच वर्षे चोरांना आमची आठवण झाली नाही.कदाचित त्याहून महत्त्वाच्या मोहिमा पार पाडण्यात ते गुंतले असावेत. पुढे आम्ही औरंगाबादला स्थायिक झालो आणि एका बंगल्याच्या औटहौसमध्ये आम्हाला भाड्याने रहायला जागा मिळाली.तेव्हां ते अगदी सुरक्षित शहर आहे असा तेथील रहिवाशांचा समज होता त्याचे एक उदाहरण म्हणजे सायकल भाड्याने घेतली तर तिला कुलुप नसायचे आणि ती चोरीला जाणार नाही अशी सायकलच्या दुकानदारास खात्री असे. त्यामुळे औटहौसच्या मालकालाही चोर औटहाउसमध्ये मुद्दाम परिश्रमपूर्वक चोरी करतील असे वाटत नसावे, किंवा त्याला तेथे रहायचे नसल्याने त्याच्या ऐवजाला काही धोका नव्हताच त्यामुळे त्या घराची रचना चोरांच्या दृष्टीने अगदी आदर्श असली तरी त्याचे त्यांना ( म्हणजे मालकांना , चोरांना नव्हे) मुळीच सोयरसुतक नव्हते. तसे पहाता त्या औटहाउसमध्ये रहाणाऱ्या आमच्यासारख्या भाडेकरूंची आर्थिक परिस्थिती खरे तर चोरीच्या दृष्टीने मुळीच आदर्श नव्हती ,पण हे चोरही शर्विलकाचे वंशज असावेत ! पण अपेक्षेप्रमाणेच बिचाऱ्याच्या हातास यश नव्हते. सताड उघड्या खिडकीच्या दारावर लटकवलेली वडिलांची काठी सहजपणे त्याच्या हाती आली.तिचा वापर करून भिंतीवरील खिळ्यास अडकवलेली माझी पँट व वडिलांचे धोतर त्याच्या हाती लागले.पँटच्या खिशाची पहाणी करून त्यात काहीच न सापडल्यामुळे बरीच भोके पडलेले धोतर व माझी पँट या बोहारणीनेही नाकारलेल्या वस्तु काठीसह अंगणात टाकून चोरान पलायन केले होते. सकाळी फिरायला जाताना वडील काठी शोधू लागल्यावर चोरांच्या या भेटीचा पत्ता आमच्याबरोबर आमच्या शेजाऱ्यानाही लागला आणि आमच्यापेक्षा चोराविषयीच जास्त हळहळ त्यांनी व्यक्त केली.
या भेटीमुळे चोरांचा आम्ही घेण्याऐवजी चोरांनीच आमच्या घराचा इतका धसका घेतला की त्यामुळे त्यानी बरेच दिवस आमचे घर टाळले. त्यानंतर अनेक वर्षानी ज्या घरात आम्ही भाडेकरू म्हणून रहात होतो त्याचे घरमालक चोरांचे फारच लाडके होते.आम्ही त्यांच्या घरात रहायला लागण्यापूर्वी त्यांच्या घरास चोरांनी बऱ्याच भेटी दिल्या होत्या पण आमचा लौकिक माहीत असल्याने यावेळी चोरांनी त्यांच्या घराऐवजी आमच्या शेजारच्या घरास भेट देऊन पाहू असा विचार केला. त्या घराची एक खिडकी आम्ही रहात असलेल्या घराच्या आमच्या भागास अगदी लागून होतीआणि अंगणाच्या जमिनीपासून इतक्या कमी उंचीवर होती की दार उघडून घरात शिरण्यापेक्षा तिचे गज कापून घरात शिरणेच चोराला अधिक सोपे वाटले.त्या खिडकीपाशीच घरातला कर्ता पुरुष झोपला होता आणि तो एवढ्या जोरात घोरत होता की चोरास ते जणु एक प्रकारे आवाहनच वाटले ,गज कापण्याच्या आवाजाने त्या थोर पुरुषाला जाग आली नाहीच पण त्याच्या कुटुंबियानाही गज कापण्याचा आवाज हाही त्याच्या घोरण्याचाच भाग वाटला असल्यास नकळे ! किंवा तो चोराच्या कौशल्याचाही भाग असेल पण दुर्दैव बिचाऱ्याचे,कारण एवढ्या कौशल्याने गज कापून तो घरात शिरायला आणि घरातले तान्हे मूल जागे होऊन रडायला लागायला एकच गाठ पडली आणि मुलाची आई जागी झाली.मुलाला थोपटून गप्प करून ती बाथरूमकडे जऊ लागली तो चोरमहाशय तिच्या नजरेस पडले. अर्धवट झोपेत असल्याने या घटनेचे गांभीर्य बिचारीच्या लक्षात न आल्याने "कोण आहे ?" एवढाच प्रश्न झोपेतल्याझोपेत तिने विचारला, चोरमहाशयानी तेवढ्यात प्रसंगावधान दाखवून " बाई, दुधाच्या बाटल्या न्यायला आलोय" असे उत्तर दिले.बाई अजून झोपेतच होत्या त्यामुळे पुन्हा त्याच अवस्थेत त्यांनी" इतक्या लवकर रे कसल्या बाटल्या ?" असे विचारले आणि एकदम लखकन् वीज चमकावी तशा त्या भानावर आल्या आणि विचारू लागल्या " पण तू आत कसा आलास?"मग मात्र आपले बिंग उघडकीस आले हे लक्षात येऊन चोराने पळत बाहेरील दरवाजा गाठला आणि तो उघडून पळ काढला.बाई मात्र खऱ्याच धीराच्या,शांतपणे दरवाजा बंद करून झोपल्या.खिडकीला पडदा असल्याने गज कापल्याचे काही त्यांच्या ध्यानात आले नाही चोरमहाशय घराबाहेर पडून आपल्या इतक्या परिश्रमावर पाणी पडल्यामुळे हळहळत चालत पुन्हा त्याच खिडकीपाशी आले.बाई काही आरडाओरडा न करता शांतपणे झोपल्यामुळे चोरास तेथून पळून जाण्याचे कारण उरले नाही.एवढी गज कापण्याची मेहनत करून आत शिरलो पण काम पूर्ण न करताच बाहेर पडलो याचा पश्चाताप त्यास होत असणार आणि त्याचबरोबर आता दुसऱ्या घरात शिरायचे म्हणजे पुन्हा पहिल्यापासून सुरवात करावी लागणार याचाही धसका त्याने घेतला असणार किंवा घराच्या दारातून बाहेर पडल्यामुळे त्या गल्लीत शिरल्यावर आपण कुठल्या घरातून बाहेर पदलो हे त्याच्या ध्यानात राहिले नाही की काय कोण जाणे पण त्यामुळे गज कापलेली खिडकी दिसताच ही आपल्यासाठी आणखी एक संधी आहे या समजुतीने तो पुन्हा त्याच खिडकीतून आत शिरू लागला पण यावेळी मात्र खिडकीजवळ झोपलेल्या गृहस्थाची झोप पुरी झाली असावी त्यामुळे चोराचा घरात प्रवेश होण्यापूर्वीच त्याना जाग येऊन त्यानी आरडाओरडा करायला सुरवात केली तेव्हा मात्र आपला प्रयत्न अर्धवट सोडणेच इष्ट हे ओळखून चोरसाहेबानी पोबारा केला.मीही खिडकीखालच्या गृहस्थासारखाच पण माझ्या घरात घोरण्यात दंग होतो त्यामुळे हा सर्व वृत्तांत आमच्या सौभाग्यवतीने एकाद्या टी.व्ही.मालिकेप्रमाणे अगदी तिच्यासमोर घडावा अशा थाटात मला निवेदन करीपर्यंत या सगळ्या महाभारताचा पत्ता मलाही नव्हता.
आजकाल चोरांच्या भयानक कृत्यांच्या बातम्या वाचल्यावर आम्हाला भेट देणारे चोर फारच प्रेमळ होते असे म्हणावे लागेल. अर्थात त्याहूनही बेरकी चोर या ना त्या पद्धतीने जवळजवळ आपल्या खिशात हात घालूनच किंवा आपण बँकेत सुरक्षित म्हणून ठेवलेल्या आपल्या पैशावर डल्ला मारतात तेव्हा ते पहात बसणे यापलिकडे आपण काय करू शकतो?
माझा मामा.. श्री. श्याम गजानन कुलकर्णी यांनी मनोगतावर बरेच लेखन केले. वचण्यास अतिशय रोचक असे हे लेखन मनोगताच्या परीघाबाहेरीलही वाचकांनी वाचावेत यासाठी ते येथे संकलित करत आहे. या सर्व लेखनाचे आणि खासकरून "ज्ञानेश्वरी" चे केलेले भाषांतर/ अनुवाद याचे सर्व श्रेय पूर्णतः त्यांनाच जाते...
Monday, August 2, 2010
हल्ले - चुकवण्यास अवघड - (शनि., २८/०७/२००७ - २२:१८)
काही हल्ले इतक्या अनपेक्षित दिशेतून आणि अचानक आपल्यावर होतात की त्यातून वाचावे कसे हा मोठाच प्रश्न माझ्यासारख्याला पडतो.म्हणजे असे पहा तुम्ही तुमच्या मित्राकडे अगदी त्याला पूर्वकल्पना देऊन गेलात पण अचानक त्याचे काही काम निघाल्यामुळे तुम्ही जाता तेव्हां तो तुम्हाला बसायला सांगून आताच परत येतो असे सांगून शेजारीच त्याच्या छोट्या गोड मुलाला राजूला "अरे काकाशी गप्पा मार बरका " असे बजावून जातो. अशा वेळी मित्रपत्नी पण आपले कर्तव्य पार पडण्याच्या उद्देशाने तेथे येते आणि इथेच सगळा मामला बिघडतो.कारण आपल्या मनोरंजनासाठी राजूचा उपयोग करायचा तिने ठरवलेले असते ( किंवा राजूच्या मनोरंजनासाठी माझा ?) आपण पेपर वाचण्याचा बहाणा केला तरी ती राजूला अगदी पलीकडल्या फ्लॅटमधील व्यक्तीसही ऐकू जाईल अशा आवाजात विचारते," राजू तुझ नाव नाही का सांगणार काकाना ?"(किंवा तुज्य नाव नाही का छांगनाल काकाना लाजुड्या " अस राजूपेक्षाही बोबड्या भाषेत) अर्थात आपणही इतके काही माणुसघाणे नसतो की अशा आवाहनाकडे दुर्लक्ष्य करावे ( आणि असलोच तरी राजूमाता थोडीच बसलीय आपल्याला ते स्वातंत्र्य द्यायला।) अर्थातच आपल्याला खोटे खोटे का होईना मार्दव सुरात आणून व तोंडावर उसने अवसान आणून विचारावच लागत," अरे वा ,बाळ कायरे नाव तुझ सांग बर "पण राजूच्या आईला अशा जुनाट पद्धतीने नाव विचारणे मुळीच मंजूर नसते.ती माझ्याकडे एकाद्या बावळट प्राण्याकडे पहावे तसा केविलवाणा दृष्टिक्षेप टाकून मला म्हणते "अहो तो इंग्लिश मीडियममध्ये जातो ना त्यामुळ त्याला तसेच विचाराव लागत," राजू, व्हॉट इज युवर नेम ?" खरतर दोन मिनिटापूर्वीच तिन मराठीतच नाव विचारलेल असत हे तिच्या निदर्शनाला आणावे अस मला वाटत पण आपला मान आपणच राखावा असे म्हणतात ना म्हणून मी गप्प बसणे पसंत करतो.
राजू बाळ जर शहाण असेल आणि त्याचा मूड असेल तर ते आपले ,आपल्या वडिलांचे( त्याच्या आईला त्याचे आजोबा ,पणजोबा, खापरपणजोबा यांची नावे माहीत नसल्याबद्दल मी येथे देवाचे आभार मानतो) नाव ,आडनाव वगैरे माहिती पटापट सांगून मोकळा होतो व आग्र्याहून सुटका झाल्याचा शिवरायाना जेवढा आनंद ज्गाला नसेल तेवढ्या आनंदाने मी त्याच्या पाठीवर शाबासकीची ( आणि सुटकेची पण ) थाप मारतो.पण काही राजूमंडळी अशी बिलंदर असतात की शत्रूच्या ताब्यात सापडलेला गुप्त हेरसुद्धा आपली माहिती शत्रूस मिळू नये म्हणून जेवढी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार नाही तेवढी ती करतात; सामदामाची कसलीच मात्रा त्यांच्यावर चालत नाही हे पाहून आता आपल्यावरचे संकट टळले या आनंदात मला त्याचे फारच कौतुक वाटते व मी " राहू द्याहो,मी पुढच्या वेळी येईन तेव्हा सांगेल तो होय की नाही राजू?" ( या वेळी पुढच्या वेळी न येण्याची प्रतिज्ञा मी करतो) अस म्हणण्याचा प्रयत्न करतो,पण राजूची आई (खरोखरच)राजूचे बारसे जेवलेली असते (ती माझाही बारस जेवली होती की काय अशी शंका मला येते) त्यामुळे या मुलाच्या तोंडून नाव वदवले नाही तर तो आपलाच पराभव आहे असे तिला वाटत असते.
पण ही नाव न सांगणारी मुल बरेच वेळा परवडतात कारण कसेबसे त्याच्या तोंडून नाव वदवण्यात यशस्वी झाल्यावर ती बिचारी आई थकून शो बंद करते .उलट मूल जर स्मार्ट असेल तर मात्र केवळ नावावर आपली सुटका न होता त्यानंतर आपल्याला ए ,बी . सी, डी, संडे मंडे चैत्र वैशाख,-- जानेवारी फेब्रुवारी ---एक, दोन , तीन , वन , टू, थ्री , एवढे सगळे मला ऐकून घ्यावे लागते आणि तेसुद्धा त्या पोरानच या सगळ्या गोष्टींचा शोध लावला आहे असा भाव मुद्रेवर आणून !
कधी कधी (दुर्दैवाने) हे पोरग चित्रकार आहे असा त्याच्या आईचा गैरसमज झालेला असतो.मग एकदम राजूची आई पवित्रा बदलून कागद पेन्सिल त्याच्या हातात खुपसते व " आता आमचा लाजू चित्ल कालतो बलका " अस जाहीर करते अशा वेळी खरोखर राजूच चित्र काढणार असेल तर ठीक कारण तो निदान चित्र काढण्यापूर्वी "आता मी घोला कालतो आँ " अशी घोषणा करून चित्र ओळखण्याच्या कठिण प्रसंगातून माझी सुटका करतो,पण कधीकधी राजूचा हात हातात धरून राजूची आईच चित्र काढते व ते चित्र मला दाखवून ," आता काका सांगा बर राजून काय काढल ते ?" ही पृच्छा करून माझी परिस्थिती इकड आड तिकडे विहीर अशी करून टाकते.कारण स्पष्ट ओळखत नाही म्हणावे तर मी बावळट ठरतो व ओळखायला जाऊन भलतच सांगितल तर राजूची आई मीच राजू असल्याच्या आविर्भावात माझ्याकडे खाऊ की गिळू असा दृष्टिक्षेप टाकते. एकदा राजून ( म्हणजे त्याच्या आईने) काढलेल्या घोड्यास गाय म्हणण्याचे पातक माझ्या हातून घडले .त्यावर अविंधाच्या हातून गाय मारण्याचे पातक झाल्यावर शिवरायानी त्याचा नि: पात करावा तसा राजूची आई आता माझा करणार की काय अशी भीती मला पडली आणि माझ्या मित्राची त्याच्या प्रेयसीनेसुद्धा ज्या उत्कंठेने वाट पाहिली नसेल तितक्या उत्कंठेने मी वाट पाहू लागलो.माझ्या त्या घोर अपराधामुळे इतकावेळ केलेली खोटी स्तुती व परिश्रम यांच्या मोबदल्यात मिळणाऱ्या चहाला तर मला मुकावे लागलेच शिवाय मी अगदीच बिनडोक आहे अशी माझी प्रसिद्धी मित्रपत्नीच्या मैत्रिणींमध्ये झाली ते वेगळेच.
एकाद्याच्या घरी लहान मुले नसली तर तुम्ही सुटलात असे समजू नका बरका,त्यावेळी त्यांच्याकडे नुकतेच कुणाचे लग्न वगैरे झाले नाहीना याची खात्री केलेली बरी असते.एकदा मी तसे न करण्याचा बावळटपणा केला आणि एक बाहेरून अतिशय सुदर दिसणारी ( पण अंतरंग मात्र काळेकुट्ट असणारी) चीज हातात घेऊन वहिनींचे आगमन झाले आणि त्यानी केलेल्या उद्घोषणेमुळे पांडवांच्या शंखध्वनीमुळे कौरवसेनेची जी अवस्था झाली तीच माझी झाली कारण ती वस्तु अतिशय पेमळपणे माझ्या हातात देत वहिनी म्हणाल्या " बरका भावजी ,हा आमच्या मंदावन्संच्या लग्नाचा अल्बम !".आता वहिनीना जितका वेळ असेल त्यानुसार मला चित्रप्रदर्शनासह त्यांच त्यावरील भाष्य ऐकण्याची मानसिक तयारी करावी लागली
" बरका भावजी ,हा होमाच्या वेळचा फोटो"वहिनीनी सुरवात केली अशावेळी तो अल्बम आणि भाष्यकार दोघानाही होमात का टाकू नये असा विचार मनात तरळतो.
" आणि हा सासरी जाण्याच्या कल्पनेन दु: खी झालेल्या मंदावन्संचा चेहरा ! ते पहा त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे मोती." इकडे वहिनींच्या बोलण्यात काव्यात्मकता डोकावू लागते आणि त्या आता ' जा मुली जा' असं गाण म्हंआयला सुरवात करतात की काय या कल्पनेने माझ्या डोळ्यातून अश्रू डोकावू लागतात.त्यामुळे गैरसमज होऊन " हे काय भावजी , तुम्ही काय लावून घेताय मनाला एवढ ?" अस विचारून त्या माझी आणखीच पंचाईत करतात. खर तर मला मंदावन्संची चर्या कजाग वहिनीच्या तडाख्यातून सुटल्याच्या आनंदात जरा उजळल्यासारखीच वाटत होती. पण ही शंका व तिची कारणमीमांसा बोलून दाखवली असती तर माझ्या मित्राच्या घराचा दरवाजा माझ्यासाठी कायमचा बंद होण्याची शक्यता होती.त्यामुळे त्या बहाण्यान काही काळ डोळे बंद ठेवून काही फोटो बघण्याचे टाळणे एवढेच माझ्या हातात असते.
प्रत्यक्षात फोटो पाहिला असो वा नसो तरी तो पाहिल्याची वहिनींची खात्री पटावी म्हणून प्रत्येक फोटोवर वा, सुंदर, फारच छान असे अभिप्राय देणे माझ्यावर बंधनकारक असते, नाहीतर अल्बमचे पुढले पान उलटलेच जात नाही.त्या गडबडीत शेवटच्या पानावर अल्बम संपल्याच्या आनंदात " वा फारच आनंदाची गोष्ट " असा यावेळी मात्र खरोखरीचा अभिप्राय देताच वहिनी एकदम माझ्याकडे एकदम टवकारून बघू लागल्यावर आपली काहीतरी चूक झाल्याच मला जाणवल तेव्हा परत शेवटच्या फोटोकडे पाहिल्यावर माझी चूक माझ्या ध्यानात आली.कारण त्या फोटोत खरोखरच मंदावन्स दु: खावेगाने आईचा निरोप घेत होती. मग " एकदम कण्व आणि शकुंतलेची आठवण झाली" अशी चुकीची दुरुस्ती करावी लागली,पण त्या दुरुस्तीतही एक चूक झालीच होती पण ती वहिनींच्या लक्षात आलेली नसावी. किंवा त्यानी उदार मनाने माफ केली असावी.
परदेश पर्यटन करून आलेल्या मिंत्रांचा एक वेगळाच वर्ग असतो.तेही तिकडे काढलेले फोटो, तिकडून आणलेल्या व त्यांच्या मते इकडे न मिळणाऱ्या वस्तु यांचे दर्शन घडवून आपल्या जन्माचे सार्थक करण्याच्या उच्च हेतूने आपली वाटच पहात असतात.
माझ्या एका मित्राला कुष्ठमित्र पुरस्काराचा मानकरी झाल्यामुळे त्याचे अभिनंदन करण्याकरता त्याच्या घरी जायला निघालो तेव्हा त्या मित्राकडे जाऊन आलेल्या माझ्या भावाने त्यासाठी निदान एक तासभर तरी काढून जावे असे सुचवले कारण आतापर्यंत मिळालेली सगळी मानपत्रे,त्याचे अनेक मान्यवरांबरोबर काढलेले फोटो ,वृत्तपत्रातून आलेल्या त्याच्या कौतुकाच्या अभिप्रायाची कात्रणे हे सर्व पहाण्यासाठी आणखी त्यावरील मित्राचे भाष्य ऐकण्यासाठी किमान एक तास तरी काढून जावे लागते.
थोडक्यात काय तर आजकाल कोणाला कोणी आपल्या घरी यावे असे वाटत नाही असे म्हणतात मात्र या मित्रांच्या बाबतीत हे खोटे ठरते उलट त्यांच्या हल्ल्यातून वाचावे कसे हाच मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.

किस्सा कुर्सीका ! - (बुध., ११/०७/२००७ - १६:२९)
आरामखुर्ची हा प्रकार बहुतेक कालबाह्य झाला आहे. कदाचित आराम करायला कुणाला वेळच नाही हे असेल किंवा खुर्ची उत्पादकांच्या मते हल्ली तयार होणाऱ्या सगळ्याच खुर्च्या आरामदायी असतात.आमच्या लहानपणी पण आरामखुर्च्यांचे फार वेगवेगळे प्रकार उपलब्ध होते अशातला भाग नाही.एकच सर्वमान्य प्रकार होता आणि तोच बहुतेक बऱ्याच घरात पहायला मिळे.या खुर्चीला जागा बरीच लागत असे. तिचा सांगाडा दोन लाकडी चौकटी गुणाकाराच्या चिन्हाप्रमाणे एकमेकात अडकवून तयार होत असे.त्यातील एक चौकट बरीच मोठी असे.तिच्या दोन बाजूना आडव्या फटी असत .त्यातून ज्यावर बसायचे ते कापड घालून दोन बाजूना दोन दंडगोलाकृती दांडे अडकवण्यासाठी त्या कापडाला शिवणी मारलेल्या असत ही खुर्ची इतकी आरामदायक असे की एकदा बसणारा बऱ्याच प्रयत्नानेच उठू शके. त्याचबरोबर एकीकडचा दांडा काढून कापड पडू दिले नाही तर बसणाऱ्यास त्याची कल्पना नसल्यामुळे तो ऐटीत बसायला जाऊन भुइसपाट होत असे. आम्ही या तिच्या गुणधर्माचा आपापसातील सूड उगवण्यासाठी किंवा वेळीअवेळी घरी येऊन कठीण मराठी (कारण इंग्रजीचे भूत त्यावेळी पालकांच्या मानगुटीवर बसले नव्हते) शब्दार्थ, किंवा पाढ्यातील एकोणतीस सत्ते किंवा पावकी दीडकी ( आताच्या पिढीला ही नावे तरी माहीत आहेत की नाही कुणास ठाऊक) सवायकी असले क्लिष्ट प्रश्न विचारून आम्हाला छळणाऱ्या पाहुण्याना पाडण्यासाठी करत असू.
त्यावेळी मला नुकतीच नोकरी लागली होती आणि वडील सेवानिवृत्त झाल्यामुळे मीच कुटुंबप्रमुख झालो होतो.पहिल्या पगारात आईसाठी साडी घ्यावयाचे मी ठरवले अर्थात वडिलांसाठी धोतरजोडी खरेदी करणेच योग्य ठरले असते.पण त्यावेळी त्यांची वापरातील धोतरजोडी पुरेशी फाटली नाही असा त्यांचा दावा होता.आणि एक वस्तु वापरात असताना दुसरी पर्यायी म्हणूनसुद्धा आणण्याचा प्रघात ( आणि मुख्यत्वे ऐपत)त्यावेळी नव्हता. साध्या चप्पलजोडीचा विचार केला तर वापरातील जोडी झिजल्यावर प्रथम तळाला जोड लावले जायचे,नंतर मग बहुतेक अंगठ्याची पाळी असायची. अशा प्रकारे प्रत्येक चपलेचे सगळे अवयव जमतील तितक्या वेळा बदलल्यावरच दुसरा जोड घेतला जायचा (म्हणजे सुश्री जयललितांच्या चप्पलजोड्या आमच्या गावातील सगळ्या स्त्रियानी चप्पल वापरण्याचे ठरवले असते तर त्याना जन्मभर पुरल्या असत्या.)आणि ही केवळ आमच्यासारख्या त्या काळातील मध्यमवर्गीय ( म्ह. आजच्या कनिष्ठ मध्यम वर्गीय पक्षी दरिद्री)लोकांचीच पद्धत होती असे काही नव्हते.आमच्या संस्थानचे एक राजपुत्रसुद्धा अगोदर हाफ पँटच घालायचे पण तिलाही नवीन शिवतानाच पार्श्वभागावर आतल्या बाजूने दोन ठिगळे लावायचे असे आम्ही ऐकले होते (खरेखोटे त्यांचा शिंपी आणि धोबीच जाणोत) तर अशा तालमीत तयार झालेल्या वडिलानी धोतरजोडी घेण्यास विरोध केल्याने त्यांच्या सेवानिवृत्त जीवनात आराम मिळावा म्हणून बसण्यासाठी आरामखुर्ची घ्यावी या उद्देशाने मग आम्ही घराबाहेर पडलो.
या 'आम्ही'त मी व माझी व्यवहारकुशल भगिनी यांचा समावेश होतो. खरे तर माझ्या तुलनेत कोणीही व्यवहारकुशलच ठरेल याची मला खात्री होती ( आणि आहे पण). शिवाय ती व्यवहारकुशल आहे असा तिचा दावाही होता. मात्र तिने आणलेली कोणतीही वस्तु एकदा तरी बदलून आणावीच लागे.पण दुकानदार कोणतीही सबब न सांगता निमूटपणे तिला वस्तु बदलून देत हाच फार तर तिच्या व्यवहारकौशल्याचा पुरावा मानता येईल.एकदातर तिने आणलेली साडी काही वेळा नेसून धुतल्यावरही केवळ तिच्या मैत्रिणीनी साडीवर केलेली टीका सहन न झाल्यामुळे तावातावाने परत केली होती.
त्यावेळी बाजारात नुकत्याच येवू घातलेल्या लोखंडी फर्निचरमध्ये मिळणारी आरामखुर्ची घ्यावी असे आम्ही ठरवले अर्थात हा निर्णय एका दुकानात शिरल्यावर व दुकानदाराकडून त्या खुर्चीची प्रशस्ती व अर्थातच किंमत ऐकूनच केला होता ही पूर्वीच्या लाकडी खुर्चीचीच लोखंडी आवृत्ती होती फक्त यात कापडाच्या दोन्ही बाजू वरच्या आणि खालच्या दाड्यावरून घेऊन शिवूनच टाकल्या होत्या म्हणजे दांडा काढून पाडण्याची सोय यात नव्हती.मात्र ते कापड फाटले तर काय ही मूलभूत शंका माझ्या व्यवहारकुशल बहिणीस आलीच.यावर त्या दुकानदाराने कापड फाटले तर बदलून देण्याची जबाबदारी घेऊन फक्त कापडाची किंमत गिऱ्हाइकाने द्यायची असे सांगितले.या दुकानदाराचा मूळ व्यवसाय कलालाचा म्हणजे दारू तयार करून विकणाराचा होता.मधल्या काळात दारूबंदीमुळे ( त्यावेळी आपल्या राज्यात दारूबंदी होती)पिढिजात व्यवसाय सोडून हे दुकान त्याने टाकले होते.पूर्वीच्या व्यवसायात गिऱ्हाइकाना काहीही आश्वासन दिले तरी विकलेल्या पेयाच्या अमलाखाली गिऱ्हाईक व कधीकधी तो स्वत: पण असल्यामुळे त्या आश्वासनाची आठवण दोघानाही रहात नसल्याने त्याची पूर्तता क्वचितच करावी लागे हे आश्वासनही त्या संवयीचाच भाग असावा पण हे आमच्या नंतर लक्षात येणार होते. अर्थात आमच्या हा शब्द वापरणे हा केवळ औपचारिकतेचाच भाग आहे कारण मी नेहमीप्रमाणे पूर्णपणे बरोबरच्या व्यक्तीच्या निर्णयकौशल्यावर विसंबून होतो अशावेळी एकादी गोष्ट माझ्या ध्यानात आली तरी मी तिकडे दुर्लक्ष करतो आणि अर्थातच त्याचा पुढे मलाच पश्चाताप करावा लागतो हे वेगळे! आताही या खुर्चीच्या बाबतीत मला एक गोष्ट खुपत होती ती म्हणजे लोखंडी चौकट करताना दोन बाजूमधील अंतर सगळीकडे सारखे रहावे म्हणून मध्ये एक आडवी लोखंडी पट्टी बैठकीच्या भागाकडे वेल्ड केली होती. तिच्यावर बैठकीचे कापड आपण बसल्यावर घासू लागे.त्यामुळे खुर्चीचे कापड त्या जागी लवकरच फाटण्याची शक्यताच नव्हे तर निश्चितीच होती.पण खरेदी तज्ञ बहिणीची मान्यता आणि कापड बदलून देण्याचा दुकानदाराचा वायदा या दोन गोष्टींनी या शंकेवर मात केली व खुर्ची आम्ही खरेदी केली.
कुठल्याही क्षुल्लक खरेदीने आनंद वाटण्याचे ते दिवस असल्यामुळे तेवढ्या खरेदीचेही कौतुक झाले.वडिलानी तिच्यावर बसून तिजे उद्घाटन केल्याचे जाहीर केले (कारण तसे पहाता तिचे उद्घाटन केल्याशिवाय तिच्यावर बसता येतच नसे.)वडील सेवानिवृत्त झाले असले तरी घरात बसून रहाण्याचा पिंड नसल्यामुळे आरामखुर्चीवर क्वचितच बसत,भावंडांना तिच्यावर बसून अभ्यास करणे शक्य नव्हते.आई तर तिला हातही लावत नसे.येऊन जाऊन एवढा गाजावाजा करून तिला खरेदी करणारे आम्ही दोघेच कधी बसलो तर बसत असू तिच्यावर ,नाहीतर ती कोपऱ्यात घडी केलेल्या अवस्थेत उभी असे.म्हणजे घरातील व्यक्तींपेक्षा जास्त आराम तिचाच चालू होता म्हणाना ! पण मूळ तोळामासा तब्येत असणाऱ्या व्यक्तीस कितीही आराम मिळाला तरी थोड्या दगदगीनेही मूळ रोगाने उचल खावी तसेच तिच्याही बाबतीत झाले आणि अगदी मोजक्या व्यक्तीनी तिच्यावर आराम करण्याचे सौख्य उपभोगल्यावर माझी भीती खरी ठरून तिला पट्टीवर घासणाऱ्या भागास प्रथम छोटे भोक आणि छिद्रेश्वनर्था: बहुलीभवंति या उक्तीस जागून ते भोक वाढून तिच्यावर बसणे लवकरच अशक्य झाले.आणि मग खुर्चीविक्रेत्याच्या आश्वासनाच्या सत्यतेचा पडताळा घेण्याची वेळ लवकरच आली.
खुर्ची घेऊन आमची वरात त्या दुकानात पोचल्यावर मालकाने पहिल्यावेळी दाखवलेल्या उत्साहानेच आमचे स्वागत केले. हसतमुद्रेने स्वागत करणे हा त्याच्या विक्रयशास्त्राचा भाग होताच पण आमचे आगमन त्याला अपेक्षितही असावे असाही भाव त्याच्या हास्यातून सूचित होत असल्याचा भास मला झाला.खुर्ची आमच्याबरोबर असल्याने आमच्या येण्याचे कारण त्याला समजल्यातच जमा होते. पण तरीही आपल्या खुर्चीचे अवमूल्यन आपणच केले असे व्हायला नको म्हणून एक औपचारिकता पुरी करण्याच्या हेतूने त्याने विचारले" काय साहेब,आज कशासाठी येणं केलत ?" खुर्चीच्या दुरुस्तीसाठी इतक्या लवकर त्याच्याकडे जावे लागणे ही गोष्ट माझ्या मनात डाचत असली तरी त्यात माझ्या ज्ञानाचेही दिवाळे निघाल्याची जाणीव मला जास्त क्लेशदायक वाटत होती.पण माझ्या बहिणीला अशी खंत बाळगण्याचे काही कारण नव्हते शिवाय तिने यापूर्वी अशा अनेक विक्रेत्याना लोळवले होते.त्यामुळे कठिण प्रसंगातही धैर्य न सोडण्याच्या आपल्या वृत्तीला जागून तिने ," अहो कसली खुर्ची गळ्यात घातलीत आमच्या ,लगेच कापड फाटलेसुद्धा" असे म्हणत त्याच्यावर हला केला. अशा हल्ल्याची संवयच असल्यामुळे आपली मन: शांती मुळीच ढळू न देता त्याने " अहो ताई अशा रागावता कशाला, कापड बदलून देण्याची बोली आहे ना आपली ? उलट तुम्हाला परत नव्या खुर्चीत बसण्याचा आनंद मिळेल,हव तर कापडाचे पैसेही देऊ नका मग तर झाल ?"म्हणून तिच्या रागाचा पारा उतरवण्याचा प्रयत्न केला पण अशा गोड शब्दांना बळी पडणाऱ्यापैकी ती नव्हती.त्यामुळे "ते कापड किती टिकणार की घरी नेतानेताच फाटणार ?"असे विचारून त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न तिने केलाच.पण असे शेकडो हल्ले दररोज पचवण्याची संवय असल्याने त्याने तिला शांत करण्याचा आणखी एक प्रयत्न करत म्हटले," काय बोलताय ताई,आता खुर्ची तुटली तरी फाटणार नाही असे कापड बसवून देतो मग तर झाल?" तस होण हे तर आणखीच त्रासदायक होत पण मी मध्ये बोलण्याचा मोह टाळला.या आमच्या दुकानभेटीची फलश्रुती खुर्चीच माहेरी आगमन येवढीच होण्याची शक्यता असल्याने मी तेथून बाहेर पडण्याची तयारी दर्शवीत " मग खुर्ची नेण्यास आम्ही परत केव्हां येऊ?"असे विचारले, त्यावर त्याने " याकी साहेब,दोनतीन दिवसात,आणि तसच जायच नाही बरका चहा मागवलाय" अस म्हणून आमच्या रागाच्या आगीवर चहाच पाणी मारण्याचा प्रयत्न केला
दोन तीन दिवसांच्या वायद्याचा अर्थ माहीत असल्यामुळे व आरामखुर्चीवाचून कुणाच काही अडत नसल्यामुळे तब्बल एक आठवड्याने मी दुकानात डोकावलो. आरामखुर्ची आमच्या मागच्या भेटीत ज्या ठिकाणी ठेवली होती त्याच जागी आराम करत होती. अर्थातच तिच्यावर बरेवाईट कसलेच संस्कार झालेले मव्हते. मला पाहिल्यावर आश्चर्य वाटल्यासारखे दाखवून दुकानदार म्हणाला," अरे साहेब तुम्ही?" त्याच्या या उद्गारामुळे आपलीच काही चूक झाली नाही ना असा संशय मला आला. शिवाय माझी पाठराखीण माझ्याबरोबर नसल्याने माझ्या मनोधैर्याची पातळी म्हणावी तितकी उच्च नव्हती उलट तिच्या गैरहजेरीमुळे तेंडुलकराविना खेळणाऱ्या भारतीय संघासारखीच माझी अवस्था आहे हे त्या चतुर गृहस्थास पुरेपूर माहीत होते. त्याने मला बसण्याची विनंती करून लगेच पोऱ्याला चहा आणण्यास पाठवले. आपल्या स्वरात जेवढा कडकपणा आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करीत मी म्हणालो,"हे पहा चुनिलाल, मी चहा पिण्यासाठी तुमच्या दुकानात आलो नाही." असे कडक बोलण्याचा प्रयत्न मी करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला मात्र मी विनोद करण्याचाच प्रयत्न करतो आहे असे का वाटत कुणास ठाऊक. आताही तसेच झाल्यामुळे चुनीलालने त्याच्या अगोदरच विनोदी शैलीचा वापर करत,"हे काय बोलण झाल साहेब ? आता पूर्वी आमच्याकडे ह्याच्यासाठीच लोक आमच्याकडे यायचे ते वेगळ !" असं ओठाला मूठ टेकत दारू पिण्याचा अभिनय करीत म्हटले.त्याच्या विनोदामुळे मी रागावणार नाही अशी त्याची जी कल्पना होती ती मात्र खरी ठरली.कारण माझ्या कडक बोलण्याने समोरच्या व्यक्तीपेक्षा मलाच जास्त वाईट वाटतं आणि हा माझा दुबळेपणा याही वेळी वर उसळून आल्यामुळे तो सहीसलामत सुटला.
मग गुळमुळीत शब्दात मी " मग आमच्या खुर्चीच काय झाल ?" असं विचारल.खर तर खुर्चीच काहीच झालेलं नाही हे मला स्पष्ट दिसत होते.मात्र मी प्रश्न विचारल्यावर चुनिलालला एकदम जोर आला,आणि तो म्हणाला," काय सांगू साहेब,खुर्चीला कापड लावून दुसऱ्या दिवशीच तयार ठेवायला सांगितल होत पण तो टेलरचा बच्चाच तेव्हापासून गायब झालाय."
" मग तो केव्हा येणार ?"मी उगीचच काहीतरी विचारायच म्हणून विचारल.कारण या प्रश्नाच उत्तर त्या टेलरच्या बच्चालाच माहीत असण्याची शक्यता होती शिवाय त्या उत्तरावर माझ्या खुर्चीच भवितव्य अवलंबून नाही याचीही पूर्ण कल्पना मला होती..
" तो केव्हा यायचा असेल तेव्हां येऊदे " चुनिलाल मोठ्या औदार्याने उत्तरला,"पण आता तुमच्या खुर्चीच काम मात्र उद्या तो नाही त्याच्या बापाकडून करून घेतल्याशिवाय माझ समाधान होणार नाही.तुम्हाला अशा चकरा मारायला लावायला बर वाटत नाही साहेब"
त्यच्या या आवेशाने जरा बरे वाटून ,"ठीक आहे ,मग उद्या येतो" असे म्हणून मी दुकानाबाहेर पाय ठेवत होतो तेवढ्यात एक पोरगेलासा दिसणारा माणूस माझ्या पाठीकडून चुनिलालला उद्देशून " शेट, आजतरी कापड आणून द्या म्हंजे त्या खुर्चीचा निकाल लावता येईल"म्हणत असताना ऐकू आल्यावर हाच तो टेलरचा बच्चा असावा आणि तो गायब वगैरे झाला नसून ते चुनिलालच्याच कल्पनाशक्तीच चातुर्य आहे हे माझ्या लक्षात आले. पण चुनिलाल मात्र काहीच घडले नसल्याच्या थाटात म्हणाला," बघा साहेब,हा आला आमचा टेलर,आता तुमचे काम झालेच समजा ! उद्या केव्हाही तुमच्या सोयीन या आणि खुर्ची घेऊन जा."
या वेळी मात्र उद्याचा वायदा टाळण्याचा प्रयत्न चुनीलाल करणार नाही अशी खात्री असल्याने मी स्वस्थ चित्ताने दुसऱ्या दिवशी त्याच्या दुकानात जायच ठरवल,तरीही प्रत्यक्ष दुकानात शिरताना माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. पण चुनिलालच्या चेहऱ्यावरील आश्वासक हास्यातून " सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।" असे अर्जुनास बजावणाऱ्या श्रीकृष्णाचाच भास मला झाला.
"या साहेब खुर्ची तयार आहे " या त्याच्या उद्गारानी तर उरल्यासुरळ्या सर्व शंकांचे समाधान झाले आहे असे अर्जुनाप्रमाणेच म्हणाव असं मला वाटू लागलं आणि दुसऱ्याच क्षणी खुर्चीवर दृष्टीक्षेप टाकताच आता अर्जुनाप्रमाणे मला लढायलाही तयार व्हाव लागणार असं वाटू
कारण पूर्वी खुर्चीच्या ज्या भागाला कापड लावल्याने तिला आरामखुर्चीपद प्राप्त झाले होते त्याच्या बरोबर उलट्या आणि छोट्या भागास त्या शिंप्याने कापड लावून त्याला तान्ह्या बाळाची झोळी करूब टाकले होते.या झोळीचा वापर करण्यासाठी मला लग्नापासून तयारी करयला लागली असती.खुर्ची चुनिलालपुढे उघडून ठेवूम शक्य तितक्या चढ्या स्वरात मी म्हणालो, " हे काय करून ठेवलेय तुम्ही ?" खुर्चीकडे पाहून त्यालाही हसू आवरेना. आपल्या हसण्याचा गिऱ्हाइकावर काय परिणाम होईल याचीही त्याला काळजी नसावी किंवा त्या खुर्चीकडे पाहून त्याला बाकी कुठल्याच गोष्टीचे भान उरले नसावे.
" त्या टेलरच्या बच्चाचा हा सगळा प्रताप"अगदी हसत हसत तो म्हणाला," हो पण त्यावेळी तुम्ही काय करत होता ?" अस विचारण्यापूर्वीच गिऱ्हाइकासाठी नसली तरी तो स्वत: पुरती तरी गाळत असावा याची मला खात्री पटली.तरीही चुनिलाल पूर्वीच्याच उत्साहाने मला त्याची नवी योजना ऐकवू लागला."काळजी नको साहेब" खर तर काळजी करण्याचा पूर्ण भार माझ्यावर टाकून काळजी न करण्याची बाजू त्याने उत्तम रीतीने संभाळली असल्याने असा सल्ला मला देण्यास त्याच्याइतका लायक माणूस शोधूनही सापडला नसता.
" आत्ताच्या आत्ता त्या टेलरची मान पकडून नवे कापड टाकायला लावतो."चुनिलाल उवाच.
" पण त्यापूर्वी हे कापड काढायला सांगा" आता कुठलाही धोका पत्करण्याची माझी तयारी नव्हती.त्यामुळे मी म्हणालो.
" काय साहेब, हे काय सांगायला पाहिजे का?" इति चुनिलाल. खर तर आता त्याला काहीही सांगण्याची माझी इच्छा नव्हती.भर्तृहरीच्री चुकून गाठ चुनिलालशी पडली असती तर या माणसाला कुठलीही गोष्ट समजावण्याचे शिरसि मा लिख मा लिख मा लिख ! असा श्लोक त्याला लिहावा वाटला असता.
"मग मी आता उद्या येतो" व्याधाशी परत येण्याचा वायदा करणाऱ्या हरिणीच्या व्याकुळतेने मी म्हणालो.फक्त व्याध हरिणीची वाट पहाणार होता तर चुनिलाल मला वाट पहायला लावण्याचा विक्रम प्रस्थापित करून आपले नाव गिनीच्या पुस्तकात येण्याची वाट पाहात होता. " अगदी बिनधास्त या साहेब आणि समजा मी जरी येथे नसलो तरी खुर्ची येथे तयारच राहील आणि येथे बसणाऱ्या माणसाला मी सांगून ठेवीन" आता चुनिलालने नकळत दुसऱ्या एका संकटाची म्हणजे पुढील वेळी त्याच्या दुकानात नसण्याच्या शक्यतेची घंटा वाजवून ठेवली.आणि खुर्चीही त्याच्याच तालमीत तयार झाल्यामुळे तिनेही समझनेवालोको इशारा काफी होता है या न्यायाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे ठरवले असावे.त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी दुकानात गेलो तेव्हा दुकानात चुनिलाल व खुर्ची दोन्हीचा पत्ता नव्हता.एवढेच काय त्याच्या गैरहजेरीत तेथे बसणारा माणूसही त्याला उपलब्ध झाला नसावा.खरे तर त्याचे दुकानही तेथून बेपत्ता झाले असते तरी आता मला आश्चर्य मुळीच वाटले नसते.
पण शेजारच्या दुकानदाराचे माझ्याकडे लक्ष गेले.खुर्चीसाठी त्या भागात आम्ही इतक्या चकरा मारल्याने आम्ही आणि आमची खुर्ची यांनी त्या भागात बऱ्यापैकी प्रसिद्धी संपादन केली होती.त्यामुळे त्या दुकानदाराने चुनिलालचे घर जवळच असून तेथे कसे जायचे याविषयी बहुमोल मार्गदर्शन मला केले. त्याला अनुसरून मी त्याने सांगितलेल्या जवळच असणाऱ्या इमारतीत गेलो.तेथील चिंचोळ्या आणि अंधाऱ्या जिन्याच्या पायऱ्या चढताना हैदराबादच्या चार मिनारच्या पायऱ्या चढल्याचा भास मला झाला.त्या एकूण चौसष्ठ पायऱ्या होत्या हे पुढे बऱ्याच वेळा त्या चढाव्या लागल्यामुळे मला पाठ झाले.पुढेपुढे तर त्या मी डोळे मिटून चढू शकेन येवढा आत्मविश्वासही मला आला.अर्थात पहिल्याच वेळी मी घरी गेल्यावर चुनिलाल घरी नव्हता हे सूज्ञांस सांगणे नलगे !
चुनिलालच्या घराचा पत्ता लागल्यावर एका घूंघट सावरत येणाऱ्या स्त्रीन " सेठ बाहर गये है" हे शुभवर्तमान मला दिल.ती अर्थातच त्याची बायको असावी. तेवढ्यात चुनिलालचा दहा बारा वर्षाचा मुलगा तेथे आला. त्याच्याकडून अधिक माहिती मिळाली तर पहावी म्हणून बाबा कुठे गेले आहेत असे विचारल्यावर त्याने बाबा आठ दिवसासाठी बाहेरगावी गेल्याची बातमी मला दिली.त्यामुळे खर तर माझ्या पोटात गोळा यायला हवा होता पण तसे काही न होता उलट आठ दिवस आपल्याला चकरा माराव्या लागनार नाहीत व चुनिलालचे तोंड पहावे लागणार नाही या कल्पनेने मला बरेच वाटले.
पण माझ्या लढाऊ बहिणीस मात्र हा आमच्या संपूर्ण खानदानचा अपमान आहे असे वाटून तिने चुनिलालचा पिच्छा पुरवण्याचे ठरवले.तिचा महाविद्यालयास जाण्याचा रस्ता तिच्या सुदैवाने आणि चुबिलालच्या दुर्दैवाने बराचसा त्याच्या दुकानावरून जात असल्याने तिला त्यासाठी स्वतंत्र वेळ काढावा लागणार नव्हता .थोडक्यात दुसऱ्या दिवसापासून माझा कार्यभार तिच्यावर सोपवून फक्त आता चुनिलालचे कसे होणार एवढी काळजी सोडता मी निश्चिंत झालो. खरतर या चुनिलाल प्रकरणात थोडी विश्रांती घ्यावी असे मला वाटत होते.मालिकेचा भाग दाखवण्यापेक्षा ब्रेकमध्येच जास्त वेळ घालवणाऱ्या दूरदर्शनचे या बाबतीत माझ्याशी चांगले जमते.पण माझ्या अवतीभवतीच्या लोकाना माझे असे ब्रेक घेणे आवडत नाही. चुनिलाल आठ दिवस गावालाच गेल्यामुळे तो काळ तरी शांततेत जाणार असे मी गृहित धरले होते पण माझी ही शांततेची आवड इतरेजनाना मानवत नाही. माझ्या बहिणीने कुठुनतरी बातमी काढली की चुनिलाल गावाला वगैरे कुठे गेला नसून आपल्या मुलाला त्यान तशी थाप मारायला सांगितले होते. अर्थातच आता पुन्हा एकदा चुनिलालच्या दुकानाची आणि तो घरी मसल्यामुळे त्याच्या घराची पायरी ( नव्हे बऱ्याच पायऱ्या) चढणे पुन्हा माझ्या नशिबी आलेच.खरतर आमच्या खुर्चीसाठी नाही तर निदान स्वत:च्या धंद्यासाठी तरी त्यान दुकानात रहाव अस मला वाटू लागल.पण खुर्ची प्रकरण त्यान फारच मनाला लावून घेतल्यासारख दिसले.त्यासाठी त्यान स्वत: च्या धंद्यावरही पाणी सोडायच ठरवल्यासारख वाटू लागल.त्याच्या वागण्यातही पूर्वीचे अगत्य राहिले नाही.खर तर येवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी त्यान आपली इभ्रत का पणाला लावावी हे अनाकलनीय होत हल्ली ती खुर्ची त्याच्या दुकानात वा घरी कुठेच दिसत नसे शेवटी कंटाळून त्याच्या दुकानात एक गार्डन चेअर पडली होती तीच घेऊन जाण्याची धमकी मी त्याला दिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुळीच आढेवेढे न घेता त्याने माझी मागणी मान्य केली,बहुतेक तीही खुर्ची खपणार नाही अशी त्याची खात्री असावी.
अशा प्रकारे घरात गार्डन नसताना गार्डन चेअर माझ्या घरात आली,पण त्या खुर्चीचा उपयोग बागेत फक्त शोभेची वस्तु म्हणून ठेवण्यासाठी व्हावा असा चुनिलालचा दृष्टिकोन असावा त्यामुळे तिचा पाया त्यान इतका कमी ठेवला होता की तिच्यावर बसणारी व्यक्ती थोडे पाठीकडे रेलून बसू लागली की ती पाठीकडे कलंडत असे. थोडक्यात जुन्या पद्धतीच्या लाकडी आरामखुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीस पडण्याची जी शक्यता होती तिला चुनिलालने या खुर्चीचा गुणधर्मच बनवले होते.त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या नव्या माणसास त्या खुर्चीवर बसण्याचा मोह झालाच तर प्रथम त्याला या खुर्चीचे हे वैशिष्ट्य समजावून सांगणे हा त्याच्या स्वागताचा महत्त्वाचा भाग असे ,नाहीतर त्याचे स्वागत फारच वेगळ्या प्रकारे होऊन एक मित्र आम्हास कायमचा दुरावत असे. अजूनही जुन्या वस्तु जपण्याच्या भारतीय परंपरेनुसार ती खुर्ची माझ्या घरात आहे.तिच्यावर बसून माझे बहुतेक मित्र,घरातील एकूणएक माणसे पडलेली आहेत.आता तिचा उपयोग माझी मांजरी करते.आणि फक्त तीच त्या खुर्चीवरून पडण्याची धास्ती न बाळगता आराम करू शकते.

मनूस विसरा - (मंगळ., ०३/०७/२००७ - २१:३५)
कशास करता पुन्हा आठवण मनू मनस्मृतिची
काय म्हणे तो नसे बरोखर चूक असे याची
मनूच जर अति पुराणकाळी वाचवि माशाला
नावेमध्ये घालुन तैसे मानवप्राण्याला
जर म्हणता तो मनू वेगळा स्मृतीकार दुसरा
असे वेगळा इक्क्षाकुकुळी आणखीच तिसरा
आणखीही किती मनू जाहले कुणास माहीत
वेळ बरा जातसे तयाना मूर्ख ठरवण्यात
मनूस विसरा कुणी वाचली मनुस्मृती आज
सर्व जाणती दोन्हींचेही आज नसे काज
काय म्हणे तो नसे बरोखर चूक असे याची
मनूच जर अति पुराणकाळी वाचवि माशाला
नावेमध्ये घालुन तैसे मानवप्राण्याला
जर म्हणता तो मनू वेगळा स्मृतीकार दुसरा
असे वेगळा इक्क्षाकुकुळी आणखीच तिसरा
आणखीही किती मनू जाहले कुणास माहीत
वेळ बरा जातसे तयाना मूर्ख ठरवण्यात
मनूस विसरा कुणी वाचली मनुस्मृती आज
सर्व जाणती दोन्हींचेही आज नसे काज
दोन तज्ञ एक अज्ञ आणि एक विशेषज्ञ - (शनि., ३०/०६/२००७ - २२:३३)
अवघड काम करण्यासाठी तज्ञाकडे जावे असे म्हणतात यात थोडा बदल केल्यास हेच वाक्य काम अवघड करण्यासाठी तज्ञाकडे जावे असेवाचता येईल.या प्रकारचा एक अनुभव केवळ गम्मत म्हणून वाचावा
जागतिकीकरणामुळे पैसा टाकला की चुटकीसरशी सर्व सुखे हात जोडून उभी असतात हे खरेच आहे पण माझ्यासारख्या टंचाईग्रस्त काळात आयुष्याचा बराच काळ घालवलेल्या माणसाला त्यामुळे जीवन फारच गुंतागुंतीचे झाल्यासारखे वाटते. त्याचमुळे फार पूर्वी बांधलेल्या घराला रंग द्यायचा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यासाठी जगातील रंगांच्या संख्येइतके पर्याय उपलब्ध असल्याने निवडीस म्हणजे माझ्या आणि माझ्या पत्नीच्या म्हणजे सुमतीच्या वादविवादास अमर्याद वाव होता.त्यातच भर म्हणून तिचा बंधु विद्याधर ऊर्फ बाबू आमच्याच शहरात रहात
असल्यामुळे या विषयावर त्रिसदस्य समिती तयार होऊन चर्चा होणे हे ओघाने आलेच.बाबू स्वत: स चित्रकार समजत असल्याने या समितीत तो तज्ञ सभासद म्हणूनच काम करणार हेही उघडच होते. रंग देण्याचा प्रश्न उपस्थित होताच आपल्याला या संकटाला तोंड द्यावे लागणार याची पूर्वकल्पना त्यामुळे मला होतीच. आणि रंगाचा विषय निघताच सुमतीने आपल्या लाडक्या बंधुराजाना दूरध्वनी वरून आवाहन करताच द्रौपदीच्या मदतीला श्रीकृष्णाने धावत यावे तसाच बाबूही उड्या मारत येईल अशी माझी कल्पना होती.पण त्यादिवशी माझे ग्रह उच्चीचे असावेत,कारण तिच्या निमंत्रणावर आपला चेहरा दु:खी करत (अंदाज माझा)तो म्हणाला ," माफ कर सुमती,पण मला सिंगलिंग आर्ट गॅलरीत सुमाटो आकाबाकाचे ऍबस्ट्रॅक्ट आर्ट एक्झिबिशन पहायला जायचय " हे ऐकून जो कोणी आकाबाका होता तो नकानका म्हणाला तरी त्याच्या पाया पडाव अस मला वाटू लागल तरीही सुमतीला खट्टू झालेले पाहून तिला बरे वाटावे म्हणून तरी आपण बाबूला विनंती करावी नाहीतरी आता बाबू येणारच नाही तर आपणही बोलून तिला दिलासा द्यायला काय हरकत आहे या सुविचाराने प्रेरित होऊन मी म्हणालो,"काय हे बाबू आपल्या बहिणीपेक्षा तो सुमाटो की टमाटो त्याची चित्र पहाण तुला महत्त्वाच वाटाव ना ?"आणि मग मात्र आपल्याला अशी दुर्बुद्धी सुचल्याचा मला पश्चाताप झाला कारण माझे बोलणे ऐकताच बाबूचा चेहरा एकदम उजळला आणि तो म्हणाला," आता अप्पासाहेब,तुम्ही अस म्हटल्यावर माझा नाइलाज झाला मी रविवारी सकाळीच येतोय"
अशा रीतीने चांगली बसलेली पाचर काढून आपली शेपटी अडकवून घेणाऱ्या माकडाची हुषारी दाखवून मी हळहळत बसलो.सुदैवाने आम्ही तिघेजणच असल्यामुळे तीनच रंगांपैकी कुठलातरी एक निवडावा लागेल अशी स्वत:ची गोड समजूत करण्याच्या प्रयत्नात मी असतानाच वादळासारखा रविवारी सकाळी बाबू घरात शिरला आणि म्हणाला "चला "
"कुठे" आश्चर्याने आ वासून मी म्हणालो.कारण रंगचर्चा सुरू होताच मी पिवळा किंवा हिरवा अस काहीतरी बोलू लागताच सुमती ईऽऽऽ पिवळा (अगर हिरवा ? खर म्हणजे मी कोणत्याही रंगाचे नाव काढले असते तरी तिची प्रतिक्रिया ही अशीच असणार होती)अस विंचू चावावा अशा सुरात ओरडणार .त्यावर हे आकाशातील बापा आता या पाप्याला तूच क्षमा कर असा जो भाव ख्रिस्ती धर्मोपदेशक आपल्या चेहऱ्यावर आणतात तोच आणून बाबू " अप्पासाहेब,तुम्हाला नाही कळायच त्यातल काही,आपण सरळ यलोइश सिल्वर्ड कलर भिंतीच्या वरच्या भागाला,सोक्टर्ड तेडार्ड खिडक्याना,लेथर्स फिटशॉ दाराना आणि फेंट सेलॉसो भिंतींच्या खालच्या भागाला देऊ" अस मला अजिबात न समजणाऱ्या नावाचे रंग उधळणार ( त्यावेळी सुमती आपल्या भावाच्या रंगज्ञानाने दिपून त्याला कुठे ठेऊ आणि नको अशा भाविक मुद्रेने त्याच्याकडे बघणार असा नेहमीच्या अनुभवावर आधारित तर्क मी केला होता पण तो खोटा ठरल्यामुळे फाउस्टला सैतानाऐवजी देवाचे दूत नरकाऐवजी स्वर्गात न्यावयास आल्यावर आश्चर्याचा जेवढा धक्का बसला नसेल तेवढा मला बसला
"कुठ म्हणजे कलर कॉर्नर मध्ये " अगदी सहजतेने बाबू म्हणाला.
'पण तरी निघण्यापूर्वी रंग कुठले द्यायचे हे ठरवलेले बरे नाही का " अस म्हणून पारड माझ्या बाजूने वळवण्याचा दुबळा प्रयत्न मी केला अर्थात दुकानाबाहेर घेतलेल्या निर्णयामुळे खरेदी सुलभ होणार होती अशातला भाग नव्हताच.कारण यापूर्वीही एक साधी कॉटन साडी आणि त्यावर मॅचिंग टू बाय टू ब्लाउज पीस घ्यवयाचे ठरवून दुकानात शिरल्यावर सुमतीच देहभान हरपून जात असे आणि बाहेर पडताना फक्त एक मलई सिल्क,एक विपुल किंवा पराग किंवा अशाच नावाची साडी,एकादीच कांजीवरम,एकादी गार्डन सिल्क अशा थोड्याच साड्या केवळ दुकानदाराला बरे वाटावे म्हणून खरेदी करूनच ती बाहेर पडत असते शिवाय साड्यामध्येच ब्लाउजपीसेस असल्यामुळे बरेच पैसे आपण वाचवल्याचे मला सुनावल्याशिवाय ती रहात नसे. हा माझा नेहमीचा अनुभव.तरीही संवयीप्रमाणे ( जसा सहवाग बाहेर जाणाऱ्या बॉलला उगीचच बॅट लावून औट होतो) मी बोलून गेलो आणि त्यावर त्या दोघांची प्रतिक्रिया काय होते पहात राहिलो."अप्पासाहेब,अहो रंग देण म्हणजे एक शास्त्र आहे." आपली प्रतिक्रिया नोंदवीत बाबू म्हणाला.
"त्यात कसल आल आहे शास्त्र ? पाण्यात अगर तेलात रंग मिसळायचे आणि ते भिंतीवर चोपडायचे यात कसले शास्त्र?" मी जोरदार विरोध करण्याचा क्षीण प्रयत्न केला.यावर अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख म्हणणाऱ्या कवीच्याच थाटात बाबू माझ्याकडे कीव भरला दृष्टिक्षेप टाकत म्हणाला,"अप्पासाहेब,काय हे उद्या तुम्ही पेंटिंगबद्दलही असच म्हणाल."यावर मी गप्प थोडाच बसतोय, ,"नाहीतरी हल्ली पेंटिंग ही त्याहून सोपी गोष्ट झाली आहे" मी तावातावाने बोलू लागलो,"अंगाला रंग चोपडून कापड वा कागदावर गडबडा लोळले की झाले पेंटिंग मग बसा अर्थ लावत त्याचा.मागे एका प्रदर्शनात तर म्हणे कुत्र्याच्या शेपटीला रंग लावून त्या कुत्र्यालाच तिचे फटकारे कॅनव्हासवर मारायला लावून तयार झालेल्या ऑइलला म्हणे पहिले बक्षिस मिळाले"आणखीही मी बरेच बोलण्याच्या विचारात होतो पण आपल्या भावाचा असा मामा केलेला कोणत्या बायकोला आवडणार त्यामुळे" अहो ते राहू द्या तुमच सामान्यज्ञान किती आहे ते आहे माहीत आम्हाला .तो भिंतीला रंग देण्याविषयी काय म्हणतोय ते ऐका."असा फटकारा मारत सुमतीने मला भानावर आणले. सुमतीचा भरभक्कम पाठिंबा असल्याने बाबूने माझे म्हणणे मुळीच मनावर न घेता आपले रंगविश्लेषण तेवढ्याच उत्साहाने चालू ठेवले सुदैवाने हिमालय कलर कार्पोरेशन तेवढ्यात आल्यामुळे तो मारा टाळणे शक्य झाले.
हिमालय कलर कॉर्पोरेशन हे रंगाचे दुकान न वाटता एकाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचे कार्यालय असावे असा भास होत होता. आहीतर पूर्वी कस दुकानात शिरण्यापूर्वीच रंगांच्या पेटाऱ्यांच आणि त्यातून डोकावणाऱ्या रंगांच दर्शन घडायच.दुकानात शिरेपर्यंत गिऱ्हाइकाच्या डोक्यात आपल्याला कोणता रंग हवा आहे याचा गजर होऊ लागे आणि दुकानात शिरल्याशिरल्या दुकानाच्या मालकाला हव्या त्या डब्याकडे बोट दाखवून," मालक हा रंग पाहिजे आम्हाला"असा खुल्लमखुल्ला कारभार असे.इथे तर रंगाचा मागमूसही नव्हता तर अशा परिस्थितीत रंगचर्चा कशी होणार अशी चिंता मला वाटू लागली.आम्ही दुकानात शिरताच एका अत्याधुनिक पोषाक केलेल्या माणसाने 'गुड मॉर्निंग साहेब"म्हणून दंतपंक्ती दाखवत आमचे स्वागत केले त्यामुळे मला धीर आला.
आमच्या मोहिमेच्या नैतृत्वाची धुरा बाबूने सांभाळली असल्याने भिंतीला लावायचे रंग दाखवण्याचा हुकूम हा आता त्याच्या शास्त्रीय परिभाषेत कसा फर्मावतोय हे पहाण्यास मी उत्सुक होतो.पण ' भिंतीचे रंग आहेत का हो ?" असा लाडिक पण अगदीच अशास्त्रीय भाषेत विचारून सुमतीने माझ्या उत्सुकतेच्या त्या फुग्याला टाचणी लावली.
पण प्रश्न जरी अशास्त्रीय भाषेत विचारला गेला असला तरी उत्तर देणारा मात्र महान शास्त्री निघाला."थांबा थांबा अशी घाई करू नका बाईसाहेब,"टाय लावलेला माणूस मराठी आणि ते आमच्यापेक्षाही बरे बोलत होता हे पाहून मला आनंद आणि आश्चर्य वाटले.कारण हल्ली लंडनमध्ये मराठी ऐकायला मिळण्याइतकेच महाराष्ट्रात कॉस्मोपॉलिटन शहरातील अशा अद्यावत दुकानात मराठी ऐकायला मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे मी माझे रोखठोक मत आपल्या शुद्ध मायबोलीत व्यक्त केले," मी सांगतो,आमच्या घराच्या भिंतींना निळा रंग द्यायचा आहे."
मी असे बोललो मात्र,एकदम व्याधाच्या बाणाने विद्ध झालेल्या हरिणीसारखा चेहरा करीत तो म्हणाला," कोणताही निर्णय येवढ्या घाईघाईने घेणे योग्य नव्हे साहेब,आणि त्यात तर हा रंग देण्यासारखा महत्त्वाचा निर्णय !" रंग देण हा कावेरी पाणीवाटपाइतका किंवा त्याहूनही अधिक गहन प्रश्न असावा असे त्याच्या स्वरावरून मला वाटू लागले.
" कारण आपण दिलेल्या रंगावरून आपली आणि बाईसाहेबांची अभिरुची व्यक्त होणार. उद्या बाईसाहेबांच्या मैत्रिणी घरात येणार आणि भिंतीना निळा रंग दिलेला पाहून त्याना काय वाटेल?"शहाजीराजाना आदिलशहाने कैदेत टाकले हे मासाहेबाना कळले तर त्याना काय वाटेल हा प्रश्नही शिवाजी राजाना येवढा गंभीर वाटला नसेल
"त्यांच काही ऐकू नका हो तुम्हीच सांगा काय करायचे ते "सुमतीने चहातून माशी बाहेर काढावी यसे संभाषणातून मला बाहेर काढत म्हटले.
" इटस व्हेरी सिंपल ' मृदु हास्याची कमाल करत टायवाला म्हणाला "त्या बाबतीत आमचे रंगतज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील" आणि एका नोकराला त्याने हुकुम सोडला," अरे.वाकणकराना पाठवून दे बर "
वाकणकरांच्या कपड्यांचे रंग पाहून ते रंगांध असावेत असाच माझा ग्रह झाला पण तज्ञ आणि अज्ञ यातील फरक हाच असावा.त्यांची ओळख टायवाल्याने करून दिली,"मीट आवर कलर एक्स्पर्ट वाकणकर ,नुकतेच ते कलर मॅचिंग या विषयाचा शास्त्रीय अभ्यास पूर्ण करून फ्रान्समधून परत आलेत." ते फ्रान्सम्ध्येच का राहिले नाहीत असा प्रश्न क्षणभर माझ्या डोक्यात घोळू लागला.
" गुडमॉर्निंग मशेर,गुडमॉर्निंग मादाम---" हस्तांदोलनासाठी हात पुढे करत वाकणकर पुढे आले पण एकदम जीभ चावत म्हणाले,"अरे,सॉरी हं फ्रान्समध्ये राहिल्यामुळे हे मशेर,मादाम एवढे तोंडात बसले आहे की ---"
" की अगदी चर्चिलच्या तोंडात चिरूटच ! " मी त्याला उत्तेजन देण्यासाठी आणि आपल भाषाचातुर्य दाखवण्याच्या हेतून म्हटले.पण सुमती बरोबर असली की माझ्या वाक्चातुर्याचा विशेष प्रभाव पडत नाही तसेच आताही होऊन माझ्या चर्चिल चिरूट उपमेकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत वाकणकरन "हं मग आपल्या रंगसमस्येवर बोलूया मादाम ,"असे येथील महत्त्वाची व्यक्ती सुमतीच असणार हे ओळखून विचारले.
" हे पहा आमच्या पोर्च आणि दिवाणखान्यास रंग द्यायचा आहे "
" ओ के,पण त्यासाठी आपल्या बंगल्याचा प्लॅन,तो केव्हा बांधला ,त्यात कोण कोण रहातात आणि काय करतात इ. माहिती असती तर बरे झाले असते तरीही लेट अस स्टार्ट फ़्रॉम पोर्च "
" हे पहा वाकणकर माझ्या मते पोर्चला लाइट प्रशियन ब्ल्यू अन् ड्रॉइंगरूम अप्पर हाफला लेमन -----"बाबूने या विषयावरील तज्ञ म्हणून आपण येथे आलो आहोत या गोष्टीकडे वाकणकराचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला
" प्रशियन ब्ल्यू , लेमन काय कुठल्या जमान्यात वावरताय साहेब आपण" बाबूच्या तज्ञपणावरच हला करत वाकणकर उद्गारला आणि त्याचे पारिपत्य परस्परच होत असल्याने मलाही जरा बरेच वाटले.
" आता आपण ट्वेंटिफर्स्ट सेंच्युरीत प्रवेश करतोय आणि आपण तर अठराव्या शतकातील राजामहाराजांच्या महालाला रंग देण्याच्या पद्धतीने विचार करताय. कलर टेक्निक या विषयावर इतक्या काही मॉडर्न कन्सेप्टस या फ्रान्सच्या टूरमध्ये शिकायला मिळाल्या की काही विचारूच नका शिवाय कलरचा सायकॉलॉजिकल इफेक्ट,कलरमॅचिंग या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.तुम्ही आपले यलो ऑकर घ्या पोर्चसाठी."
" यलो ऑकर पोर्चसाठी ?" धैयधराने " धिक्कार मन साहिना " म्हणावे तशाच आवेशात बाबू उद्गारला. "यलो ऑकर डायनिंग रूमला सूट होतो कारण त्यामुळे पचनशक्ती वाढते हे परवाच्याच colour digest मधील चिकॅसोच Animal Digestion and colour या लेखातील मत वाचल नाही वाटत तुम्ही " आपल्या अपमानाचा थोडाबहुत वचपा काढता आल्याचा झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.पण वाकणकरच्या पुढील वाक्यामुळे तो क्षणभंगूरच ठरला.
" वा साहेब Animal Digestion म्हण्जे गाय बैल अशा प्राण्यांविषयी ते चिकॅसोन लिहिल आहे माणसांविषयी नव्हे,तेव्हा गोठ्याला यलो ऑकर दिला तर त्यांची पचनशक्ती वाढून ते भरपूर दूध देऊ लागतील"
" अस्स! मग पोर्चला यलो ऑकर दिल्यामुळे साहेबांची कार जास्त दूध द्यायला लागेल काय?"त्याला विनोदी टोमणा मारून खजिल करायच्या उद्देशाने बाबू बोलला.पण वाकणकर तेवढ्याने हार थोडाच मानणार होता,त्याने अधिकच उत्साहाने बोलायला सुरवात केली " आपल्याला राग येईल कदाचित साहेब,पण चिकॅसोला रंगाच ज्ञान काडीमात्र नाही अस कालच्याच American color मध्ये जॉर्ज मसीडोच आर्टिकल आलं आहे त्यात आले आहे अर्थात आपल्याला प्रशियन ब्ल्यूच हवा असेल तर मला काही म्हणायच नाही पण चिकॅसोच्या कलर नॉलेजवर फार भरवसा ठेऊ नका,तेव्हा आपल काय म्हणण आहे बाईसाहेब?"येथे सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे हे वाकणकरनं बरोबर हेरल होत.
"पण वाकणकर आमच्या गाडीचा रंग लाईट ग्रीन आहे तेव्हा पोर्चचा रंग त्याला सूट होईल ना?" खरे तर आमच्याकडे त्यावेळी कसलीच गाडी नव्हती तरी सुमतीन हा प्रश्न कुठून काढला मला कळेना.म्हणून मी म्हणालो,"अग ही लाइट ग्रीन गाडी कुठून आणलीस?" झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याची अक्कल मला जरा कमीच.पण सुमती अशी थोडीच गप्प बसते,तिन लगेच" अहो अस काय करताय आपल्या गाडीला लाइट ग्रीन कलर द्यायला सांगितला नाही का वशिंड्यांच्या गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगला टाकली तेव्हा? फारच विसराळू बाई तुम्ही "त्यावर अधिक बोलणे शक्य नसल्यामुळे मी गप्प राहिलो आणि मग वाकणकरला अधिकच स्फुरण चढले.
" मग तर बाईसाहेब.पोर्चसाठी यलो ऑकरच घ्या̮ लाइट ग्रीन गाडी पोर्चच्या यलो ऑकर बॅक्ग्राउंडवर अशी काही खुलून दिसेल म्हणता " वाकणकर आनंदातिशयाने नाच वगैरे करू लागतो की काय असे क्षणभर मला वाटून गेले.
मात्र पोर्च हातचे गेलेच पण ड्रॉइंगरूम मात्र कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायची नाही असा ठाम निश्चय करून वादात उतरण्याच्या तयारीत बाबू दिसला पण तेवढ्यात सुमतीच्या डोक्यात कुठून किडा शिरला कुणास ठाउक आणि ती म्हणाली,
"अहो पण त्या मिसेस चिटणिसानी प्रत्येक भिंतीला वेगवेगळा रंग दिलाय तसे आपण केले तर ?" आता मात्र या सूचनेचा विचार झालाच तर चार भिंतींच्या चार रंगांविषयीच्या वादाचा निकाल बाबू आणि वाकणेकर यांच्या मुष्टियुद्धानेच लावावा लागेल अशी भीती ( आणि मुष्टियुद्ध पहायला मिळणार याचा आनंदही ) मला वाटू लागली.पण सुमतीच्या दृष्टीने योग्य असे चार रंग शोधून शिवाय ते घरातील पडद्यानाही मॅच होतील असे पाहून त्याला योग्य दारेखिडक्यांचे रंग शोधणे हे म्हणजे अगदी रेल्वे टाइमटेबल बनवण्याइतके किचकट काम झाल्यामुळे दोघेही तज्ञ त्यातून माघार घेतील असे मला वाटू लागले पण झाले भलतेच !चार रंगांचे नाव घेताच वाकणकरच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू लागला.
" अहो ती कोलीन बँटमची कलर सिस्टिम ! ती तर फारच छान आणि सोपीही !आता तुमच्या पसंतीचा कुठलाही रंग निवडा बाकीचे तीन भिंतींचे रंग,त्याना योग्य दारांचे खिडक्यांचे इतकेच काय पण मॅचिंग पडद्यांचे रंग याचे टेबलच दिले आहे बँटमने "
"त्याबद्दल बँटम या महापुरुषाचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. अगदी भारावून जात मी म्हणालो.पण माझा तेवढाही आनंद वाकणकरला पहावला नाही.व " बँटम ही बाई आहे पुरुष नाही साहेब" माझी चूक सुधारत तो म्हणाला "तेव्हा साहेब ड्रॉइंगरूमच्या एका भिंतीसाठी प्रेग लॅकी द्यायचा आणि त्याप्रमाणे बाकीचे कलर पहायचे ना?" बाबूकडे पहात तो म्हणाला. "नो नो,प्रेग लॅकी नाही लाइट प्रशियन ब्ल्यूच " आता आपला गड ढासळू द्यायचा नाही या दृढनिश्चयाने बाबू म्हणाला.
"तेच तेच साहेब बँटम ही फेंच स्त्री आहे आणि फ्रेंचमध्ये लाइट प्रशियन ब्ल्यूलाच प्रेग लॅकी म्हणतात."आणि बाबू विजयोन्मादाने हसला व वाकणेकरबरोबरच टेबल पाहू लागला.
"हे पहा ,प्रेग लॅकी,युलिस अपोपो,व्हेलो मॉनरो,पीटट केकी,हे चार रंग भिंतींना आणि खिडक्यांना सेकँट पॅमिलो.पडद्यांचे रंग नंतर ठरवू "
यापैकी एकाही शब्दातून रंगविषयक माझ्या ज्ञानात मुळीसुद्धा भर पडली नाही येवढेच काय पण बाब्या आणि सुमतीला तरी काही कळले असेल असे मला वाटले नाही.
" मग काय ठरले ना हे पक्के?" वाकणकरने खुंटा हलवून बळकट करण्याच्या उद्देशाने विआरले.पण पक्के हा शब्द ऐकताच एकदम सुमतीला काहीतरी आठवले आणि तिने विचारले,"पण हे सगळे रंग पक्के असतात ना हो ?"
" अगदी पक्के बाईसाहेब एक वेळ भिंत पडेल पण रंग जाणार नाही "वाकणकर अति नम्रतेने ! हाच प्रश्न मी विचारला असता तर मात्र वाकणकरन कुत्सित हास्य करत मलाच विचारले असते," साहेब, यापुढे घराला कधीच रंग द्यायचा नाही का?"
"आता तुमच्या खोल्यांची डायमेन्शन्स द्या म्हणजे त्याप्रमाणे कॉंप्यूटरवर बिलाचा आकडा कळेल .तेवढ्या रकमेचा चेक तुम्ही आम्हाला द्या मग आमचे कारागीर तुमच्याकडे येऊन रंगाचे काम करतील"
आम्ही खोल्यांची आणि पोर्चची मापे सांगितल्यावर वाकणकरनी सर्व माहिती कोम्प्यूटरला फीड केली आणि आलेला आकडा उच्चारला,"एटवनटूथ्रीफाइव म्हणजे एक्याऐंशीहजार दोनशे पस्तीस फक्त.त्यावर टॅक्स नियमाप्रमाणे जो बसेल तो."
"काय एक्याऐंशी हजार ?" मी शॉक बसल्यासारखा ओरडलो.आता सुमती त्यावर रंग द्यायचे रद्द करून बाहेर पडण्याचा काय तोडगा काढते इकडे माझे लक्ष होते.पण तो आकडा ऐकून तिने "काय फक्त एक्याऐंशी हजार?" असा उद्गार काढल्याचा भास मला झाला आणि भंरवशाचा बुरुजच ढासळल्याची खात्री पटली.इतकेच काय पण यावेळी घासाघीस करण्यातील आपले नेहमीचे कौशल्य न दाखवता सरळ तेवढ्या रकमेचा चेक फाडून देऊन तिच्या या क्षेत्रातील आतापर्यंतच्या उज्वल यशावरही तिने पाणी फिरवले. आणि दोनच दिवसानी रंगाचे काम सुरू करण्याचे आश्वासन घेऊन आम्ही घरी परतलो.
दोन दिवसानंतर मी ऑफिसमधून घरी परतलो तर आमच्या घराच्या पोर्चमध्ये एक व्यक्ती हातात भिंग घेऊन एकाद्या रहस्यकथेतील डिटेक्टिवप्रमाणे भिंतीची पहाणी करत असल्याच माझ्या निदर्शनास आले.भिंगातून पाहून तो भिंतीवर पेन्सिलीने मधून मधून खुणा करत होता.मी आत शिरताच मला पाहून "गुड इर्व्हिनिंग सर" म्हणून तो उभा राहिला तेव्हा तो कलर कॉर्पोरेशनचाच माणूस असल्याचे समजले."न्हिंत फार खराब आहे रावसाहेब" अस त्यान म्हटल्यावर तो रंग देण्याच्या दृष्टीने तो भिंतीची पहाणी करत होता हे माझ्या लक्षात आले.
" पण लोक थोडेच भिंत सूक्ष्मदर्शक भिंगातून बघणार आहेत? आणि उघड्या डोळ्याने भिंत काही एवढी वाईट दिसत नाही." अस मी त्याला समजावण्याच्या उद्देशाने बोललो,पण तेवढ्यात " अहो" अशी माझ्या काळजाचा थरकाप उडवणारी चिरओअरिचित हाक कानावर आली आणि मी आत गेल्यावर " अहो थोडेथोडके नाही चांगले एक्याऐंशीहजार हजार रुपये त्याच्या डोंबलावर घातलेत तेव्हा त्याने सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहूनच भिंत रंगवायला हवी,तुम्ही उगीच मधे पडू नका." असा सज्जड दम मला भरण्यात आल्यावर,'बर बाई,सूक्ष्मदर्शक भिंगातून पाहून दाढीच्या ब्रशने रंग दिला तरी माझी काही हरकत नाही"म्हणून मी माझ्या खोलीत शिरलो.
काम शक्यतो लवकर आटपा असा मी इशारा दिला त्यामुळे दुसऱ्या दिवशी काम सुरू करून रात्रंदिवस काम करून काम त्याच रात्री पुरे करू असे वाकणेकरनी फोनवरून सांगितले.त्या दिवशी रात्री त्यांच्यावर मी देखरेख करावी असा सुमतीचा प्रेमळ आग्रह होता पण मी त्यासाठी तज्ञ बाबूलाच बोलावण्याची सूचना मी केली आणि नौ वाजताच पांघरूण घेऊन घोरू लागल्यावर सुमतीचा नाइलाज झाला.
सकाळी मी जागा होतो तो श्रीकृष्णाच्या उशापायथ्याशी बसलेल्या दुर्योधन अर्जुनाप्रमाणे बाबू,वाकणेकर आणि सुमती याना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले पण मग वाकणेकरने "गुडमॉर्निंग" म्हणून रंगाचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले आणि मी तसाच उठून बाहेर गेलो.
येवढ्या गहन चर्चेनंतर व मला न समजणाऱ्या भाषेत झालेल्या निर्णयानंतर खरोखर रंग कुठले लावले गेलेत हे पहाण्याची मलाही उत्सुकता होतीच.
मोठ्या उत्सुकतेने मी पोर्चमध्ये पाउल टाकले तो काय पोर्चला साधा पिवळट रंग दिलेला."हाच का तो यलो ऑकर ?" "हाच का तो शिवाजी?" असे मिर्झा राजा जयसिंगला विचारणाऱ्या औरंगजेबासारखे मी वाकणेकरला विचारले.व त्यानेही तेवढ्याच आदबीने "येस सर" असं उत्तर दिले.दिवाणखान्यात प्रवेश केल्यावर मात्र तेथील रंगसंगती पाहून कुठल्याही शहाण्या माणसाला वेड लागल्याशिवाय रहाणार नाही असे मला वाटले.पण याही बाबतीत इतर सर्व बाबींप्रमाणेच सर्व हल्ल सुमतीस्वाधीन असल्यामुळे काहीच न बोलणे मी पसंत केले.
आज सुमतीच्या सख्या रंग पहायला येणार होत्या.त्यामुळे मी ऑफिसमधून येताच तिचा "मेरावाला क्रीम" म्हणणाऱ्या बाईसारखा फुललेला चेहरा पहायला मिळेल आणि मैत्रिणीने एअंगाचे केलेले कौतुक ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती.पण पहातो तो काय भरताऐवजी रामास राज्याभिषेक करण्याचा निर्णय दशरथाने घेतल्यावर कैकेयीने धारण केल्यासारखा चेहरा तिचा दिसत होता.काय झाले असावे याचा अंधुक अंदाज मला होताच पण त्याला मी जबाबदार नसल्याची खात्री असल्यामुळेच आवाजात अधिकच प्रेमळपणा आणत मी विचारले,"काय गं काय झालं? "
" सगळ्या सटव्या मेल्या, एकीला बँटम,चिकॅसो ही नावसुद्धा माहीत असतील तर शप्पथ,पण सगळ्यानी येवढ्यासुंदर स्कीमवर टीका करून माझा जीव अगदी बेजार केला"
"जाऊदे तू कशाला येवढ मनावर घेतेस त्यांच"
"ते काही नाही मी वाकणेकराना फोन करून कळवलय !"
"काय कळवले आहेस?"धडधडत्या अंत: करणाने मी विचारले.
" काहीनाही तुमचच म्हणण बरोबर होत हॉलला सौम्य निळा रंगच योग्य. बाबूनसुद्धा तसाच आग्रह धरला होता."
" हो पण तुझा नवऱ्यापेक्षा त्या वाकणेकरावर जास्त विश्वास"
"चुकलच माझ ! म्हणूनच वाकणकरला हा रंग बदलून सौम्य निळाच रंग द्यायला सांगितल सुद्धा."
""बघ"मी खूष होऊन "माझ अगोदरच ऐकल असतस तर?"
"नाहीतर काय त्या मेल्या वाकणेकरान या निळा रंग देयाच्या कामाचा पन्नास हजाराचा चेक नेला आहे."
आता बेशुद्ध पडायची पाळी माझी होती.
यातील रंगांची नावे कोणत्याही भाषेच्या कोशात शोधण्याचा प्रयत्न करू नयेत. सापडलीच तर तो योगायोग समजावा.

चल सजवाया तिजला - (मंगळ., १९/०६/२००७ - १४:४१)
हर हर दिन कसले आले मम भाषेला
कर्तव्य आपुले चल सजवाया तिजला
त्या ज्ञानेशा बाटे की जिंकी पैजा
अमृतास त्या ना आज चालतिल गमजा
आजला जरी कुणि रंक असो वा राजा
ही उपयोगाची नसते त्याच्या काजा
ती जुनाट झाली रत्नखचित तिचि लेणी
सावरकर वेडे बसले घासत वरुनी
उमजले न त्याना जुनाट हे उतरवुनी
चढवावी तिजवर सुंदर प्लास्टिक लेणी
देशमूख सी. डी. असेच वेडे असती
महाराष्ट्राकरता त्याग पदाचा करती
जरि थोडे वेडे असले होउन गेले
हातून तयांच्या काय चांगले झाले?
नवनवोन्मेषशाली प्रतिभेचे थोर
जे मनोगतावर करती आज विहार
त्या नव्या जगाला वाटे अवघड भारी
छानशा किती भाषासुंदरि शेजारी
ती तुमान सद्रा बेंगरूळ फेकून
ते शर्ट पँट ऐटीत बसा चढवून
कसले ते बाबा आई अन् आजोबा
ते मम्मी डॅडी ग्रँपा आगळी शोभा
सुप्रभात शुभरजनी हे बोजड भारी
गुडमॉर्निंग गुडनाइटची गोडी न्यारी
जे नवे असे ते सर्व चांगले दिसते
मंदीर पाडुनी गिरिजाघर बांधा ते
मग म्हणा पहा मी काय पराक्रम केला
कर्तव्य करूनी सजवियले मी तिजला
कर्तव्य आपुले चल सजवाया तिजला
त्या ज्ञानेशा बाटे की जिंकी पैजा
अमृतास त्या ना आज चालतिल गमजा
आजला जरी कुणि रंक असो वा राजा
ही उपयोगाची नसते त्याच्या काजा
ती जुनाट झाली रत्नखचित तिचि लेणी
सावरकर वेडे बसले घासत वरुनी
उमजले न त्याना जुनाट हे उतरवुनी
चढवावी तिजवर सुंदर प्लास्टिक लेणी
देशमूख सी. डी. असेच वेडे असती
महाराष्ट्राकरता त्याग पदाचा करती
जरि थोडे वेडे असले होउन गेले
हातून तयांच्या काय चांगले झाले?
नवनवोन्मेषशाली प्रतिभेचे थोर
जे मनोगतावर करती आज विहार
त्या नव्या जगाला वाटे अवघड भारी
छानशा किती भाषासुंदरि शेजारी
ती तुमान सद्रा बेंगरूळ फेकून
ते शर्ट पँट ऐटीत बसा चढवून
कसले ते बाबा आई अन् आजोबा
ते मम्मी डॅडी ग्रँपा आगळी शोभा
सुप्रभात शुभरजनी हे बोजड भारी
गुडमॉर्निंग गुडनाइटची गोडी न्यारी
जे नवे असे ते सर्व चांगले दिसते
मंदीर पाडुनी गिरिजाघर बांधा ते
मग म्हणा पहा मी काय पराक्रम केला
कर्तव्य करूनी सजवियले मी तिजला
बाबा,ते आले ना ! - (शनि., २६/०५/२००७ - १६:५८)
आमची मिनी म्हणजे एक वात्रट पोरगी आहे.पण तिचा वात्रटपणाही आम्हाला अशा कोड्यात टाकतो की तिच्यावर रागवावे की तिचे कौतुक करावे काही कळत नाही.एकदा तिला मंगळावर घेऊन जाण्याचा मूर्खपणा माझ्याकडून घडला होता तर तिथ ही पोरगी कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि सगळ्यांच्या तोंडच पाणीच पळाल कारण तिच्या स्पेससूटमध्ये दोन तास पुरेल एवढाच प्राणवायु होता .दीड तासाने ती कशी काय पण सापडली आणि मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.पण ती जेथे सापडली तेथेच मंगळावरील एक अगदी पुरातन संस्कृती नांदत होती तिचे अवशेष असल्याचा शोध लागला आणि तिला सगळ्यानी इतक डोक्यावर घेतल की तिला रागे भरणे शक्यच नव्हते.
दुसऱ्या वेळी कालयंत्राची चाचणी चालू असताना तेथे शिरण्याची दुर्बुद्धी मला झाली. ड़ो. श्रावस्तीने आम्हाला त्या कालयंत्रात किती काल मागे आणि पुढे जाता येते याची माहिती दिली आणि त्यावेळी कक्षात शिरून बटन दाबल्यास विसाव्या शतकात जाता येईल असे सांगितले.आणि चाचणीस कोण तयार आहे विचारले तर तेथील उपस्थित सगळे गप्प! तेवढ्यात ही मिनी कुठून आली कुणास ठाऊक आणि ," मी तयार आहे काका" म्हणून पुढे झाली.म्हणताच माझ्या तोंडचे पाणीच पळाले. " मिन्ये, मागे ये " मी लगेच ओरडलो. " तिला कसलाही धोका नाही प्रोफेसर मुळीच घाबरू नका " अस आश्वासन श्रावस्ती मला देत होता तर ही शहाणी पण म्हणतेय ' हो बाबा तुम्ही मुळीच घाबरू नका !" आणि मग सगळे मलाच हसू लागले.तोपर्यंत ही कालयंत्राच्या कक्षात शिरली , दरवाजा लावून घेतला आणि तिने बटन दाबलेसुद्धा ! डॉ. श्रावस्तीसुद्धा अवाक् होऊन बघतच राहिला. पण तरी सावरून तो म्हणाला ," काळजी करू नका प्रोफेसर ती तीन मिनिटात निश्चित परत येईल. ती तीन मिनिटे मला तीन युगासारखी वाटली सुदैवाने तीन मिनिटाने ती खरेच परत दिसू लागली आणि बाहेर आल्यावर आत आपण काय केले याचे इतके रसभरित वर्णन करू लागली की ती तीन मिनिटांच्या ऐवजी तीन दिवस तर कालयंत्रात नव्हती ना अशी शंका सगळ्यानाच यायला लागली पण त्यामुळे संपात अवकाशकेंद्राबर ती अगदी प्रसिद्ध झाली हे खरेच.
त्यादिवशी असेच झाले.मी ज्या संपात अंतराळसंशोधनसंस्थेत काम करतो तेथील काही काम पूर्ण करण्यास वेळ कमी पडल्यामुळे घरच्या संगणकावर करावे म्हणून एक डाटा सी ड़ी. मी घरी घेऊन आलो. नेहमीप्रमाणेच विद्या माझी पत्नी त्यावेळी घरी नव्हतीच.ती भारतीय भूगर्भ शास्त्र संस्थानमध्ये काम करते आणि तेथून घरी यायला कधीकधी तिला रात्रीचे नऊ वा दहा सहज वाजतात̱ घरात अर्थातच मिनी एकटीच होती.तिला शाळेत काही अभ्यासच नसतो की काय कुणास ठाऊक,तिचा बहुतेक अभ्यास चित्रवाणीसंचावरील शालेय कार्यक्रमातून आणि उरलेला संगणकावरच पार पडतो̱̱ गृहपाठही ती संगणकावर पूर्ण करून ई टपालने शाळेत पाठवते आणि तिच्या दुरुस्त्या आणि ग्रेडस तिला उलट ई टपाली मिळतात.त्यामुळे घरात बहुधा ती आणि तिचा यांत्रव खेळगडी चंद्रमोहन तथा चंदू असतो. त्यामुळे माझ्या कामाच्या सीड़ीज् ना हात न लावण्याची सक्त ताकीद मी मिनीला दिली आणि जरा चक्कर मारायला बाहेर पडलो.
आता चक्कर मारणे पूर्वीसारखे सोपे थोडेच राहिलेय ! त्यासाठी घराबाहेरील सरकमार्गावरून चांगले वीस पंचवीस किलोमीटर जावे लागते तेव्हा कोठे त्यासाठी राखून ठेवलेले मोकळे मैदान लागते.मी मैदानावर पोचलो तर आमचे बॉस डॉ.विजय पण तेथे आलेले दिसले.मला पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि माझ्याकडे येऊन ते म्हणाले
"बर झाल आपली इथेच गाठ पडली ते नाहीतर विडिओफोनवर मी तुमच्याशी बोलणारच होतो.आज ज्या सीडीज् तुम्ही घरी नेल्या आहेत त्या तशाच उद्या कामावर येताना घेऊन या कारण तुम्ही घरी गेल्यावर आणखी काही संकेततक्ते उपलब्ध झाले आहेत, त्यांचा उपयोग करून आपल्या प्रश्नाची अधिक चांगल्या प्रकारे उकल होईल असे वाटते."
हे ऐकून मला बरे वाटले कारण त्यामुळे उद्या कामावर जाईपर्यंत तरी माझ्या डोक्याची एक कटकट कमी होणार होती आणि मी शांतपणे झोप काढू शकणार होतो.त्यामुळे मनातून आनंदाने पण वरवर नाराज झाल्यासारखे दाखवून मी म्हणालो,
"अरेरे,त्या कामाची तड कुठल्याही परिस्थितीत आज लावायचीच अस मी ठरवल होत." "काही काळजी नका करू,रिलॅक्स " असे म्हणून विजय आपल्या रिंगणाकडे वळले आणि मी माझ्या! मोकळ्या हवेत फिरता येण्यासाठी शहरात एवढीच मोकळी जागा शिल्लक होती व त्यावर रिंगणे आखून ठेवलेली होती.आपल्याला फिरण्यासाठी रिंगण हवे असल्यास त्यासाठी रिंगणाचे आरक्षण करून ठेवावे लागे,सुदैवाने आमच्या कंपनीने आपल्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी काही रिंगणे कायमची राखून ठेवली होती त्यामुळेच मी फिरण्याचा विचार करू शकलो. शहराची लोकसंख्याच एवढी वाढली होती की फिरण्याकरता मोकळी जागा सापडणे ही अशक्यप्रायच गोष्ट होती.
राखीव रिंगणात पुरेशा चकरा मारून मी घरी पोचेपर्यंत विद्याही घरी आली होती. मी घरात शिरतानाच तिन प्रश्न केला ,
" कायरे मी ऐकले ते खर आहे का?"
तिने काय ऐकले ते मला कळण्यापूर्वीच त्याच्या खऱ्याखोट्याची शहानिशा करणे मला शक्य नव्हते पण त्या प्रश्नाचा उत्तरार्ध ऐकून जणु माझ्यावर बाँबगोळाच पडला,कारण ती पुढे म्हणाली,
" अरे वैनतेय ग्रहावरून कोण येतेय आपल्याकडे ?"
एवढी गुप्त गोष्ट हिला कशी कळली याच मला आश्चर्य वाटल कारण ही गोष्ट अगदी गुप्त ठेवायची आहे असे आम्हाला बजावण्यात आले होते त्यामुळे मी तिला झटकून टाकत उद्गारलो,
"छे छे काही तरीच काय बोलतेस ?"
" नाही हे मी बोलत नाही ती तुझी लाडकीच काहीतरी बडबडत होती,आम्ही काय भूगर्भात शोध घेणारी माणस आम्हाला अंतराळातल काय माहीत असणार ?'
मला टोमणा मारीत ती म्हणाली. पण काहीही असले तरी ही बातमी फुटणे हे फारच धोक्याचे होते.विशेषत: जर कुठल्या वार्तावाहिनीला नुसता सुगावा लागला असता तर त्यानी त्या बातमीचा एवढा पिच्छा पुरवला असता की वैनतेयवासीयानी आपला बेत लगेच रद्द केला असता.त्यामुळे याचा बभ्रा होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करणे मला आवश्यक होते त्यामुळे मी गडबडीने म्हणालो,
"ती पोरगी म्हणजे मिनीच ना? ती बडबडली असेल एकादी संगणकरचित कविता आणि तुला वाटले असेल--- असं कशाला तिलाच बोलवून विचारू या की" म्हणून मिनीलाच हाक मारून मी विचारले,"काय ग मिन्ये, काय म्हणतेय आई तुझी ---"
" हे काय हो बाबा,मला कशाला बोलावल आत,मी चांगली चंदूबरोबर स्पेसशटल गेम खेळत होते कंप्यूटरवर आणि आता त्याला मी गाठणार होते आणि तेवढ्यात तुम्ही मला बोलावून गेम पार बिघडवून टाकला. बर आता काय ते लवकर विचारा" मिनी फणकारली.
" बर बर खेळशील पुन्हा खेळ, पण तू आईला काय सांगत होतीस वैनतेयाबद्दल?"
" कुठ काय बाबा,तेच तुम्हालाही सांगतेय ना त्या ग्रहावरच मी चंदूला गाठणार होते ,माझ्या ग्रहाचे ते नाव आहे आणि चंदूच्या ग्रहाचे आहे खद्योत , आता या दुसऱ्या सूर्यमालेत ---"
" बस बस "तिला मधेच थांबवत मी म्हणालो आणि सुटकेचा निश्वास टाकत विद्याला म्हणालो "बघ, ऐकलेस ना झाल समाधान?"
" कार्टीच लक्षण काही खर नाही "टेबलावर ताटं घेत विद्या पुटपुटली.आणि माझा जीव भांड्यात पडला.कारण माझ्याकडे जे सध्या मह्त्वाचे काम होते ते वैनतेयवासीयानी पृथ्वीवर केव्हा आणि कोठे उतरतात याविषयीचे संदेश मिळवण्याचे होते आणि ते अगदी 'टॉप सीक्रेट' ठेवायच्या ऑर्डर्स मला होत्या त्यानुळे ही बातमी जरा जरी लीक झाली तर वैनतेयांनी पृथ्वीवर येण्यापूर्वी मलाच कुठल्यातरी परग्रहाचा आसरा घ्यावा लागला असता माझे आणि डॉ. विजय यांचे मैदानावरील संभाषण त्याच संदर्भात होते.देशोदेशीचे वार्ताहर त्या बातमीवर टपून बसले होते.ते माझा आणि विजय यांचा सारखा पिच्छा पुरवत होते,पण या प्रकारच्या आंतर्विश्वीय बातमीस अफवेचे स्वरूप येणे आणि नंतर आमच्या संस्थेचे हसे होणे हे कुणालाच आवडणार नव्हते त्यामुळे त्याविषयी जास्तीतजास्त गुप्तता बाळगण्यात येत होती.
सध्यापुरता माझा जीव भांड्यात पडला तरीही माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. शिवाय घरात चंद्रमोहन असताना विद्याने ताटे घेण्याचे काम करावे याचेही मला आश्चर्य वाटले व आज्ञाधारक नवऱ्याप्रमाणे तिला मदत करण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो "हे काय घरात चंद्रमोहन असताना ताटे घेण्याचे काम तुझ्याचकडे ?"
"अरे चंदू तरी काय काय करेल एक तर त्या पोरीला खेळवेल नाहीतर मला मदत करेल आणि तुला काय माहीत ती कार्टी माझा जीव किती खातेय.त्यामुळे तो तिला खेळवतोय ना तेच बर आहे.आता खेळली तर रात्री लवकर झोपेल आणि मला काहीतरी काम करायला मिळेल.पुढच्या आठवड्यात भरणाऱ्या कॉंफरन्ससाठी वाचायच्या पेपरसाठी थोड काम करायचेय.तुझा कंप्युटर मला आज वापरता येईल का ?"
" का तुझ्या कंप्युटरला काय झालेय?"
" त्या पोरीन त्याची वाट लावलीय,तिच्या कंप्युटरला मात्र मी हात लावला की येते अंगावर धावून आता आहे की नाही जुलुम ?"
"बघ मग माझ्या कंप्युटरवर काही जमतेय का. भाग्यच माझ डॉ. विजयनी आज घरी काम करू नका म्हणून सांगितलेय "
आणि पुढ मी तिला म्हणालो
. "मला वाटतेय आता आपण लॅपटॉप आणले पाहिजेत."
"त्यापेक्षा मलाच एक लॅपटॉप का आणून देत नाही बाबा म्हणजे तुमचाही कंप्युटर बिघडायला नको" मध्येच मिनीने तोंड वाजवले .तिच बर लक्ष असत आम्ही काय बोलतो त्याकड.
" म्हणजे तू माझा पण कंप्युटर वापरतेस की काय ? तरी तो मी लॉक केलेला असतो, त्याचा कोडवर्ड तुला माहीत नाही ना?"
" तिला कशाला हवाय कोडवर्ड ? तुझा कंप्युटर उघडणे हा तिच्या हातचा मळ आहे ,तुला काय माहीत ती बड्याबड्या हॅकर्सचे बारस जेवली आहे."
"काय सांगतीस काय ? माझा तर विश्वास नाही बसत यावर."
" बघ आई उगीच काहीतरी बाबांच्या डोक्यात भरवू नकोस"बाहेर पळ काढत मिनी म्हणाली
दुसऱ्या दिवशी संस्थेत प्रवेश करताच विजयचा भेटण्याविषयी निरोप आलाच.त्यानी त्यांच्याकडील नव्या माहितीच्या सीड़ीज् घेऊन मी कालच्याच कामाला पुढे सुरवात केली̱. गुप्ततेच्या कारणामुळे हार्ड ड्राइव्हवर कोणतीही माहिती ठेवायची नसल्यामुळे हा उपद्व्याप करावा लागत होता.मी घरी नेलेल्या सीड़ीज् अगोदर मी संगणकावर नक्कल करून घेताना तक्त्यांमध्ये काहीतरी गडबड आहे असे वाटू लागले.पण त्याचे कारण मात्र कळेना डॉ.विजयनी दिलेल्या सीड़ीज् आणि माझ्या या दोन्हींचा मेळही जमेना. हा घोटाळा कसा काय झाला याचा विचार करताना एकदम घरात विद्याशी झालेला संवाद आठवून माझ्या पोटात गोळा उठला.खात्रीने हे मिनीचेच काम. तरीच ती कार्टी काहीतरी वैनतेयविषयी बडबडत होती अर्थात आता हा सगळा गोंधळ निस्तरणे भाग होते आणि त्यासाठी डॉ. विद्याधरांच्या परवानगीने महासंगणकाची मदत घेणे भाग होते.
गेले कित्येक दिवस आमच्या महासंगणकावर सांकेतिक भाषेत काही अनाहूत संदेश येत होते.प्रथम काही दिवस आम्ही तिकडे दुर्लक्ष केले पण संस्थेचे संचालक डॉ. सुदर्शन यांच्या कानावर ही गोष्ट जाताच त्यानी त्याकडे दुर्लक्ष न लरता मुद्दाम स्वतंत्र कक्षच स्थापन करून सर्व संदेशांची छाननी करून योग्य ते निष्कर्ष काढण्याचे काम डॉ. विद्याधरांवर पर्यायाने माझ्यावर सोपवले. त्यातून वैनतेयवासी पृथ्वीवर येऊ इच्छित आहेत आणि तेही आमच्याच शहरात असा निष्कर्ष मी काढला होता अर्थात ही बातमी विश्ववार्ताहरांना किंवा आपल्या कुटुंबियानाही मुळीच द्यायची नाही अशी सक्त ताकीद आम्हा सर्वाना देण्यात आली होती कारण हे वैनतेयवासी येथे कशासाठी येत आहेत याची कल्पना कोणीच करू शकत नव्हते. सध्या पृथ्वीवर शांतता होती आणि ग्रहयुद्धाचा धोकाही दिसत नव्हता तरीही उगीच संशयास जागा ठेवायची नाही असा सुदर्शन याचा आग्रह होता.पंतप्रधानानाही अत्यंत गुप्त बैठकीत ही बातमी सांगण्यात आली होती.आणि त्यानी या बाबतीत लवकरच काय करायचे याचा निर्णय देण्याचे आश्वासन दिले होते.
आताच पंतप्रधानांचा संदेश आला होता,त्यानुसार वैनतेयवासियाना आमच्या शहरात प्रवेश करायला हरकत नाही असे कळवण्यात आले होते,अर्थात याविषयी विश्वप्रमुखांशी त्यानी चर्चा केलेली अस्णार हे उघडच होते. जागतिक अंतराळसंशोधन प्रयोगशाळेतील माहितीनुसार वैनतेय हा एक अतिशय छोटा ग्रह होता,(खरे तर त्यांच्या संदेशानुसार ते वैय्युपथानक्षारतेकिय अशा अगडबंब नावाच्या ग्रहावरून येत होते त्यातील काही अक्षरे घेऊन आम्ही त्याचे सुटसुटीत नामकरण केले होते)पण याहून अधिक माहिती मात्र उपलब्ध नव्हती,पण ज्याअर्थी ते पृथ्वीवर येण्याची परवानगी मागत होते त्याअर्थी त्यांच्याक्डून प्रूथ्वीवासियांना काही धोका संभवत नव्हता.पण हे प्राणी दिसतात कसे ,वागतात कसे याविषयी मात्र काहीही माहिती उपलब्ध नव्हती.त्यांच्याकडून मधून मधून येणाऱ्या संदेशांवरून त्याचा अंदाज घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो पण ते संदेश इतके त्रोटक आणि तुटक असत की त्यांचा अर्थ लावणे अवघड काम होते आणि तो काढलेला अर्थ कितपत बरोबर असेल याविषयीही आंही साशंक होतो.
घरी गेल्यावर मिनीची चांगलीच खरड काढायची असे ठरवूनच गेलो पण आश्चर्य म्हणजे मी घरी पोचलो तेव्हा विद्याही घरातच होती.आणि माझे पाऊल घरात पडताच तिचा पहिलाच प्रश्न होता,
" काय आले की वैनतेयवासी ?" आणि आम्ही एवढी गुप्त ठेवायचा प्रयत्न करत असलेली बातमी याना कशी काय कळली याचे आश्चर्य करायची पाळी माझ्यावर आली.
" काय लावलेय काय तुम्ही कालपासून?"माझ्याकडून तरी गुप्ततेचा भंग न होण्याची दक्षता घेत मी म्हणालो.
" हे पहा कोंबड झाकून ठेवल म्हणून उजाडायच थोडच रहाणार आहे,आता सांगून टाक ना सगळ,आणि तू नाही सांगितले तरी जिकडेतिकडे बातम्या पसरत आहेत.ती मिनी तर त्यासाठी मघापासून बाहेरच गेली नाही.ती तर म्हणतेय ते आपल्याच घरी येणार आहेत."
" त्या कार्टीचच हे सगळ काम ! कुठाय ती?"
"हे काय बाबा तुमच्याबरोबर कुणीच कस नाही? मला वाटल तुम्ही त्यांना घेऊनच येणार म्हणून मी माझ्या मैत्रिणीनाही बोलावले आहे त्यांच्या स्वागताला."
"तुला कुणी सांगितले हे सगळ?"
" सांगायला कशाला पाहिजे ? टी.व्ही. लावून पहा"
"सगळ्या वाहिन्या मघापासून दुसर काहीच दाखवत नाहीत." विद्या पण म्हणाली.
मी झटकन टी. व्ही. सुरू केला आणि खरेच जी बातमी आम्ही गुप्त ठेवायचा आटोकाट प्रयत्न करीत होतो ती अगदी दारोदार पोचली होती.ड़ॉ. सुदर्शन यांची वार्ताहरपरिषद दूरदर्शनच्या पडद्यावर दिसत होती.म्हाताऱ्यान आम्हा सगळ्याना चांगलच बनवल होत. सगळ्या कामाच श्रेय एकट्यानच उपटण्याची त्याला जन्मजात खोडच होती.
"डॉ. सुदर्शन,"एक वार्ताहर विचारत होता,"हे वैनतेयवासी न्यूयॉर्क, लंडन ,मुंबई अशी शहरे सोडून या आडरानात का उतरत आहेत?"
"हा त्यांच्या किंवा आपल्या ठरवण्याचा प्रश्न नाही." डॉ. सुदर्शन यांनी त्यांच्या नेहमीच्या लंबेचवडे उत्तर देण्याच्या शैलीत नोलण्यास सुरवात केली.
"पहिली गोष्ट म्हणजे ते वैनतेयवासी आहेत त्याना लंडन,मॉस्को,न्युयॉर्क, दिल्ली,यापैकी काहीही माहीत नाही.आता मी तुम्हालाच विचारले की वैनतेय ग्रहावर तुम्ही जाणार असाल तर कोणत्या शहरात जाल तर याला तुम्ही काय उत्तर द्याल?" असा प्रश्न विचारून त्या वार्ताहराचीच त्यानी फिरकी घेतली आणि मग तो गप्प बसल्यावर पुढे म्हणाले," असे करा हा प्रश्न ते येतील तेव्हा त्यानाच विचारा.माझा अंदाज--- कृपया अंदाज असे मी म्हणतो हे लक्षात घ्या नाहीतर डॉ. सुदर्शन वैनतेयवासियांच्या सदैव संपर्कात असून त्यांची कार्यक्रमपत्रिका त्याना मिळाली आहे असे तुम्ही लगेच प्रसिद्ध कराल किंवा एकाद्या वैनतेयवासिनीच डॉ. सुदर्शन यांच्यावर प्रेम बसल्यामुळे तिच्या आग्रहावरून ते येथे येत आहेत असेही छापायला तुम्ही कमी करणार नाही."
वार्ताहराला आपण पुरेस छळल आहे अशी खात्री झाल्यावर हसतहसत पुढे ते म्हणाले, " अहो तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायच असेल तर तुम्ही जवळचा मार्ग कोणता याचा विचार करता तसाच त्या बिचाऱ्यानी केला असेल आणि त्यांच्या ग्रहाच्या ज्या बिंदूपासून ते निघाले त्यापासून सुदैवाने आम्ही सगळ्यात जास्त जवळ असण्याची शक्यता असल्यामुळे ते इथे येत आहेत.बस एवढ साध आणि सोप उत्तर आहे त्या प्रश्नाच"
" वैनतेयवासींच्या आकृतिरेखा आणि आकारमान याविषयी आपण काय सांगू शकाल काय व त्यांच्या येथे येण्याचा हेतु काय असावा?" लगेच दुसऱ्या वार्ताहराला कंठ फुटला.
" त्यांच्या संदेशावरून केवळ मैत्रीपूर्ण भावनेतून ते येथे येत आहेत यात शंका नाही.त्यांच्या आकारमान आणि बाह्यरूपाविषयी काही सांगणे अवघड आहे कारण त्यांच्याकडून येणारे संदेश सांकेतिक भाषेत येत आहेत आणि मध्ये अनेक अडथळे असल्याने ते अतिशय अस्पष्ट आहेत त्यामुळे याविषयी कृपया मला माफ करा."
वार्ताहर परिषदेनंतर पंतप्रधानांचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला संदेश दाखवण्यात आला.त्यानी वैनतेयवासियांच्या स्वागतास सर्वानी तयार रहावयास सांगितले आणि हा आपल्या खुल्या आर्थिक धोरणाचा विजय असल्याचे जाहीर केले ,वैनतेयवासियांना भारताच्या आर्थिक धोरणात येवढा रस उत्पन्न झाल्याचे पाहून माझा ऊर आनंदाने भरून आला.
एवढे सगळे झाल्यावर मला गुप्ततेची शपथ पाळण्याचे काहीच कारण नव्हते,मी त्या दोघींना सांगून टाकले."ते उद्याच येत आहेत" आणि मला एकदम मोकळे झाल्यासारखे वाटले,त्या मिडास राजाच्या न्हाव्याला जसे राजाला गाढवाचे कान आहेत हे सांगितल्यावर वाटले अगदी तसे !
दुसरा दिवस अगदी जल्लोषात आणि वातावरण बेभान करतच उजाडला. शहरात जिकडेतिकडे जल्लोष चालू होता. सगळे शहर वैनतेयवासियंच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.मी बाहेर नजर टाकली तर मोठमोठे बलून्स हवेत तरंगत होते व त्यावर "वैनतेयवासियांचे स्वागत असो!"असे निरनिराळ्या भाषांतून लिहिले होतें. निरनिराळ्या संस्थांनी स्वागताच्या गाण्याच्या ध्वनोफिती इतक्या जोरजोरात लावल्या होत्या.की त्या आवाजाने कान किटून वैनतेयवासी पुन्हा परत निघून जातील अशी भीती मला वाटू लागली.
सर्व रस्ते गर्दीन ओसंडत असल्यामुळे कामाच्या जागी पोचायला नेहमीपेक्षा मला बराच उशीर झाला.मी पोचण्यापूर्वीच डो. सुदर्शन आपल्या जागेवर आलेले होते ," या आणि घ्या ताबा तुमच्या संदेशवाहकाचा,आताच त्यांचा संदेश आलाय तो मी घेऊन ठेवलाय, संदेश होता," आम्ही पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत आहोत." मी माझ्या संगणकावर काही संदेश येत आहेत का याची नोंद घेऊ लागलो. माझ्या संगणकावर सांकेतिक भाषेत एक संदेश दिसत होता,"आम्ही आमच्या उतरण्याच्या जागेपासून पाच अक्षांश आणि तीन रेखांश अंतरावर आहोत." पाच मिनिटातच पुढचा संदेश उमटला आम्ही उतरत आहोत .या जागेचे अक्षांश ३७ आणि रेखांश ५५ आहेत"
"म्हणजे ते शहरात आले आहेत" मी जवळ जवळ ओरडलोच कारण आमच्या शहराचेच ते अक्षांश रेखांश होते. डो. सुदर्शन अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागले.पण पुढे काहीच घडेना. संदेश येणे थांबले होते. एकदम विडिओफोनवर संदेश ऐकू येऊ लागला "आम्ही उतरलो ते स्थान एक जंगल आहे आणि एक टेकडी पण येथे दिसत आहे" मी लगेच डॉ. विजय आणि डॉ. सुदर्शन याना ही बातमी दिली.आमची संस्था शहरापासून दूर एका जंगलाच्या कडेसच होती आणि ते जंगल एका टेकडीच्या पायथ्याशी होते थोडक्यात वैनतेयवासी आमच्या संस्थेच्या मागील बाजूस कोठेतरी उतरले असणार. र्ड़ॉ. सुदर्शन यानी लगेचाच आमचा सगळा फौजफाटा डॉ. विद्याधरांच्या मदतीस देऊन आम्हा सगळ्यांना तिकडे पिटाळले. वार्ताहर तर केव्हाच तिकडे पळायला लागले होते.खरे तर या वार्ताहरांना जमले असते तर त्यानी वैनतेयावर जाऊनच त्यांना आणले असते. वार्ताहर पुढे गेल्यामुळे त्यांच्यापैकी काहीजणानाच वैनतेयवासी समजून आमच्या मागे असलेले वार्ताहर त्यांची मुलाखत घेतील असेही मला वाटून गेले.आमच्यापाठोपाठ स्वागतोत्सुक नागरिक, शाळाशाळांतून आलेले मुलांचे थवे,असे सर्वजण त्या जंगलात शिरले.या वैनतेयवासियानी आमच्या सुरक्षाव्यवस्थेची अगदी वाट लावून टाकली होती.
आम्ही सर्व जंगल पालथे घातले पण व्यर्थ ! वैनतेयवासी खरच आमच्या स्वागताच्या कल्लोळाने घाबरून परत गेले की काय,मी मनात म्हणालो.आणखी एका गोष्टीचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते ते म्हणजे या सगळ्या गोंधळात मिनीचा कुठेच पत्ता नव्हता.
सगळ्या शाळांच्या मुलांचे थवे दिसत असताना मिनी त्यात नाही ही आश्चर्याचीच गोष्ट होती.
वैनतेयवासी आणि मिनी दोघानीही आम्हाला चकवले होते.
घरी परतताना मी रस्त्यावरची गर्दी टाळण्यासाठी मोनोरेलने निघालो.त्यातील प्रवाशांच्यातही वैनतेयवासी न आल्याबद्दलच चर्चा चालू होती.
" काय चांगलीच निराशा केली या प्राण्यानी !" एकजण दुसऱ्याला म्हणत होता
"पण ते उतरले आहेत असा संदेश तर होता"
" मला वाटते ते अदृश्य स्वरूपात असावेत."
" अरे हो पण त्यांच यान तर रडारवर दिसल होत थोडावेळ आणि मग कुठ गायब झाल अस म्हणत होते. तिथले संशोधक "
" मग मला वाटत ते अँटिमॅटरचे बनले असावेत आणि आपल्या कक्षेत येताच गेले असतील संपून !"
" ए उगाच काही नको बडबडूस ."
मी घरात शिरलो तेव्हा मिनी घरातही बव्हती.पण माझ्या पाठोपाठच जणु ती घरात शिरली आणि मला अपेक्षित प्रश्न तिन विचारलाच
" बाबा ते आले ना?"
" कोण ?" तिची गंमत करावी या उद्देशान मी म्हणालो,
" दुसरे कोण ? आपण कुणाची कालपासून आतुरतेने वाट पहात होतो,ते जंगलात उतरले का?"
"मिन्ये तू जंगलात तर गेली नव्हतीस ?"मी दरडावून विचारले.
"उगीच का बिचारीवर ओरडतो आहेस?" बाहेर येत विद्या म्हणाली
" अग पण तू घरात कशी?" मी आश्चर्याने विचारले,
" अरे विसरलास की काय मी काल सांगितले ते,मला लंडनला एका परिषदेला जायच आहे त्यामुळे तयारी करण्यासाठी मला आज जरा लवकर घरी जायची परवानगी मिळाली. शिवाय अशा महत्वाच्या प्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी आपण घरी हजर नको का ?"
" वा,तू तर ते जणु ते आपल्याच घरी येणार आहेत अशा थाटात बोलत आहेस"
"ती पोरगी तसच काहीस म्हणत होती" आता मला काहीसा संशय आला
" मिन्ये खर सांग कुठ गेली होतीस तू ?"
" अगदी खर्र खर्र सांगते या चंदूला विचारा हव तर आम्ही फक्त बागेतच गेलो होतो आणि बागेत जायला तर बंदी नाही ना?"
" मिन्ये उगीच माझा अंत पाहू नकोस ,तू काहीतरी लपवत आहेस माझ्यापासून,इकडे सगळी मानवजात त्या वैनतेयवासींची वाट पहात आहे आणि तुला थट्टा सुचतेय ?"
"तुम्ही म्हणजे मानवजात का बाबा ?"
"मिन्ये आता मुकाट्याने सांगतेस की---"
" खर्र सांगू बाबा,ते आलेत."
" काय सांगतेस? कुठे आहेत ते ?"
"आमच्याचबरोबर आलेत"
मी मिनी आणि चंदूच्या मागेपुढे पाहिले तेथे तर कोणीच नव्हते
" तिकडे नका पाहू बाबा,इकडे पहा" हातातली फुलाची परडी माझ्यासमोर धरत मिनी म्हणाली ,त्या परडीत नुकतीच तोडलेली गुलाबाची सुंदर फुले दिसत होती,मी चक्रावून जात म्हणालो,"काय चेष्टा लावली आहेस मघापासून?"
" बघा बाबा मी त्याना अगदी फुलासारख जपून आणलेय म्हणत मिनीन फुलं थोडी बाजूस करताच एकदम त्यात दोन छोटे पाच ते दहा सेंटिमीटर उंचीचे प्राणी दिसले,त्यांच्या अंगावर छोटे छोटे स्पेससूटही होते आणि फुलांवरच्या दंवबिंदूनी त्यांचे चेहरे घामेजल्यासारखे दिसत होते. एवढ्या छोट्या जीवाना आमची बाग म्हणजे जंगल आणि त्यातील मातीचा छोटा ढिगारा एकाद्या टेकडीसारखा भासला यात नवल नव्हते.
" मला वाटल बाबा की हे परीकथेतील राजकुमार आहेत,आणि म्हणून मी त्यांना ----"
पण मिनीच वाक्य पुरे होण्यापूर्वीच पत्रकारानी आत येत विचारले,
"कुठ आहे ती चिमुरडी? वैनतेयवासी तिला भेटले असे कळलेय आम्हाला"

Subscribe to:
Posts (Atom)