Monday, August 2, 2010

मनूस विसरा - (मंगळ., ०३/०७/२००७ - २१:३५)

कशास करता पुन्हा आठवण मनू मनस्मृतिची
काय म्हणे तो नसे बरोखर चूक असे याची
मनूच जर अति पुराणकाळी वाचवि माशाला
नावेमध्ये घालुन तैसे मानवप्राण्याला
जर म्हणता तो मनू वेगळा  स्मृतीकार दुसरा
असे वेगळा  इक्क्षाकुकुळी आणखीच तिसरा
आणखीही किती मनू जाहले कुणास माहीत
वेळ बरा जातसे तयाना मूर्ख ठरवण्यात 
मनूस विसरा कुणी वाचली मनुस्मृती आज
सर्व जाणती दोन्हींचेही आज नसे काज  

No comments:

Post a Comment