सहा महिन्यासाठी भारताबाहेर राहण्यात माझ्या दृष्टीने महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या काळात इकडल्या कोठल्याही कार्यालयाचे तोंड पाहावे लागत नाही.इथल्या कार्यालयात मग ते कोणतेही असो ,जायचे म्हणजे माझ्या अंगावर अगदी काटा उभा राहतो. अगदी आपल्या आपुलकीच्या माणसांची अशी जाहिरात केलेल्या बँकेतसुद्धा जायचे माझ्या जिवावर येते.आता ए.टी.एम्. वर पैसे काढण्याची सोय झाल्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जायचे काम कमीच पडते म्हणा पण त्यामुळे तर कधीतरीच बँकेत जाताना छातीत आणखीच धडधडू लागते.ए. टी. एम् . मुळे प्रत्यक्ष बँकेत जावे लागले नाही तरी तेथूनही दूरनियंत्रणाने ग्राहकास छळता येतच नाही असे नाही. एकदा माझ्या मित्राने एका नामवंत बँकेच्या पुणे विद्यापीठ द्वारावरील ए. टी. एम्.मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण बहुधा यंत्रातील कॅश संपल्यामुळे किंवा आणखी कोणत्यातरी कारणामुळे पैसे काही मिळाले नाहीत मात्र जी स्लिप यंत्रातून बाहेर पडली त्यावरून पैसे खात्यातून मात्र वजा झाले होते.त्या बिचाऱ्याचे धाबे दणाणले.त्याने लगेच तेथूनच बँकेला फोन केला पण त्यांनी उलट निर्ढावल्यासारखे त्यालाच विचारले,"तुम्हाला पैसे मिळाले नाहीत कशावरून?"ते प्रकरण नंतर बरेच दिवस चालू होते.
मला मात्र एकदा कर्मधर्मसंयोगाने बँकेला छळण्याचा योग लाभला.त्यावेळी मी औरंगाबादला होतो आणि त्याच महान बँकेत माझे खाते होते.आणखी सुदैवाने माझे तेथील एका खिडकीधारकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मला पैसे काढायला काही त्रास व्हायचा नाही.त्यावेळी पैसे चेकने काढण्याऐवजी बँकेतील स्लिप भरूनच काढले जायचे.(आजही त्या बँकेचा आग्रह असतो की चेकचा कागद महाग असल्यामुळे पैसे स्लिपनेच काढा किती ही काटकसर !)त्यामुळे पासबुकच्या नोंदीवरूनच आपली शिल्लक(असलीतर) काय आहे हे कळायचे.माझे पासबुक संपले होते आणि मी मागणी करूनही मला नवे पासबुक मिळाले नव्हते तसे मी शाखाप्रमुखांच्याही निदर्शनास आणले होते.त्यामुळे माझ्या खात्यात शिल्लक आहे का नाही आणि असल्यास किती आहे याची कल्पना मला नव्हती. खिडकीवरील मित्राने शिल्लक असेल या कल्पनेने मला हवी ती रक्कम दिली आणि मी खिडकी सोडली.त्यानंतर माझी बदली औरंगाबादहून सोलापूरला झाली आणि मला त्वरित सोलापूरला जावे लागले.सोलापूरला मी थोडा स्थिरस्थावर होईतोवर एक दिवस अचानक आमच्या घरी त्या बँकेचे मॅनेजरमहोदय हजर झाले.मला आश्चर्यच वाटले कारण त्यांचा आणि माझा परिचय असला तरी लगेच सोलापूरला माझ्या घरी येऊन माझी गाठ घ्यावी इतका दृढ नव्हता.त्यांचे बँकेचे काम तेथे निघाल्यामुळे आलो अशी सुरवात करून अंदरकी बात नंतर उघड करत ते म्हणाले ," अहो,तुमच्या खात्यात रक्कम नसताना तुम्ही पैसे काढलेत आणि इकडे आलात आता आमची पंचाईत झाली आहे." यावर मी बँकेकडून नवीन पासबुक न मिळाल्यामुळे असे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणल्यावर आता झाले ते झाले पण आता लवकर पैसे भरून टाका अशी विनंती त्यांनी केली.मी बँकेला पत्र लिहून माझी चूक नसताना असे झाल्यामुळे मला शक्य होईल त्यावेळी आणि त्या पद्धतीने मी पैसे भरेन असे कळवले आणि तसेच केले.
भारतात कोणत्याही कामासाठी शासकीय वा निमशासकीय कचेरीत जायचे म्हणजे माझे मानसिक संतुलन तेथे जाण्यापूर्वीच आपल्याला कोणते अनुभव येणार या कल्पनेने बिघडायला सुरवात होते कदाचित हा माझाही दोष असू शकेल. कोणत्याही ऑफिसच्या खिडकीमागील व्यक्ती आपल्याकडे शत्रुवत् पाहत आहे असे उगीचच वाटते. तरुण वयात अंगात रग असल्याने अशा व्यक्तीशी आवश्यक असल्यास भांडण्याची खुमखुमी होती पण आता तो उत्साह उरला नाही. ऑफिस ऑफिस ही पंकज कपूरची मालिका जरा अतिशयोक्तिपूर्ण असली तरी त्यातील निरनिराळ्या ऑफिसात येणारा अनुभव बऱ्याच अंशी आपल्याला येणाऱ्या अनुभवांशी मिळताजुळता असतो.कोणत्याही ऑफिसात न जावेसे वाटण्यामागे हेच कारण असते. त्यामुळे अमेरिकेत अशा कामाविषयीचे काही अनुभव मुलाकडून ऐकल्यावर येथील सामान्य नागरिकाचा हेवाच वाटू लागला.
माझ्या मुलाला ग्रीनकार्ड मिळण्याच्या वेळी जन्मतारखेचा दाखला आवश्यक होता.आजपर्यंत त्याच्या एस्.एस्. सी. च्या प्रमाणपत्रावरील तारखेवर काम भागत होते पण आता मात्र येथील कार्यालयाला त्याचा जन्म ज्या तहसील वा ग्रामपंचायत क्षेत्रात झाला त्यांचाच म्हणजे सुजितच्या बाबतीत औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्यविभागाचाच हवा होता.जन्ममृत्यूच्या दाखल्याविषयी आकाशवाणीवरील (त्यावेळी टी.व्ही. ऊर्फ दूरदर्शन नव्हते) निवेदक कानीकपाळी ओरडत असतानाही नेहमीच्या आळशी प्रवृत्तीनुसार लगेच आवश्यक नसल्यामुळे त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र ताबडतोब घेऊन ठेवावे असे काही मला वाटले नाही. मुलांना शाळेत घालतानासुद्धा आम्हाला या दाखल्यांची जरुरी पडली नव्हती त्यामुळे सुजितचा जन्माचा दाखला आपण घेतलाच नाही याची आठवण जेव्हा त्याने आम्हाला फोन करून त्याची अडचण सांगितली तेव्हा झाली .त्याच्या एका मित्राचा जन्म सोलापूरला झाला होता त्यालाही अशीच अडचण उपस्थित झाली होती.आपापल्या महापालिकांमध्ये आम्ही पालकांनी बऱ्याच चकरा मारण्यासाठी कंबर कसली. कारण इतक्या पूर्वीचे प्रमाणपत्र मिळवायचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख शोधण्यासारखे इतिहाससंशोधनाचे काम होते आणि ते महापालिका कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे होते. त्यामानाने मी सुदैवी ठरलो कारण सुजितचा जन्म शासकीय रुग्णालयात झाला होता आणि सुजितच्या जन्माचे रेकॉर्ड रुग्णालयातून महापालिकेला गेल्याचा पुरावा उपलब्ध झाला त्याचा उपयोग होऊन शिवाय थोडासा हात मोकळा सोडल्यावर काम झाले.
सुजितच्या मित्राच्या वडिलांना म्हणजे माझ्या सोलापूरच्या मित्राला महापालिकेने बऱ्याच चकरा मारायला लावून शेवटी काही ताकास तूर लागू दिली नाही.त्यांचा लगेचच अमेरिकेस जाण्याचा बेत होता त्यामुळे बरोबरच प्रमाणपत्र घेऊन जायचे त्याने ठरवले होते पण आता ते शक्य नव्हते म्हणून त्यांनी अमेरिकेत गेल्यावर तेथे तसे शपथपत्र (ऍफिडेविट)करायचे असे ठरवले. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर अगदी प्रथम ते काम करायचे त्यांनी ठरवले.त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने नोटरीच्या कार्यालयात फोन करून अशा प्रकारचे ऍफिडेविट करावयाचे आहे त्यासाठी पूर्वसम्मती मागितल्यावर त्याला नोटरीने एका विशिष्ट दिवशी वडिलांना घेऊन येण्यास आणि काही कागदपत्र पुरावा म्हणून घेऊन येण्यास सांगितले. माझा मित्र त्या दिवशी सांगितलेल्या वेळी गेला. नोटरी त्याच्या टेबलावर सर्व कागदपत्र घेऊन वाटच पाहत होते.त्याची जी काही फी होती ती भरून पावती त्यांना दाखवल्यावर त्यांनी माझ्या मित्राच्या सह्या त्या ऑफिसने तयार केलेल्या कागदपत्रावर घेतल्या हे काम साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटात झाले आणि भारतात असलेल्या नोटरीच्या अनुभवानंतर देण्याघेण्याच्या वाटाघाटी काय करायच्या या चिंतेत असणाऱ्या मित्राला अधिकाऱ्यानेच "तुमचे काम झाले आहे आता तुम्ही जाऊ शकता" असे सांगितल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने नंतर मला हे सांगितल्यावर आपणही उगीचच महापालिकेच्या चकरा मारल्या असे वाटून गेले.
वरील घटना केवळ अमेरिकेत सामान्य नागरिकांना लहानसहान कामासाठी कसा त्रास होत नाही याचे उदाहरण म्हणून सांगितली.मात्र अशा सोप्या पद्धतीने गोष्टी होत असल्याने जन्माचा दाखला किंवा खोटे पासपोर्टसुद्धा दहशतवादी किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कसे मिळवतात याचे वर्णन ऑर्थर हेली यांच्या द इव्हिनिंग न्यूज या कादंबरीत वाचायला मिळाल्यावर सामान्य नागरिकास त्रास झाला तरी चालेल पण देशाचे नुकसान व्हायला नको या हेतूने प्रेरित झाल्यामुळेच भारतीय पालिका, पोलिस किंवा पासपोर्ट ऑफिसमधील कर्मचारीही आपले काम एवढ्या बारकाईने करतात हे ध्यानात येऊन त्यांच्या दक्षतेचे कौतुक करावेसे वाटले मात्र त्यांच्या या दक्षतेतून नेमकी नको असलेले (किंवा पोलिसांना हवे असलेले)लोकच कसे सुटतात हे कोडे मात्र उलगडले नाही.
अमेरिकेतील ऑफिसचा आणखी एक अनुभव माझ्या मुलाला मोटर चालन परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स) घेण्याच्या वेळी आला.त्याला भारतात चारचाकी वाहन चालवण्याचा कायम स्वरूपाचा परवाना होताच पण येथील नियम वेगळे शिवाय लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्यामुळे त्याला येथील आर. टी. ओ. (त्याला येथे डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेइकल्स म्हणतात)कडे जाणे आलेच.आमच्या घराजवळील ऑफिसला त्याने भेट दिली तेव्हा ते डी. एम्. व्ही. ऑफिस नसून एकाद्या छोट्या आय.टी.कंपनीचे ऑफिस असावे असे त्याला वाटले. आत शिरताच त्याला एक छोटा फॉर्म स्वागतिकेकडून मिळाला आणि तो भरून दिल्यावर लेखी परीक्षेसाठी एका संगणकाकडे त्याला पाठवण्यात आले. वाहन चालनाच्या नियमांविषयी ३० प्रश्न संगणकावर त्यांना विचारण्यात येतात आणि त्यातील ८०% प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे आवश्यक होते.माझ्या मुलाने अगोदरच तयारी केल्यामुळे त्याने २४ प्रश्नांची उत्तरे ओळीने बरोबर दिल्यावर त्याला पुढचे प्रश्न न विचारताच तू पास झाला आहेस असे संगणकावर सूचित करण्यात आले.त्यानंतर प्रत्यक्ष गाडी चालवण्यास सांगतील असे त्याला वातलए पण तसे काही न होता एकदम त्याच्या हातात परवानाच देण्यात आला,कारण त्याला पुणे आर.टी.ओ.कडून चारचाकी वाहन चालवण्याचा कायम परवाना मिळालेला होता आणि बहुधा पुण्यात गाडी चालवणारा जगात कोठेही गाडी चालवू शकेल याचा त्यांना विश्वास असावा. तसा परवाना नसलेल्या त्याच्या बायकोलाही काहीही कटकट न करता परवाना मिळाला मात्र तिला प्रथम शिकाऊ परवाना काढून काही दिवसांनी लेखी ( संगणकापुढील) परीक्षा देऊन प्रत्यक्ष गाडी चालवून दाखवावे लागले.
याच ऑफिसने एका स्त्रीला या टेस्टसाठी जवळ जवळ २५-३० वेळा यायला लावले होते आणि इतक्या चकरा मारायला लावल्यावर तिने टेस्ट व्यवस्थित दिल्यामुळेच तिला परवाना देण्यात आला असे एका बातमीत मी वाचले होते. कदाचित त्या तरुणीने आपले नाव गिनीज बुकमध्ये यावे या हेतूने असे मुद्दामच केले असल्यास न कळे.पण आणखी एक मजेची गोष्ट म्हणजे एकदा मोटर ड्रायव्हिंग स्कूलची फी भरली की परवाना मिळेपर्यंत कोणतीही ज्यादा फी न घेता त्या व्यक्तीला ट्रेनिंग द्यावे लागते म्हणे.आपल्याकडे मात्र एकदा फी भरली की एका महिन्यात तुम्हाला गाडी चालवता येवो अथवा न येवो मोटर ड्रायव्हिंग स्कूल परवाना मिळवून देण्याची हमीच घेत असते.काही वेळा तुम्ही टेस्ट न देताही परवाना घरपोच मिळतो इतक्या सुविधा असल्यावर उगीचच आर .टी. ओ.कडे जाण्याची तसदी कशाला घ्यायची?
अमेरिकन शासकीय कार्यालये जरी सामान्य माणसाचा असा विचार करत असली तरी काम बारकाईने आणि शक्य तेवढ्या कंटाळवाण्या पद्धतीने करण्याचा भारतीय बाणा आपण सोडायला तयार नसतो. याचा अनुभव आपल्या पर्वण्यांचे नूतनीकरणाच्या वेळी माझ्या मुलांना आला. न्यूयॉर्कमधील भारतीय [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]पासपोर्ट ऑफिससुद्धा कोणत्याही भारतीय शहरातील पासपोर्ट ऑफिसच्या तोंडात मारेल इतके गचाळ आणि तितकेच अकार्यक्षम आहे. न्यूयॉर्कमधील एका जुनाट इमारतीच्या तळघरातील दोन खोल्यांमध्ये हे थाटलेले आहे.[/float] पासपोर्ट आणि व्हिसासंबंधित वेगवेगळी कामे सांभाळण्यासाठी यात आठ खिडक्या किंवा टेबले आहेत,पासपोर्टचीच कामे जास्त असतात कारण भारतात जाण्यासाठी व्हिसा मागायला अमेरिकन नागरिकांची अजून गर्दी व्हायला सुरवात झाली नाही.(मध्ये एका पेपरमध्ये एक कार्टून आले होते त्यात रुपया इतका वधारलाय की भारतात जायला व्हिसा मिळत नाही याबद्दल एक अमेरिकन नागरिक खट्टू झाल्याचे दाखवले आहे`.)त्यामुळे खरे तर पासपोर्टचेच काम महत्त्वाचे असून त्यासाठी तीन खिडक्यांचा वापर करण्यात येतो आणि इतर बिनमहत्त्वाच्या कामासाठी बाकीच्या खिडक्यांचा! त्यामुळे पासपोर्टच्या खिडक्यांसमोर बऱ्याच लांब रांगा असतात बऱ्याच वेळा एवढ्या माणसांना उभे राहायला पुरेशी जागाही त्या ऑफिसात नाही.
पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी लागणारे सर्व कागदपत्र घेऊन आणि जुना पासपोर्ट घेऊन आपण त्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यावर रांग लावायच्या जागेपासून अडचणीस सुरवात होते इतकी ती जागा आकाराने लहान आहे,नेहमीप्रमाणे या खिडकीवर नको त्या खिडकीवर जा असे होऊन एका खिडकीवर कागदपत्र स्वीकारले जाऊन त्याची पावती मिळाल्यावर खास भारतीय पद्धतीनुसार आमच्या चिरंजीवांना एक आठवड्यानंतर पासपोर्ट न्यायला येण्यास सांगण्यात आले .आता परत एक दिवस रजा काढून येण्याऐवजी त्यातल्या त्यात प्रयत्न करायचा म्हणून त्यांनी सांगितलेल्या दिवशी ऑफिसमधून जरा लवकर निघून पासपोर्ट मिळतो का पाहावे असा त्याने विचार केला.पासपोर्ट ऑफिसमधील बऱ्याच खिडक्यांपैकी एकावर उभा राहिल्यावर त्याचा नंबर आल्यावर पावती पाहून ही पावती ज्या खिडकीवर मिळाली त्याच खिडकीवर जा असा सल्ला देण्यात आला.त्या खिडकीवर बरीच गर्दी होती शिवाय त्या रांगेतील पहिला क्रमांक खिडकीतून दिसणाऱ्या माणसाशी हुज्जत घालत होता त्याअर्थी आपले काम आज होत नाही अशी चिरंजीवांची खात्री पटली पण तेवढ्यात त्या खिडकीवर जास्त गर्दी आहे असे पाहून त्यावरील काही व्यक्तींनी शेजारच्या खिडकीवर जावे अशी सूचना करण्याचे सौजन्य दाखवण्यात आले खरे पण झटपट ती खिडकी गाठणाऱ्या माझ्या मुलाने ती पावती दाखवताच त्या खिडकीतील कर्मचाऱ्याने मात्र त्या सौजन्याची ऐशी तैशी असे म्हणत हा क्रमांक माझ्याकडे नाही असे म्हणून हात झटकले पण माझ्या मुलाने दोनच मिनिटापूर्वी तुम्हीच अशी घोषणा केली होती असे सांगितल्यावर आणि सुदैवाने शेजारील खिडकीतील व्यक्तीकडे त्या क्रमांकाचा पासपोर्ट होता हे ध्यानात आल्यामुळे त्याला तो मिळाला खरा पण पुढच्या लोकांना मात्र दुसऱ्या दिवशीच या असे सांगण्यात आले. हा अनुभव ऐकल्यावर आपण भारतातच आहोत असे वाटून गेले.तरीही आपल्याकडे पासपोर्ट नूतनीकरण म्हणजे अगदी पुनश्च हरी ओम् असा जो प्रकार असतो म्हणजे पुन्हा पोलिस चौकशी वगैरे सव्यापसव्यास तोंड द्यावे लागते तेवढा तरी येथे नसतो एवढीच त्यातल्या त्यात जमेची बाब!
माझा मामा.. श्री. श्याम गजानन कुलकर्णी यांनी मनोगतावर बरेच लेखन केले. वचण्यास अतिशय रोचक असे हे लेखन मनोगताच्या परीघाबाहेरीलही वाचकांनी वाचावेत यासाठी ते येथे संकलित करत आहे. या सर्व लेखनाचे आणि खासकरून "ज्ञानेश्वरी" चे केलेले भाषांतर/ अनुवाद याचे सर्व श्रेय पूर्णतः त्यांनाच जाते...
Monday, August 2, 2010
वारी १० - (मंगळ., ०४/१२/२००७ - २२:०३)
सुजित कामावरून आल्यावर घरात प्रवेश करताना एका हातात टपाल आणि दुसऱ्या हातात बराच छापील कागदांचा गठ्ठा घेऊन येत असे.संदेशवहनात इतकी प्रगती झाली तरी अजूनही अमेरिकन लोकांचा विश्वास टपाल खात्यावर आहे याचे कौतुक वाटले.आपल्याकडे मात्र टपालखात्याचे ९०% काम कुरियर सेवेनेच उचलले आहे.यात बहुतेक बँका,निरनिराळ्या कंपन्या यांचा समावेश होतो.एके काळी टपाल दिवसातून दोनदा आणि अगदी वेळच्यावेळी मिळत होते याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. लग्न ठरल्यानंतर भावी पत्नीला मी दररोज पत्र पाठवून बेजार करीत असे त्यामुळे नाइलाजाने चार ओळीचे का होईना उत्तर तिला पाठवावे लागे त्या काळात मी पाठवलेले एक पत्र दुसऱ्या दिवशी तिला मिळून तिने लगेच पाठवलेले उत्तर मला तिसऱ्या दिवशी देण्याचा चमत्कार पोस्ट खात्याने केला आहे. आमच्या पत्रवाचनातील आतुरता जणू टपालखात्याच्याही लक्षात आली होती.दुसऱ्या एका वेळी माझ्या बडोद्यात राहणाऱ्या बहिणीने माहेरपणासाठी घरी आल्यावर आपल्या पतिराजांना पाठवलेल्या पत्रावर सगळा पत्ता बरोबर लिहून बडोदा व पिन क्रमांक लिहिताना तिला कसली एवढी घाई झाली होती कुणास ठाऊक (कदाचित टपालपेटीतून टपाल निघण्याची वेळ झाली असावी) पण त्या जागी तिने फक्त " बी" एवढे एकच अक्षर लिहिले आणि तसेच पत्र पोस्टात टाकले आणि आश्चर्य म्हणजे पत्त्यातील खाणाखुणांवरून पोस्टखात्याने ते बी म्हणजे बडोदा असेल असा तर्क करून ते पत्र बरोबर इष्ट पत्त्यावर पोहचविले हे आम्हाला कळण्याचे कारण म्हणजे लगेचच दोन तीन दिवसात आमच्या मेव्हण्यांचे एक जाडजूड पकीत आले.खरेतर त्यांचाही बायकोसाठीच्या प्रेमळ शब्दांचा साठा माझ्याप्रमाणेच लग्नापूर्वी लिहिलेल्या पत्रांमध्येच खतम झाला होता असे असताना त्यांच्या त्या जाडजूड पाकिटाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले पण ते उघडून पाहिल्यावर बहिणीच्या पत्राचे पकीत(अर्थात तिने पाठवलेल्या पत्राचा कागद काढून घेऊन) त्यात त्यांनी ठेवलेले आणि पाहा कसा बावळटासारखा पत्ता लिहिला आहेस असा शेरा असलेले पत्र त्यात मिळाले.एकेकाळी असे कार्यक्षम असणारे टपाल खाते थोड्याच दिवसात इतके बिघडले की मी एकदा परगावी गेलो आणि परत यायला उशीर होईल अशी तार केली ती मी प्रत्यक्षात शनिवारी घरी पोचल्यावर मिळाली आणि ती वेळेवर न पोचवल्याबद्दल सौ. ने तक्रार करताच हजरजबाबी पोस्टमनने " त्यात शनिवारी पोचत आहे असेच लिहिले आहे ना ? " असा मुंहतोड जवाब दिला.अलीकडे पोस्टखात्याकडे मुदतठेवीव्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टींच्या विक्रीचेही काम सोपवून शासनानेच त्यांच्या मूळ टपालवितरण कामाकडे दुर्लक्ष करण्यास उत्तेजन द्यायला सुरवात केली आहे.
सुजितच्या सदनिकेच्या बाहेर असलेल्या पत्रपेटीत मात्र पोस्टमन अगदी नियमित टपाल टाकताना दिसे अर्थात त्यांना टपालखात्याची गाडी दिमतीस असे. आताही स्वतंत्र घरात राहायला गेल्यावरही तीच परिस्थिती आहे.मात्र त्यासाठी प्रत्येक घरमालकास घराबाहेर एक छोट्या खांबावर स्वतः ची टपालपेटी बसवावी लागते.आणखी एक चांगली बाब म्हणजे आपल्याला पाठवावयाचे पत्रही या पेटीवर ठेवल्यास ते तो पोस्टमन घेऊन जातो आणि पुढे ते योग्य ठिकाणी पाठवले जाते त्यासाठी पोस्टाची पेटी हुडकावी लागत नाही.पोस्टाच्या पेट्याही बऱ्याच ठिकाणी असतात आणि त्या चांगल्या दणदणीत मोठ्या असून आपल्याकडल्यासारख्या झाडाला अथवा एकाद्या घराच्या भिंतीला लटकवलेल्या नसतात.आपल्याकडील पेट्यांची अवस्था पाहून या पेटीत टपाल कसे टाकायचे याचाच पेच पडतो.पत्र आत घुसवताना ते न फाटता आत जाईल याची दक्षता घ्यावी लागते. लग्नपत्रिकांसारख्या आकाराने मोठ्या आणि संख्येने जास्त पाठवावयाच्या पाकिटांसाठी तर या पेट्या निरुपयोगीच असतात त्यासाठी पोस्टाच्या इमारतीत जाऊनच सगळी पाकिटे तेथील कर्मचाऱ्याच्या ताब्यात द्यावी लागतात.काटकसर जास्तीत जास्त कशी करावी हे आपल्या टपालखात्याकडून शिकावे कारण टपालकचेरीपासून टपालपेटीपर्यंत प्रत्येक गोष्ट कमीतकमी खर्चाचा आदर्श नमुना असते आणि तरी जनता म्हणते की सरकार उधळपट्टी करते चोराच्या उलट्या बोंबा दुसरे काय?
सुजितच्या हातातील कागदांचा दुसरा गठ्ठा असतो निरनिराळ्या मॉल्सच्या आकर्षक योजनांच्या भेंडोळ्यांचा ! एकावर एक फुकट हा प्रकार तर आपल्याकडेही अगदी सार्वत्रिक झाला आहे आणि नवनव्या शॉपिंग कॉम्प्लेक्सेसच्या उद्घाटनाबरोबर यांची संख्या वाढतच असते.इथल्या आणि आपल्या ऑफर्स यातील फरक एवढाच असतो की इथे त्यात फसवणुकीचा प्रकार कमी असतो किंवा नसतोच म्हटले तरी चालेल. घेतलेला माल परत घेण्याविषयी तर ते इतके तत्पर असतात की काही बहाद्दर भारतीयांनी भारतात जाताना नवा कॅंपकॉर्डर किंवा कॅमेरा घेऊन जाऊन तेथील मुक्कामात फोटो किंवा चित्रण करून महिन्याभरात येथे आल्यावर त्या वस्तू परत केलेल्या आहेत आणि काहीही प्रश्न न विचारता त्या परत घेतल्या गेल्या आहेत. कुठल्याही ट्रीपला जाताना ते असेच करतात असे त्यांनी मला अभिमानाने सांगितले.मला स्वतःला आलेला अनुभव म्हणजे मी एक घड्याळ एक डॉलरला मिळाले म्हणून घेतले पण घरी गेल्यावर त्यात काही दोष निघाल्यामुळे ते मी भीतभीतच परत करायला गेलो तर विक्रेतीने एक शब्दही न बोलता पावती पाहून एक डॉलर काढून दिला.थँक्स गिव्हिंग अथवा क्रिस्तमसच्या सेलनंतर तर वस्तू परत घेण्यासाठीच खास काउंटर उघडलेले असतात. वाढदिवसालाही भेटी देताना त्याचबरोबर वस्तूची पावतीही दिली जाते ज्यामुळे आपल्याला पसंत नसेल तर ती वस्तू बदलून घेता येते.महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे कोणतीही खरेदी करायला दूरच जावे लागत असल्याने केवळ वस्तू बदलून घेण्यासाठी दूर जाण्याचा कंटाळा येत नाही.
ऑफर्ससाठी लोक किती जीव टाकतात हे एका मॉलच्या थँक्सगिव्हिंग सेलच्या २२ नोव्हेंबरच्या खरेदीसाठी २१ तारखेच्या रात्री बारापासून लोक रांगा लावून उभे होते यावरून लक्षात येईल.एक महिला तर आठ महिन्याची गरोदर असून त्या मॉलपासून ३०-४० मैल अंतरावरून येऊन रांगेत उभी होती.तिला वॉशिंग मशीन अगदी स्वस्तात मिळाले म्हणे.बहुतेक होणाऱ्या बाळाचे कपडे घरच्याघरी धुता यावे यासाठी तिचा हा सगळा आटापिटा असावा. माझ्या मुलाने पण अश्याच एका ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी पहाटे पाच वाजता मॉलपर्यंत जाण्याचा विक्रम केला पण तोपर्यंत त्याला हवी असलेली वस्तू संपल्यामुळे त्याला हात हालवत परत यावे लागले,पण त्यात मजेची गोष्ट म्हणजे घरी आल्यावर सहज काँप्यूटरवर पाहत असताना तीच वस्तू ऑनलाइन खरेदीत त्याच कमी किमतीत उपलब्ध असल्याचे त्याला दिसले आणि त्याबे ऑर्डर नोंदवल्यावर खरोखरच दोन दिवसात ती वस्तू घरपोच मिळाली. आपल्याकडे मात्र अशा ऑफर्सची लालूच दाखवून ग्राहकांना आकर्षित करायचे आणि नंतर मात्र काहीतरी कारण दाखवून नको असलेली वस्तूच ग्राहकाच्या गळ्यात घालायची असे प्रकार होत असल्याचे आम्हाला आम्ही त्या भानगडीत पडत नसल्याने वृत्तपत्रातील बातम्यांवरूनच कळते. सिंहगड रस्त्यावरील मॉलमध्येच पेपरची रद्दी २५ रु.किलो या भावाने घ्यावयाचे आमिष दाखवून तेवढ्या रकमेची खरेदी त्या मॉलमध्येच करायला लावून त्यांना नको असलेला माल ग्राहकाच्या गळ्यात घालण्याचे प्रकार घडले आहेत.
मॉलमध्ये खरेदीस जाण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे तेथे वेळ फार जातो आणि गाडी पार्क करायला जागा मिळेल याची खात्री नसते.कधीकधी केवळ गाडी लावायला जागा न मिळाल्यामुळे खरेदीच रद्द करावी लागली आहे. एकदा सुजितसाठी जॅकेट घ्यायला गेलो, सुदैवाने गाडी लावायला जागा मिळाली या आनंदात आम्ही मॉलमध्ये शिरलो.त्याच्या मापाचे जॅकेट शोधायला जवळ जवळ अर्धा पाऊण तास लागला.ते सापडल्यावर सुजितला रेस्टरूमला जायची इच्छा झाली.एवढ्या शोधानंतर सापडलेले जॅकेट मग माझ्या हातात देऊन तो रेस्टरूममध्ये गेला आणि मी त्या जॅकेटचा हँगर हातात धरून वेड्यासारखा उभा , जवळ कुठे बसायलाही जागा नाही. सुजित आल्यावर त्याला आपल्याला पँटही घ्यायची आहे याची आठवण झाली,पुन्हा तेथे जॅकेटसह जाऊन अर्धा तास घालवला,हवी तशी पँट सापडल्यावर मग ती अंगावर घालून बघण्यासाठी तो ट्रायल रूममध्ये गेला तेथून परत येईपर्यंत परत मी जॅकेट घेऊन उभा ! सुदैवाने ती पँट त्याला बरोबर बसली मग त्यानंतर एक लहान मुलाचे जॅकेट आमच्या नातवासाठी घ्यायचे होते. सगळीकडे शोधले पण लहान मुलांचे कपडे कोठे दिसेनात अखेर मॉलमधील कर्मचाऱ्यास विचारल्यावर त्याने तो विभाग वरच्या मजल्यावर आहे असे सांगितले मग आम्ही मोठे जॅकेट आणि पँटचे ओझे वागवीत वरच्या मजल्यावर निघालो.तेथे परत जॅकेटचा विभाग शोधण्यात दहा पंधरा मिनिटे गेल्यावर सुदैवाने सापडलेल्या विभागात हवे असलेले जॅकेट पाचच मिनिटात सापडल्यामुळे आनंदाने आम्हाला अगदी आर्किमेडिजसारखे युरेका युरेका म्हणत नाचावेच वाटण्याचे बाकी होते पण एवढ्यावर कुठे भागणार होते त्याच विभागात असणाऱ्या काउंटरवर आम्ही बिल करून पैसे देण्यासाठी थांबलो पण तेथेही आमच्या अगोदर चारपाच मंडळी होतीच.त्या काउंटरवर खरे तर दोन स्त्रिया बिले करण्यासाठी होत्या पण त्यातील एक कोठेतरी गुप्त झाली होती,आमच्या पुढे असणाऱ्या रांगेत सर्वात पुढे असणाऱ्या भारतीय स्त्रीचेच बिल तेथे असणारी मुलगी अगदी शांतपणे करत होती.तो सेलचा हंगाम असल्याने आणि त्या पहिल्या स्त्रीने घरी येणाऱ्या भेंडोळ्यांचा इतका सूक्ष्म अभ्यास करून आपल्या दोन अपत्यांसाठी निरनिराळ्या कपड्याच्या तऱ्हा घेतल्या होत्या की तिचे बिल करण्यासाठी एका स्वतंत्र काउंटरचीच आवश्यकता होती. त्यात तिने निवडलेल्या कपड्यांना तिने गोळा केलेली सवलतीची तिकिटे लागू पडत नसल्यास लगेच ती तो कपडा नाकारत असे. अशा प्रकारे तिने नाकारलेल्या कपड्यांचा ढीग आम्हा मागे उभे असणाऱ्या सर्व ग्राहकांच्या एकत्रित खरेदीपेक्षा जास्त होता. शेवटी अर्धा तास वाट पाहिल्यावर एकदाचा तिचा ढीग संपला तरी परत बिलाच्या रकमेविषयी ती त्या क्लार्कशी हुज्जत घालत होतीच तिच्या आणि आमच्या मध्ये असणारे तीन [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]अमेरिकन ग्राहक बिचारे शांतपणे हा सर्व गोंधळ पाहत होते अर्थात आम्हीही भारतीय असलो तरी मनातल्या मनात तिला शिव्या देण्यापलीकडे काय करणार होतो?[/float]मधल्या तीन गिऱ्हाईकांनी मात्र आमच्यासारखीच अगदी मोजकीच खरेदी केल्यामुळे त्यानंतर पाच दहा मिनिटातच आमचा नंबर लागला आणि मी सुटकेचा श्वास सोडला पण तेवढ्यावर भागण्याचा तो दिवस नव्हता कारण सुजितने खरेदी केलेल्या जॅकेटवर किमतीचा शिक्का असणारा कापडाचा तुकडा तेवढा बरोबर नव्हता त्यामुळे आम्ही खालच्या मजल्यावर जॅकेट निवडले असल्यामुळे तेथील बिलकाउंटरवरच त्याचे बिल होईल असे आम्हाला सांगण्यात आले आणि मग आमची वरात खालच्या मजल्यावर आली सुदैवाने तेथील काउंटरवर दोन बिलिंग क्लर्क्स होते आणि दोघांच्याही पुढे एकएकच गिऱ्हाईक होते.त्यामुळे आमचा नंबर लगेचच लागला पण तेथील क्लार्कनेही सुजितचे जॅकेट उलटसुलट करून पाहत त्यावर किमतीचा शिक्का नसल्यामुळे आम्ही जॅकेट जेथून निवडले तेथे जाऊन तसलेच दुसरे जॅकेट घेऊन या त्याच्यावर असलेला किमतीचा शिक्का पाहून मग बिल करता येईल असे सांगून पुन्हा आम्हाला अगदी सापशिडीच्या खेळासारखे आरंभस्थानावर पाठवले.आता त्या एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आम्ही इतके फिरलो होतो की ते जॅकेट कोठे निवडले होते हे आठवण्यास आणि ती जागा शोधायलाही बराच वेळ गेला सुदैवाने त्याच प्रकारचे दुसरे जॅकेट तेथे होते हे आमचे भाग्य नाहीतर आम्हाला जॅकेट तयार करणाऱ्या उत्पादकाकडेच जावे लागले असते अश्या प्रकारे जवळजवळ दोन तासात तीन वस्तूंची खरेदी (जी मी सिंहगड रोडवरच्या दुकानात घरातून निघून पायी तेथे जाऊन अर्ध्या तासात करून घरी येऊ शकलो असतो)करून आम्ही विजयी मुद्रेने बाहेर पडलो.माझी परिस्थिती अगदी गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरू मेल हेलपाट्यानं त्यातल्या शिंगरासारखी झाली होती.इतके झाल्यावर जेव्हां सुजितला गाडी कोठे पार्क केली हे आठवेना ( साहजिकच आहे,एवढे उलटसुलट फिरल्यावर असे होणे)तेव्हा मी तेथेच बसकण मारण्याच्या परिस्थितीत होतो पण बसकण मारायलाही जागा नव्हती. अखेर कसेबसे गाडीपर्यंत पोचून घरी आल्यावर आता खरेदीसाठी कधीही न जाण्याचा निश्चयच जणू मी केला.

वारी ९ - (शुक्र., २३/११/२००७ - ०५:२१)
न्यू जर्सी एडिसन ला आल्यावर लगेच जेट लॅगचा त्रास होईल अशी अपेक्षा होती.पण तसे न होता उलट झोपच उडून गेली.कदाचित पुष्पक मधील कमाल हसनला गोंगाट नसलेल्या जागी झोप येत नाही तसे प्रदूषण -हवेचे आणि ध्वनीचेही- नसल्यामुळेच की काय कोणास ठाऊक .आमच्या पुण्याच्या सदनिकासंकुलात वाहनाच्या हॉर्नचा वापर एकमेकांना आव्हान करण्यासाठी केला जातो् आणि हा आपला वारसा अगदी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पासूनचा आहे.इथे अमेरिकेत आल्यापासून हॉर्नचा आवाज काढणे हे असभ्यतेचे समजण्यात येते की काय अशी शंका येते उगीचच हॉर्न वाजवल्याबद्दल शिक्षा होत असावी. आपल्याकडे कसे रस्त्यात रणशिंग फुंकत असल्यासारखे हॉर्न वाजवत वाहने चालवत असतात हॉर्न हे एकादे मनोरंजन करण्याचे किंवा कुणालाही घराबाहेर बोलावण्यासाठी वापरायचे साधन आहे अशी लोकांची समजूत असते. हॉर्नचा आवाज कमी वाटतो म्हणून की काय रस्त्यात निरनिराळी घोषणायुद्धे चालू असतात.ध्वनिप्रदूषणामुळे बरीच जनता बहिरी झाली असली तरी आपला हा छंद सुटत नाही. येथे मात्र सारे कसे शांतशांत वाटत होते.तीच गोष्ट प्रदूषणाची.आपल्याकडे पोल्यूशन तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या गाड्यातून आणि जवळजवळ सर्व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनातून धुराचे लोट बाहेर पडत असतात.येथे त्याचाही मागमूस नव्हता त्यामुळे आणि निघाल्यापासूनच्या दगदगीमुळे आणि नंतरही काही दिवस नीट झोप न लागल्यामुळे सर्दी आणि खोकल्याने मला बेजार करून टाकले तरीही दैनंदिन व्यवहार मी कसेतरी पार पाडत होतो.इन्शुअरन्स काढला असला तरी सर्दीखोकल्यासाठी डॉक्टरकडे जावेसे वाटेना,त्यामुळे नेहमीच्याच ज्या गोळ्या मी बरोबर आणल्या होत्या त्यांचा वापर आणि गरम पाण्याच्या गुळण्या, व्हिक्सची वाफ घेणे अशा उपायांचा अवलंब करूनच आपले दुखणे हटवण्याचा माझा इरादा होता आणि तेच योग्य होते हे पुढे माझ्या मुलाला सर्दीखोकला झाल्यावर येथील डॉक्टरांनी जो अंटिबायॉटिक्सचा मारा त्याच्यावर केला त्यावरून समजले.त्यादृष्टीने भारतात असणे खूपच फायदेशीर असते असे वाटले. येथे अगोदर इन्शुअरन्स असल्याशिवाय डॉक्टरकडे प्रवेशच नसतो म्हटले तरी चालेल.आणि परत डॉक्टरची अपोइंटमेंट मिळण्यापूर्वी रोग किंवा रोगी संपण्याची शक्यता असते.एकूण डॉक्टरांची वृत्ती लोकांना घाबरवण्याची असते आणि त्यामुळे आपल्या बुद्धीने उपचार करणे शक्यच नसते. त्यामुळे बरेच भारतीय आयुर्वेदिक उपचार सोयिस्कर, स्वस्त आणि खात्रीलायक असतात तेही करायला भारतातून गेलेल्या नव्या पिढीचे ( म्हणजे आमच्या पुढच्या ) लोक घाबरतात. अगदी लहानपणी मुलाला मधाचे बोट चाटवण्याची आपली भारतीय पद्धत तर इथे मधाची चवही वर्षाच्या आतील मुलास द्यायची नाही.तीच गोष्ट वरच्या दुधाची.आमच्या पहिल्या नातवाला गायीचे दूध चौथ्या पाचव्या महिन्यात आम्ही देऊ लागलो आणि त्याचा अमेरिकेत जन्मलेला धाकटा भाऊ मात्र वर्षाचा झाला तरी अजून पावडरचे दूधच -त्याला फॉर्म्युला म्हणतात म्हणे- पीत आहे. माझ्या सात वर्षाच्या नातवाची दाढ किडली ती काढण्यासाठी दंतवैद्याची ऍपॉइंटमेंट घेऊन मुलगा आणि सून त्याला घेऊन गेले तर तेथे दोन तास वाट पाहून डॉक्टरकडे गेल्यावर हा आता अडल्ट झाला आहे आणि त्याचा इन्शुअरन्स तो किड असताना काढला होता ,त्याचा इन्शुअरन्स ऍडल्ट या सदरात काढून ऍडल्टचे दात काढणाऱ्या दंतवैद्याकडे त्याला न्या अशी त्याची बोळवण करण्यात आली.आता ज्या दंतवैद्याला दात काढता येतात त्याला लहान मुलाचे दात काढणे काय किंवा मोठ्या माणसाचे काय काय फरक पडणार आहे ?मी तर माझे आणि माझ्या ह्याच नातवाच्या बापाचे ( तो त्यावेळी सात आठ वर्षाचाच होता ) एकाच डॉक्टरकडून एकाच बैठकीत ( किंवा खुर्चीत )काढून आलो होतो ( पहा मनोगत दिवाळी अंक अक्कलदाढ आली तर हा माझाच अनुभव)याची आठवण होऊन या डॉक्टरला काय म्हणावे असे म्हणून कपाळावर हात मारून घेतला. बर [float=font:nayanB;breadth:200;background:F3F2F0;color:CC6714;place:top;size:18;]पुन्हा ऍडल्टचे दात काढणाऱ्या डॉक्टरची ऍपॉइंटमेंट घेण्यासाठी इन्शुअरन्स कव्हर नाही त्यासाठी पुन्हा इन्शुअरन्स कंपनीला कळवून वाट पाहा. मला वाटते तोपर्यंत नातवाचा दात आपोआपच पडेल.[/float]
मेडिकल इन्शुअरन्स हा आणखी वेगळाच प्रकार आहे.त्यात काही गोष्टींचा समावेश होतो तर काहींचा नाही आणि हे आपण आजारी पडल्यावरच कळते. आपल्याला ज्या टेस्ट घ्यायला सांगतात त्याचा अहवाल आपल्या हातात पडत नाही तो सरळ ज्या डॉक्टरकडून औषधोपचार घेता त्याच्याकडेच पाठवला जातो.वैद्यकीय बाबींवर होणारा खर्च अगदी डोळे पांढरे करणारा असतो.अमेरिकेतच परिचय झालेले माझे एक मित्र हृदयविकाराने आजारी पडले आणि त्यानी इन्शुअरन्स काढला असूनही त्यांच्या उपचाराचा खर्च इतका झाला की त्यातील काही भाग अजून देण्याचे बाकी आहे असे त्यांच्या मुलाकडून आम्ही पुढच्या वारीवर आलो तेव्हां कळले.
येथे सदनिकेत आजूबाजूला कोण आहे याचा पत्ता कमीच लागतो,कारण दारावर नावाचे फलक लावण्याची पद्धत नाही.पण काही कारणामुळे अगदी शेजारी त्याचबरोबर आमच्या बरोबर खाली पण कोण राहते त्याचा पत्ता लागलाच.एकदा आमचे वॉशिंग मशीन बंद पडल्यामुळे सुजितने संकुल कार्यालयास फोन केला आणि त्यानी माणूस पाठवतो म्हणून सांगितल्यावर तो कामावर गेला.आमच्या भारतीय अनुभावानुसार सुजित घरी परत आल्यावरच किंवा त्यानंतरही काही वेळा फोन केल्याव्र माणूस ये ईल अशी अपेक्षा होती.पण थोड्याच वेळाने दारावरील बेल टरारली. अशा वेळी कोण येणार आणि तेही सुजित घरी नसताना तरीही आम्ही भीतभीत दरवाजा किलकिला केला.एक उंचापुरा गोरा माणूस दारात उभा राहून काहीतरी सांगत होता पण त्याचे इंग्लिश आमच्या कळण्यापलिकडले होते ,आता याला घरात घ्यायचे की नाही हा पेच आम्हाला पडला.सुदैवाने आमच्या शेजारच्या सदनिकेतील व्यक्ती बाहेर डोकावली आणि त्याने तो आलेला माणूस संकुल कार्यालयाने पाठवलेला आहे असे सांगितले.आमचे वॉशिंग मशीन बंद पडले आहे हे त्यानेच त्याला सांगितले.आलेल्या माणसाचे बोलणे तो स्पॅनिश असल्यामुळे आम्हाला कळले नव्हते.आमच्या शेजाऱ्याने दुभाषाचे काम केले आणि आमची अडचण दूर झाली. आमचा हा शेजारी मुंबईचाच होता आणि गुजराती असला तरी त्याला मराठी बऱ्यापैकी येत होते.पुढे त्याच्या आईची आणि माझ्या सौ. ची बरीच दोस्ती झाली. त्यानंतर तो मधूनमधून गप्पा मारू लागला. तरी घरी येऊन बसण्याची प्रथा नाहीच म्हटले तर चालेल.
आमच्या बरोबर खाली राहणारा पण भारतीयच होता पण त्याचा परिचय जरा वेगळ्या संदर्भात झाला.एक दिवस आम्ही दोघेच घरात असताना दुपारी जरा वामकुक्षी घेत असताना बेल वाजली.आम्ही आश्चर्याने दार उघडले तर एक साधारण पंचवीस वर्षाची भारतीय तरुणी दारात उभी."अंकल, यू आर मेकिंग नॉइज अंड आय कॅनॉट स्लीप" अस त्रासिक मुद्रेने ती म्हणत होती.आमच्या चालण्याचा आवाज होत असे हे खरे पण आम्ही चालत नसताना होत असेल असे वाटले नव्हते.तिला आम्हीही विश्रांतीच घेत होतो असे सांगितल्यावर चेहरा आणखीच वाकडा करून निघून गेली. सुजित ऑफिसमधून आल्यावर त्याला सांगितल्यावर तो म्हणाला,"तिला असे वर येऊन आपल्याला सांगण्याचे कारण नव्हते" ते प्रकरण तेवढ्यावरच मिटेल असे वाटले होते पण त्यानंतरही आम्ही एकदा रात्री उशीरा घरी आल्यावर त्या नवराबायकोला त्रास झाल्याचे नवऱ्याने आम्हाला वर येऊन सांगितले त्यावेळी सुजित असल्यामुळे त्याने त्याला "व्हाय आर यू इस्टर्बिंग अस? यू कॅन मेक कंप्लेंटटू अपार्टमेंट ऑफिस" असा दम दिला.ते एक सिंधी जोडपे होते. पुढे पुढे आम्ही चालू लागलो की ते खालून छतावर काहीतरी आपटून आवाज काढायचे.थोडक्यात आमचे अघोषित ध्वनियुद्धच चालू झाले पण त्याचा शेवट कसा होईल याचाच आम्ही विचार करत असताना आश्चर्य म्हणजे एकदिवस खरोखरच आम्हाला संकुलकार्यालयाकडून पत्र आले आणि त्यात तुमच्याखाली राहणाऱ्या भाडेकरूला छतावर आवाज करून तुम्ही त्रास देता आणि अशी तक्रारपुन्हा आल्यास तुम्हाला सदनिका सोडावी लागेल" अशी नोटिस आली. त्यानंतर आम्ही ते पत्र घेऊन सदनिका कार्यालयात गेलो तेव्हा तेथे असलेल्या सदनिका प्रतिनिधी ती एक तरुण स्त्रीच होती आम्हाला धीर देऊन "असा आवाज येतच असतो याची आम्हाला जाणीव आहे" असे सांगितले.त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो तरीही आमच्यासारख्या नवागतांची झोप काही दिवस उडवायला ती घटना पुरेशी झाली. भारतात शासकीय गृहसंकुलात राहत असताना शेजाऱ्यांशी भांडण्याचे काही प्रसंग आले होते पण त्यामुळे घरातून हकालपट्टी होण्याची ताकीद मिळाली नव्हती.तेथे आपली भांडणे आपाआपसात मिटवावी असा शासकीय दृष्टिकोण होता.आबानी अशावेळी तंटामुक्त गाव तशी तंटामुक्त सदनिकेची योजना लागू केली असती.पण येथे मात्र या कारणामुळे लहान मुले असणाऱ्या पालकांना वरच्या मजल्यावर राहणे ही शिक्षाच वाटत असणार असे वाटले.
आम्ही येथे आल्यापासून आणखी एक महत्त्वाची जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे वीज पाणी आणि फोन अखंड चालू होते ते कधी बंद आहेत असे जाणवले नाही.भारतातून येणाऱ्याना ही गोष्ट खासच जाणवणार विशेषतः नियमित भारनियमनाला तोंड देणाऱ्या आम्हाला तरी.भारनियमनामुळे बराच वेळ वाया जातो हे खरेच पण गप्पा मारायला तो एक महत्त्वाचा विषय मात्र असतो आणि त्याबाबतीत आम्ही पुण्याचे लोक त्याहूनही मुंबई (उपनगरातील नव्हे)चे लोक किती भाग्यवान आहोत याचा टेंभा मरवण्यातील शान काही औरच ! आम्ही येथे आल्यावर एकदाच काय ती वीज गायब झाली पण तरीही सुजितकडे गरम पाणी गॅसच्या बॉयलरवरच होत असल्याने आम्हाला ती गोष्ट विशेष जाणवेपर्यंत वीज पुन्हा सुरूही झाली.पुण्यात अलिकडे भारनियमन बरेच कमी प्रमाणात असले तरी त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे कामाचेही तंत्र बसवावे लागते.केबलवाल्याचे आणि आमचे भारनियमन वेगवेगळ्या वेळात असल्याने दूरदर्शन दुप्पट काळ बंद असते.या सगळ्या गोष्टींच्या अभावामुळे बरेच वाटले. सुजितच्या घरातच वॉशिंग मशीन असल्यामुळे कपडे हवे तेव्हां धुवून टाकता येत होते त्यामुळे कपडे धुणारी बाई आली आता अंघोळ करून घ्या असा लकडा लावण्याचे सौ. चे सौख्य हिरावले गेले होते आणि माझी एक डोकेदुखी कमी झाली होती!काही सदनिकांत स्वतंत्र वॉशिंग मशीन नसते त्यांच्यासाठी सार्वजनिक वस्त्रस्वच्छता केंद्र संपूर्ण संकुलासाठी असून त्यात बरीच यंत्रे ठेवलेली असतात आणि ठराविक रकाम देऊन तेथे कपडे घेऊन जाऊन ठराविक रक्कम देऊन कपडे धुवून घेता येतात.आमच्या जवळील गुजराती बहुल वसाहतीत ही सोय होती.प्रथम त्यात काही नाणी टाकून यंत्र वापरण्याची सोय होती परंतु गुजूभाईनी त्यातून शक्कल काढून अमेरिकन नाण्यांच्याच आकाराची भारतीय नाणी टाकून स्वस्तात कपडे धुवून घेण्याची क्लुप्ती योजल्यामुळे ती व्यवस्था बंद करून सरळ सरळ प्रथम कपड्यांच्या आकारमानानुसार रक्कम घेऊनच यंत्र वापरण्याची परवानगी देण्यात येते.तेथे बराच वेळ जात असल्यामुळे बरेच लोक आठवड्यातून एकदा अगर दोनदाच कपडे धुण्याचा उपक्रम करतात.

वारी ८ - (शुक्र., १६/११/२००७ - ०५:१७)
आम्ही गेलो तो मे महिना असल्यामुळे हवा बरीच उष्ण होती. सकाळी तर कडक ऊनही असे.एक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश पडला असताही सुजित छत्री घेऊन कामावर निघाला हे पाहून मी आश्चर्याने त्याला छत्री घेण्याचे कारण विचारले तर त्याने संध्याकाळी पाऊस येणार म्हणून ही खबरदारी असे सांगितले.आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी तो कामावरून आला त्यावेळी खरेच धोधो पाऊस कोसळत होता. यावरून पुण्यातील सिमला ऑफीस ऊर्फ ऑब्झर्वेटरीविषयी मला एकाने सांगितलेला किस्सा आठवला.पुण्यातील वेधशाळाचे कार्यालय इंग्रजांच्या काळी सिमल्यास होते म्हणे.त्यावेळी जो व्हाइसरॉय होता त्याला एकदा त्याच्या खास दोस्ताना पार्टी द्यायची होती आणि ती त्याच्या बंगल्याच्या पटांगणात ! त्यामुळे वेधशाळाप्रमुखाला फोन करून त्याने पार्टीच्या दिवशी संध्याकाळी हवा कशी असेल याविषयी विचारणा केली त्यावर त्याने साहेबांचे काम म्हणून जरा पहाणी करून सांगतो असे सांगितले.थोड्या वेळाने त्याने साहेबांना फोन करून "काही काळजीचे कारण नाही हवा एकदम स्वच्छ राहणार आहे पाऊस पडणार नाही "असे सांगितले. साहेबानी मग पार्टीचे निश्चित करून मित्रांना आमंत्रणे दिली.पार्टीच्यादिवशी सकाळी साहेब फिरायला बाहेर पडले असता त्यांना एक लमाण आपली गाढवे हाकीत रस्त्यावरून जाताना दिसला.त्याने साहेबाच्या बंगल्यासमोरील गडबड पाहिली होती.आणि उत्सुकतेने दरवानाला त्यामागचे कारणही विचारले होते.त्यामुळे साहेबाला पाहून आदबीने नमस्कार करून तो लमाण म्हणाला,"साहेब आज संध्याकाळी पाऊस येणार आहे.""तुला कसे कळले?" साहेबाने विचारले." माझ्या गाढवांना कळते पाऊस येणार असेल तर."त्याचे उत्तर ऐकून साहेबाला हंसू आवरेना तरीही घरी परत आल्यावर त्याने वेधशाळाप्रमुखास फोन करून खरच पाऊस येणार नाहीना याची चौकशी केली.आणी त्याला पाऊस निश्चित येणार नाही अशी ग्वाही मिळाली.त्यामुळे साहेब निश्चिंत झाले.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी पार्टी रंगात आल्यावर अगदी धोधो पाऊस आला आणि पार्टीच्या रंगाचा नेरंग झाला. साहेब एकदम संतापले आणि त्यानी वेधशाळेचे ते ओफिसच तेथून उचलून पार पुण्यात नेऊन टाका असा हुकुम दिला.तेव्हापासून म्हणे वेधशाळा पुण्यात आली सिमला ऑफिस या नावामागचा इतिहास असा आहे म्हणे ! आंतरजालावर पाहता खरोखरच १९२८ मध्ये शिमला ऑफिस पुण्यात स्थलांतरित झाल्याचा उल्लेख वाचून कदाचित गोष्ट खरीही असेल असे वाटले आणि अजूनही त्यांनी आपली चुकीचे भाकित करण्याची परंपरा मात्र सोडली नाही हे लक्षात आले..त्यामुळे वेधशाळेने पाऊस पडणार नाही असा हवाला दिला की लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतात.येथे अमेरिकेत मात्र हवामानाचा अंदाज क्वचितच चुकल्याचा अनुभव मला आला. अगदी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी किती तपमान असणार याविषयीचा अंदाजही आठवडा आठवडा अगोदर वर्तवला जातो आणि तो क्वचितच चूक ठरतो.आणि न्यू जर्सीतील हवा तर इतकी बेभरवशाची आहे की योग्य भाकीत आवश्यकच आहे.माझ्या मुलाने सांगितले की इथल्या हवेविष्यी असे म्हणतात If you donot like NJ weather wait for five minutes you will get good weather.यामागची अतिशयोक्ती सोडली तरी हवा फारच सारखी बदलत असते हे मात्र खरे.
अमेरिकेत गेल्यावर वेळ घालवणे हा एक अवघड प्रश्न असतो असे पूर्वानुभवींचे मत होते. वेळ घालवणे याबाबतीत माझ्याच पेशातील एका सेवानिवृत्त मित्राची भूमिका मला पटत नसली तरी मजेशीर वाटते.त्याना "वेळ कसा घालवता बुवा तुम्ही ?" असे विचारल्यावर त्यांचे नमुनेदार उत्तर असते " वेळ घालवण्यासाठी आपल्याला काय करावे लागते बुवा? आपण काहीही केले नाही तरी वेळ जातच असतो,त्याला थोडेच हाताला धरून चालवावे लागते ?" याच मित्राने कामाच्याही बाबतीत आपली भूमिका अशीच परखडपणे माझ्यापुढे मांडली होती. तो सेवानिवृत्त झाल्यावर एकदा फिरताफिरता त्याची गाठ पडली असता मी " काय गुरुजी आता काय आराम ना?" असे विचारल्यावर लगेच त्याने "मग इतके दिवस काय करत होतो?" असे हसत हसत मलाच विचारले होते.
तरीही अमेरिकेत मुलांकडे येणाऱ्या आमच्यासारख्या सुट्टीवर आलेल्या ज्येष्ठ मंडळीना वेळेचा सदुपयोग कसा व्हावा याची काळजी असतेच.ड्यूटीवर म्हणजे मुलीच्या अथवा सुनेच्या प्रसूतीसाठी आलेल्याना अथवा लहान नातवंडे असणाऱ्यांना वेळ पुरतच नाही.जवळपास फिरण्याव्यतिरिक्त स्वतंत्रपणे बाहेर पडण्याची शक्यता नसते कारण आम्ही गाडी चालवू शकत नाही. माझ्या एका मित्राने भारतात गाडी चालवता येत असल्यामुळे इथे गाडीचालनाचा परवाना घेतला होता पण गाडी वापरण्याचे धाडस काही केले नाही. वाहतुकीची उलटी पद्धत आपल्या चटकन अंगवळणी पडत नाही.[float=font:sagar;size:20;breadth:200;place:top;]इतक्यावेळा अमेरिकेत आलो तरी रस्ता ओलांडताना माझी मान प्रथम डावीकडेच वळते.त्यामुळे समजा चुकून मी गाडी चालवली तर सारखे माझे लक्ष आपल्याला डावीकडून कोणी ओलांडतो का याकडेच राहील.[/float] शिवाय येथे रस्ता चुकला तर उलट वळण्याची सोय नाही.एकादा बाह्यमार्ग (एक्झिट) चुकला तरी मोठा फेरा पडायचा. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था येथे जवळजवळ नसल्यासारखीच असते. पुण्यातही आम्ही पी. एम् . टी. बसने प्रवास करण्याचे धाडस करत नाही पण रिक्षावाले आमच्या मदतीस सदैव तयार असतात.
मी येताना वाचण्यासाठी काही मराठी पुस्तके घेऊन आलो होतो आणखी एक चांगले साधन म्हणजे त्यावेळी आपल्याकडे नुकतेच मूळ धरू लागलेले ब्रॉडबँड इंटरनेटचे ! मी येथे येईपर्यंत त्याचा वापर विशेष केला नव्हता पण येथे आल्यावर मुलाने लगेचच माझे याहूमेलवर खाते उघडून दिले आणि मला जणू अलिबाबाची गुहाच उघडून मिळाली.मला माहीत असलेल्या सर्वांना मेल करण्याचा मी सपाटा लावला.माझ्या सपाट्यात माझे विद्यार्थी,माझ्या मित्रांची मुले असे बरेच जण सापडले.एका याहू खात्याची आद्याक्षरे ओळखीची वाटली.तो माझ्या मोठ्या मुलाचा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मित्र आणि माझा विद्यार्थी असावा असा अंदाज करून मी त्याला मेल केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तातडीने त्याचे उत्तरही आले. मी माझ्या मुलास सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटले.पण नंतर तो समजुतीचा घोटाळा आहे असे कळले कारण त्याचे नाव जसे मला परिचित होते तसेच माझे नावही त्याच्या परिचितांपैकीच होते.प्रत्यक्षात आम्ही दोघेही परिचित नव्हतो. परिचितांपैकी अमेरिकेत वास्तव्य करणारानी लगेचच प्रतिसाद दिले. मात्र त्या मानाने भारतातील मित्रा, नातेवाईकांचा प्रतिसाद हवा तेवढा मिळाला नाही.भारतातील आमच्या वयाच्या नागरिकांत अजूनही या साधनाविषयी हवी तेवढी जागृती नाही हेच खरे अगदी अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना संगणक विभागातच काम करणारे माझे मित्रदेखील आता सेवानिवृत्तीनंतर संगणकाचा उपयोग शेअर्सच्या उलाढालीव्यतिरिक्त फारच कमी करतात. टेलिफोन किंवा विद्युतबिले भरावयास सुद्धा ते त्या बिलभरणाकेंद्रातच जाणे ते पसंत करतात.( काही लोकांच्या मते तेवढाच वेळ चांगला जातो) मुख्य म्हणजे असलेले मेलचे खाते उघडून पहाण्याची तसदीसुद्धा ते घेत नाहीत त्यामुळे मला त्यांच्या अमेरिकेतील नातेवाइकाना फोन करून मी त्याना मेल केले आहेत हे कळवावे लागले.असे का घडते कळत नाही.मीही अमेरिकेत आलो नसतो तर माझेही वर्तन असेच झाले असते का माहीत नाही.पण अमेरिकेत येऊन गेलेल्या मित्रांचाही या साधनाचा फार वापर करण्याकडे कल दिसला नाही. माझ्या एका मित्राने ब्रॉडबँड कनेक्शन मिळाल्यावर मला मेल पाठवून सळो की पळो करण्याची धमकी दिली पण प्रत्यक्षात मीच त्याच्यावर त्या अस्त्राचा वापर करून त्यालाच सळो की पळो केले.आणि आपले अस्त्र बूमरंग झाल्याची जाणीव करून दिली. या बाबतीत भारतातील सततचे विद्युतभारनियमन आणि बी.एस.एन. एल. चा लहरीपणा हेही कारण असू शकेल. येथे मराठी पेपर वाचण्यासाठीपण आम्हाला इंटरनेटचा उपयोग होत होता, आणि भारतातील बातम्या तेथील लोकांना कळण्यापूर्वी आम्हाला कळत होत्या कारण पेपरची आवृत्ती रात्री बाराला बाहेर पडल्यावर लगेच भारतात वाचायला कोणी जात नाही पण त्यावेळी आमच्याकडे दुपारचे तीन अथवा चार वाजले असल्याने ती आम्हाला ताबडतोब वाचायला मिळायची.
वेळ घालवण्यासाठी आणखीही काही पर्याय आम्हाला उपलब्ध होते.त्यातील एक म्हणजे अनेक उत्तमोत्तम ऑडिओ आणि विडिओ सीडीज चा मुबलक साठा चि. सुजितने करून ठेवला होता. शिवाय खास मातोश्रींसाठी झी टी व्ही चा एक चॅनल घेतला होता. अर्थात हळूहळू मलाही त्यातील सासबहू मालिका बघण्यात डुकराचा जन्मसुद्धा आवडणाऱ्या साधूप्रमाणे रस वाटू लागला होता हे मान्य केले पाहिजे. याशिवाय आणखी एक करमणुकीचे साधन थोड्याच दिवसात उपलब्ध झाले ते म्हणजे एक उत्तम की बोर्ड पण सुजित घेऊन आला.या सर्व गोष्टींमुळे मला वेळ घालवण्या ऐवजी वेळ या सगळ्या गोष्टींना द्यावा कसा हाच अवघड प्रश्न झाला. याशिवाय आम्ही अमेरिकेत प्रथमच आल्यामुळे मधूनमधून निरनिराळ्या स्थळांना भेटी देणे हाही महत्त्वाचा कार्यक्रम तर होताच !

वारी ७ - (बुध., १४/११/२००७ - २२:००)
अमेरिकेत जाण्यापूर्वी पद्मश्री पु̮.ल.देशपांडे यांचा " एक बेपत्ता देश" या शीर्षकाचा लेख वाचला होता.त्यात त्यांच्या अमेरिकावास्तव्यात ते बाहेर पडले असताना एका म्हातारीला एक पत्ता विचारायला जातात तेव्हा ती म्हातारी कशी थरथर कापायला लागते कारण एकट्यादुकट्या व्यक्तीला गाठून लुबाडण्याचे प्रसंग बरेच घडत असल्यामुळे हा आपल्यावर चाल करायला आलाय की काय अशी अनुभवामुळे तिला कशी भीती वाटते याचा उल्लेख असल्यामुळे मी फिरायला बाहेर पडल्यावर अमेरिकन म्हाताऱ्या बाईला आपल्या कोठल्याही कृतीमुळे भीती वाटू नये याची दक्षता घ्यायचे ठरवले होते (तरुणीच्या बाबतीत माझ्याबरोबर सौ. असल्यामुळे ही शक्यता नव्हती )पण या अमेरिकनांनी त्याही बाबतीत आमची दांडी उडवली.कारण एकदा मी आणि सौ. दोघेही फिरायला बाहेर पडलो.आम्हाला फारशी थंडी वाजत नसल्यामुळे आम्ही साधे स्वेटर्स घालून बाहेर पडलो तर एक अमेरिकन म्हातारा आमच्याजवळ येऊन अगदी कनवाळूपणे म्हणाला."अरे तुम्ही एवढ्या थडीत फक्त साधे स्वेटर्स घालून काय बाहेर पडलाय जॅकेटस घाला उद्यापासून . " अमेरिकन माणसे अगदीच माणूसघाणी किंवा माणसांना घाबरणारी असतात ही माझी गैरसमजूत दूर केल्याबद्दल आणि आम्हाला प्रेमळ सल्ला दिल्याबद्दल त्या म्हाताऱ्याचे दुसऱ्या म्हाताऱ्याने(म्हणजे मी) आभार मानले आणि आम्ही पुढे गेलो.त्यानंतर पुढे एकदा माझ्या मित्राच्या मुलाकडे ( तो माझ्या मुलाचा मित्रही आहे.) आम्ही रहायला गेलो तेव्हा सकाळी फिरायला गेलो तेव्हा त्याच्या अमेरिकन तरुण शेजारणीनेही मला गूड मॉर्निंग केले आणि तू माझ्या शेजाऱ्याचा पाहुणा आहेस ना अशी माझी विचारपूस पण केली.रस्त्यावर बऱ्याच अमेरिकनांनी गुडमॉर्निंग म्हणून आपल्या देशाविषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला उलट मधूनमधून दिसणाऱ्या भारतीय वाटणाऱ्यानी आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला ( आमच्याविषयी ते पण असेच म्हणत असतील) .पण एकूणच येथील लोक समोर येणाऱ्या व्यक्तीला हाय हॅलो म्हणतातच असे दिसले. अगदी तिकिटाच्या खिडकीत गेलेला माणूस अगोदर हाय म्हणूनच तिकिट मागणार.तरीही या देशाला एक बेपत्ता देश असा किताब पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या चोखंदळ व्यक्तीने का द्यावा समजले नाही. अर्थात त्यांच्याच सांगण्याप्रमाणे " हर गार्डाची शिट्टी न्यारी " त्याप्रमाणे अमेरिकेचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा.
आम्ही तर कोणत्याही वेळी निर्धास्तपणे हिंडत होतो पण एकदा आमच्या मित्राकडे आम्ही दोघेच त्याचे घर जवळ असल्याने पायीच गेलो असता परतायला थोडा अंधार झाला तर त्यांच्या सुनेने आता चालत परत जाऊ नका असे सांगून आम्हाला आपल्या गाडीतून सोडण्याची तयारी दाखवली कारण आमच्या परतीच्या रस्त्यावर काही मुलांनी रस्त्यावर जाणाऱ्या व्यक्तीना लुटण्याचा प्रयत्न केला असे तिला समजले होते. आपल्याकडेही अगदी दिवसा ढवळ्या स्त्रियांच्या गळ्यातील साखळ्या,मंगळसूत्र घेऊन पसार होण्याचे असे प्रकार चालतातच.पण तरीही मर्द मराठ्यांनी अंगावर दागिने घालून बाहेर पडण्याची परंपरा सोडलेली नाही. पुण्यात असताना तर माझ्या एका मित्राला सकाळी नऊ वाजता तो रस्त्यावरून चालत असताना अगदी साळसूदपणे एका स्कूटरवाल्याने थांबवले आणि " अहो काका ते गृहस्थ तुम्हाला बोलावत आहेत असे सांगितले.माझ्या मित्राने थांबून पाहिले तर त्या व्यक्तीने जवळ येऊन " अहो काका पुढे दंगा सुरू झाला आहे तुमची आंगठी, घड्याळ आणि चेन काढून जपून ठेवा म्हणून त्याला अंगठी घड्याळ आणि चेन काढायला लावली आणि त्यालाच रुमालात गुंडाळायला लावली आणि त्याच्या हातातून घेऊन त्याच्या खिशात ठेवण्याचे नाटक केले.आमच्या मित्राने"तुम्ही कोण विचारल्यावर गुप्त पोलिस असे सांगितले आणि निघून गेला.थोड्या वेळाने मित्राने खिशात हात घालून पाहिले तर काय आंगठी,चेन आणि घड्याळ बेपत्ता.एकूण आपला देश बेपत्ता नसला तरी येथे वस्तू आणि कधीकधी माणसेही बेपत्ता होतात हे खरे ! एक गोष्ट मात्र खरी आपल्या देशात रस्त्यावर एकटेदुकटे असणे क्वचितच शक्य असते आणि येथे मात्र रस्त्यावर हिंडणारे लोक कमीच.एकदा तर मी रस्ता चुकलो तर योग्य रस्ता विचारण्यासाठी मला अक्षरशः माणसे हुडकत हिंडावे लागले.
फिरण्यासाठी सगळेच रस्ते मोकळे असल्यामुळे मी बऱ्याच रस्त्यांचा शोध घेतला.रस्त्याना वेगवेगळ्या प्रकारे संबोधण्याचे कारण काही मला कळले नाही.कधी रोड,तर कधी स्ट्रीट तर कधी अव्हेन्यू तर कधी ड्राइव्ह तर कधी बुलेवार्ड,तर कधी नुसतेच सीटी ( हा कशाचा शॉर्ट फॉर्म आहे?),हायवेला रूट म्हणतात.आपल्याकडेही पूर्वी बोळ(शालूकरांचा) गल्ली (तपकीर),आळी ( दाणे)असे काही शब्दभेद होते पण आता मात्र शुद्ध रोड हा बहुतांशी एकच पर्याय वापरला जातो. अगदीच मराठीचा अभिमानी असेल तर मार्ग अथवा पथ हे शब्द वापरतोऽनेक रस्त्यांच्या पाहणीत येथील घरांचे बरेच नमुने पहायला मिळाले. बाहेरून पहायला घरे एकाद्या काड्या पेटीच्या घरासारखी भासतात कारण लाकडाचा जास्तीतजास्त वापर हिंवाळ्यात बर्फ घरावर साठायला नको म्हणून छते उतरती आणि भिंतींवरसुद्धा तिरप्या लाकडी पट्ट्या बसवलेल्या असतात̱ छतांना ती उतरती असल्यामुळे हिरवा , तपकिरी.करडा, निळा वेगवेगळे रंग दिलेले दिसू शकले आणि लाकडी भिंतीना पण. घरासमोर भरपूर मोकळी जागा आणि त्यावर हिरवेगार लॉन समोर सुंदर फुलझाडे आणि त्यांच्यावर आलेली सुंदर फुले सकाळी शेजारच्या घरातील म्हातारी माणसे देवपुजेला पळवत नाहीत̮. लॉनवर छान संगमरवरी पुतळे आणि त्याना धक्का लागेल अशी मुळीच काळजी लोकांना वाटत नाही हे आश्चर्य.कारण आमच्या भारतातल्या घरापुढील बागेतील फुले आम्ही उठण्यापूर्वी शेजारच्या आजींच्या देवांची पूजा करण्यासाठी गायब होतात एवढेच काय समोर ठेवलेली कचऱ्याची कुंडीसुद्धा टिकत नाही.येथे जागेचा तुटवडा नसल्यामुळे घरेही चांगलीच प्रशस्त असावीत. असावीत म्हणण्याचे कारण मी काही एकूण एक घरे पाहिली नाहीत पण पाहिली तेवढी कमीतकमी दहा हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळावर बांधलेली आणि तीन शयनकक्ष तीन विश्राम खोल्या (रेस्टरूम) आणि तळघरयुक्त.तळघरात संगीतवाद्ये,टेबलटेनिसचे टेबल आणि बऱ्याच वस्तूंचा साठा असतो.माझ्या एका विद्यार्थ्याने जागा विकत घेऊन घर बांधले आहे त्यात सात शयनकक्ष आहेत.त्या नवराबायकोस एकच मुलगी आहें नवरा कामावर गेल्यावर मुलीला शोधत राहणे एवढे एकच काम बायकोला पुरत असेल.सुजितनेही दोन वर्षानी मोठे घर विकत घेतले त्यातही तीन शयनकक्ष आहेतच.बहुतेक घरे तीन पातळ्यांची म्हणजे तळघर,तळमजला आणि पहिला मजला शयनकक्ष पहिल्या मजल्यावर तळमजल्यावर दिवाणखाना, स्वयंपाकघर,आणी कुटुंबखोली (फॅमिली रूम) अशी रचना असणारी असतात. समोर व मागे बऱ्यापैकी लॉन असतेच.काही फुलझाडांचे ताटवे, मोठी झाडेपण दिसली,मात्र फळझाडे घराच्या आवारात कमी दिसली̱. घराला कुंपण घालण्याची पद्धत कमीच दिसली यावरून शेजाऱ्यांशी जागेच्या मालकीवरून वाद होत नसावेत.माझे घर बांधून कांपाउंड वॉलसुद्धा झाल्यावर ती आपल्या हद्दीतून गेल्याचा दावा नंतर घर बांधणाऱ्या माझ्या शेजाऱ्याने कसा केला होता आणि आपली कांपाउंड वॉल माझ्या हद्दीतून नेण्याचा कसा प्रयत्न केला होता याची यावेळी आठवण झाली. बागेतील फुले फळे किंवा शोभेच्या वस्तू पळवल्या जाण्याची भीती लोकांना वाटत नसावी. त्यामुळे गृहसंकुलातदेखील लोक लहान मुलांच्या सायकलीसारख्या वस्तू बेदिक्कत बाहेर राहू देतात.कारण घरात अडचण होते.त्यामुळे पुढच्या आमच्या वारीत मी तीन वर्षाच्या नातवास घेऊन फिरायला गेल्यावर अशी बाहेर असलेली सायकल वापरायचा हट्ट तो करू लागल्यावर माझी पंचाईत झाली. .`
रस्त्यावरून जाताना काही दुकानांची नावे पाहिल्यावर येथील लोकाना आपल्यासारखी काव्यदृष्टी नाही याची जाणीव झाली.केस कापण्याचे कोठलेही दुकान असले तर त्यावर नाव नुसते हेअर कट किंवा नेल्स (नखे कापण्यासाठी वेगळे दुकान प्रथमच पाहिले.आपल्याकडे सलूनमध्ये सर्वच गोष्टी एकत्र करण्याची पद्धत!)किंवा कॉफीच्या दुकानावर एक्ष्प्रेसो अथवा जी असेल ती कॉफी किंवा लाँड्रीला नुसते वॉशर. बुटांच्या दुकानाला नाव काय तर म्हणे पेलेस शूज .आपल्याकडे कसे चैतन्य फूटवेअर, उत्कर्ष लाँड्री अशी नावे वाचूनच दुकानात शिरायला उत्साह येतो.साड्यांच्या दुकानांची नावे तर काय विचारायलाच नको.वस्तू वापरण्याच्या बाबतीत सारख्या नवीननवीन वस्तूंचा आग्रह धरणारे अमेरिकन लोक नावांच्याच बाबतीत येवढे कंजूष का काही समजले नाही. या बाबतीत त्यांच्या इंग्रज परंपरेचा वारसा त्यांनी सोडला नाही असे दिसते (भो पंचम जॉर्ज )त्यामुळे मुलाला बापाचेच नाव ज्यूनिअर म्हणून लावायची पद्धत बऱ्याच वेळा वापरलेली दिसते. जॉर्ज बुशसुद्धा या तडाक्यातून सुटले नाहीत.आपण पहिल्यापासूनच नावे ठेवण्याच्या ( म्हणजे दुसरा अर्थ नव्हे) कलेत पारंगत त्यामुळे विष्णुसहस्त्र नाम आपल्याकडे असते आणि तरीही मूल होताना आणखी नव्या नावाचा शोध अगदी इंटरनेटवर घेतला जातो. त्यामुळे शेक्सपीयरने नावात काय आहे असे म्हटले असले तरी आपल्याकडे तरी नावातच सर्व काही आहे हे निश्चित !

वारी ६ - (गुरु., ०१/११/२००७ - २१:५६)
त्यानंतर अधिक अधिक मोठे मॉल्स पाहिले,बरेचसे मॉल पूर्ण पाहण्यापूर्वीच पाय दुखू लागले,पुढेपुढेतर मी मुलांना खरेदी करा म्हणून सांगून कुठल्यातरी आरामशीर खुर्चीवर बसून आराम करीत असे.वॉलमार्ट, शॉपराइट, पाथमार्क,मार्शल्स ही काही प्रसिद्ध साखळीमॉल्सची नावे. मॉल्समध्ये खाद्यपेये,स्टेशनरी,मिळत असे त्याशिवाय ठराविक प्रकाराचेच साहित्य विकणारी तर असंख्य दुकाने.तीही इतकी विस्तीर्ण की पूर्ण पाहणे अशक्यच.बेड बाथ अंड बियॉंड (झोपण्या व अंघोळीचे सामान), होम डेपो (घर बांधण्यासाठी किंवा सजवण्यासाठीचे सामान) ,टॉयझरस,बेबी-ज-रस (खेळणी आणि लाहान मुलांसाठी) अशी विशिष्ट प्रकारचे सामान विकणारीही असंख्य दुकाने . आमच्या सुदैवाने शॉपराइट.मार्शल्स,ड्रगफेअर ही दुकाने आमच्या घरातून चालत जाण्याच्या अंतरावर होती.दुकाने चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी कामात असणाऱ्या व्यक्तीला आठवड्यातून एकच दिवस मिळत असल्याने आणि अगदीच किरकोळ म्हणजे अर्धा लिटर दूध,अर्धा किलो भाजी अशा वस्तू आणायला गेले तर वस्तू घेण्यापेक्षा ज्या कौंटरवर पैसे द्यायचे तेथे एवढी गर्दी असे की तेवढ्या वस्तूच्या पेमेंटसाठी सहज अर्धा तास मोडायचा.एकदा अर्धा डझन केळी शॉपराइटमधून आणायला मला चालत जाऊन केळी घेऊन परत चालतच येण्यास अर्धा तास आणि दीड डॉलर किंमत चुकवण्यात एक तास असावेळ गेला.भारतात आम्हाला घराबाहेर पडल्यापडल्या दिसणाऱ्या दुकानात हवी ती वस्तू मिळते,जास्त वस्तू असल्या तर वाणी घरी पाठवून द्यायलाही एका पायावर तयार असतो.त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ आणि संवयीने आळशी बनलेल्या, गाडी चालवता न येणाऱ्या नागरिकांमुळे तरी मॉल संस्कृती आली तरी अमेरिकेसारखी ती पूर्णतया रुजू शकणार नाही. मॉल्समुळे वस्तू स्वस्त मिळतील आणि चांगल्या मिळतील असेही खात्रीने सांगता येत माही कारण भेसळ करण्याची संवय लागलेले भारतीय व्यापारी अमेरिकेत माल पाठवतानाही ( देशाचे नाव बदनाम होईल याची अजिबात पर्वा न करता) जेथे भेसळ करायला मागेपुढे बघत नाहीर् तेथे मॉलची काय कथा?आपल्याकडे इतक्या मोठ्या जागा मॉल बांधायला आणि गाड्या पार्क करायला उपलब्ध होण्याचीही अडचण आहे अर्थात सध्याच्या मॉलकडे नजर टाकली तर लोकांना गाड्या लावायला जागा मिळते की नाही याची ना मॉलचालकांना काळजी ना त्यांना त्यासाठी परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना काळजी.रस्तावर वाहतुक कोंडी होऊन चारदोन अपघात झाले आणि लोकांनी दगडफेक केली की मग सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होणार.
अमेरिकेत पोचण्याच्या दुसऱ्या दिवसापासून फिरायला जायला योग्य जागा मी शोधू लागलो.पुण्यात सिंहगड रस्त्यावर सकाळी सातपूर्वीच इतकी रहदारी चालू होते की मी सुरवातीला पुण्यातील आमच्या गृह संकुलाच्या मागील बाजूस असणाऱ्या आंबराईत फिरायला जाण्याचा पर्याय शोधला होता आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणाना तो पसंत पडला होता.पण आंबराईच्या मालकाला इतके ज्येष्ठ नागरिक या एकुलत्या एक शुद्ध हवेच्या ठिकाणाचा लाभ घेऊ लागले तर ते अधिकच दीर्घायु होऊन शासनास सेवानिवृत्तीवेतनचा फारच भूर्दंड पडेल आणि देशाचे मोठे नुकसान होईल असे वाटून लगेच त्याने तेथे तारेचे कुंपण घालून टाकले.तोपर्यंत पी. चिदंबरम् अर्थमंत्री झाल्यामुळे शासनातर्फे त्याला बहुतेक काही बहुमान मिळण्याची शक्यता वाटते सध्या त्या विभागाचा नगरसेवक म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे. अशा वातावरणातून अमेरिकेत गेल्यावर कोठेही फिरायला मला रान मोकळे मिळाल्यासारखे झाले तरीही मुलाने उगीच इकडेतिकडे जाऊ नका रस्ता चुकला तर पंचाईत व्हायची असा धाक घालून ठेवला होता.त्याने मोबाइल घेऊन जा असा आग्रह पण केला.पण मी रस्ता चुकण्यापेक्षा मोबाइलच हरवून टाकेन अशी मला भीती वाटत असल्याने मी टप्प्याटप्प्याने आपली फिरण्याची कक्षा वाडवायची असे ठरवले. सुरवातीस तर आम्ही एकएकटे फिरायला बाहेर पडायचे ठरवल्यामुळे पहिला टप्पा फक्त मुलाच्या घराशेजारच्या रोलरस्केटिंगच्या मैदानावरच तासभर फेऱ्या मारायच्या असा मी बेत केला कारण तेही तसे बऱ्यापैकी मोठे होते.
त्यानंतर हळूहळू रस्त्यावर जायचे असे ठरवले म्हणून बाहेर पडलो पण रस्ता इतका मोकळा पाहून पुढे जाण्याचा मोह आवरेना.रस्ता पाहून अमेरिकन लोकाना आमच्यापासून शिकण्यासारखे कितीतरी आहे याची जाणीव झाली कारण रस्ता अगदी जेवढी रुंदी उपलब्ध होती तितक्या रुंदीचा करून बाजूला पदपथ ज्याला इथे साइडवॉक म्हणतात ते पूर्ण करून आता करण्याला शिल्लक काही ठेवलेच नव्हते आपल्या गरजेपुरतेच वापरा आणि गरजा कमीतकमी ठेवा हा म. गांधींचा दृष्टीकोण या लोकाना कुठला पटायला.येथे रस्ते अगोदर तयार असतात आणि लोक त्या भागात नंतर रहायला सुरवात करतात.आपल्याकडे लोक नव्या भागात रहायला गेल्यावर बरेच दिवस ठेचकाळत जात रस्ता झाला तर बरे होईल असे म्हणत आणि ते न करत असल्याबद्दल नगर्सेवकांबा शिव्या देत देत प्रवास करतात शिशुपालाचे शंभर अपराध पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या श्रीकृष्णाप्रमाणे नगरसेवक शिव्यांची लाखोली पूर्ण होण्याची वाट पाहतात,तोपर्यंत लोकांच्या चालण्यामुळे बऱ्यापैकी पायवाट तयार होते आणि रस्ता कमीतकमी किती रुंदीचा केला तरी भागेल याची त्यांना कल्पना येते.त्यानुसार एकदिवस नगरविकास रचनेत शंभर फुटी म्हणून दाखवलेल्या रस्त्याची सुरवातीस वीस फुटाच्या रुंदीचीच आखणी होते आणि तरीही नागरिकांच्या आशेला पालवी फुटते.त्यानंतर काही दिवसानी त्या आखलेल्या रुंदीच्या दोन्ही बाजूने खडीचे ढीग दिसू लागतात आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा चालणे किंवा वाहन चालवणे अवघड झाले तरी रम्य भावीकाळासाठी ही अडचण नागरिक सोसायला तयार होतात.मग कित्येक दिवस काहीच घडत नाही आणि त्या ढिगातील खडी हळूहळू जाणाऱ्यायेणाऱ्या पादचाऱ्यांना आजूबाजूने जाणाऱ्या वाहनापासून बचावण्यासाठी त्या खडीच्या ढिगावरूनच चालावे लागून रस्त्यावर पसरू लागते.आणी एक दिवस भल्या पहाटे बऱ्याच कामगारांचा ताफा ती खडी पुन्हा ढिगात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करून मग तीच नियोजित रुंदीची रस्त्याची पट्टी झाडण्याचा प्रयत्न करून जाणाऱ्या येणाऱ्याना त्यावरून चालणे किंवा वाहनातून जाणे मुश्किल करतात. त्यादिवसाच्या अखेरीस ती खडी रस्त्यावर पसरली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून तेथील नागरिकांचे खरे हाल सुरू होतात,कारण खडी पसरण्याचे काम पूर्ण करून ठेकेदार आपली कामगारसेना दुसऱ्या तशाच कामासाठी हाकारतो पण तोपर्यंत डांबरीकरण करणारा ठेकेदार ठरायचे बाकी असते कारण कोणत्या ठेकेदाराकडून अधिक प्राप्ती होणार याची चाचपणी नगरसेवकांकडून चालू असते आणि त्यामुळे पहिला रस्ताच बरा होता असे म्हणत पूर्वीपेक्षाही अधिक शिव्यांचा संग्रह नागरिकांपाशी तयार होतो आणि नाइलाजाने त्या खडीवरूनच चालण्याची संवय नागरिकांना आणि वाहनचालकांना पण लागते,त्यांच्या जाण्याने खडी बऱ्यापैकी दबली जाते आणि असाच रस्ता तयार होईल की काय असा विचार दृढ होताहोता एक दिवस रस्त्याच्या बाजूला रोडरोलर दिसू लागतो आणि पुन्हा नागरिकांच्या आशेला पालवी फुटू लागते पण त्याला फळे येण्यापूर्वीच तो रोलर पुन्हा तेथून गुप्त होतो आणि पुन्हा शिव्यासप्तशतीचा पाठ नागरिक म्हणू लागतात. पण अचानक एक दिवस त्या भागाला कोणीतरी बडी असामी भेट देणार अशी आवई उठते.आणी एकदम कामगारांची मोठी फौज,रोडरोलर,डांबराची पिपे त्या भागात येऊन त्या दिवशी तो रस्ता वाहतुकीला बंद होऊन संध्याकाळपर्यंत एकदम चकचकीत डांबरी पट्टी त्या जागेवर दिसू लागते आणि त्या भागातील नागरिकांना स्वर्ग हाती आल्याचा भास होतो.इतक्या प्रतीक्षेनंतर तयार होणारा रस्ता कसाही झाला तरी तो पूर्वीपेक्षा बराच होता याविषयी नागरिकांत एकमत होते. तो रस्ता ती बडी असामी येईपर्यंत कसाबसा तग धरतो आणि हळूहळू रस्त्याच्या बाजूची धूळ त्यात पाऊस पडल्याने चिखलाच्या रूपाने तयार रस्त्यावर येऊन रस्ता डांबराचा नसून चिखलाचा आहे असे वाटू लागते. असे झाले तरी " ठेविले अनंते तैसेची राहावे" अशा शिकवणीत वाढलेले आपले नागरिक तशाही अवस्थेत हसतमुख राहण्याचा प्रयत्न करतात.रस्ता करणे ही इतकी सोपी गोष्ट आहे हे या बेट्या अमेरिकनांना माहीतच नाही आणि एकदा केलेला रस्ता जणू काही जन्मोजन्म टिकावा आणि तो पुन्हा कधीच करायचा नाही अशा थाटात करण्याचा त्यांचा अट्टाहास न समजण्यासारखा वाटतो.खरे तर रस्ता ही गोष्ट बायकांच्या साड्यासारखी अथवा इतर वस्त्रप्रावरणाप्रमाणेच पुन्हापुन्हा करावी लागून त्यातून नगरसेवकांच्या कित्येक पिढ्यांना पुरेल अशी तरतूद करावयाची असते ही साधी गोष्ट यांना कळत नाही. काहीका असेना अशा पद्धतीने रस्ता तयार होताच महापालिकेच्या इतर विभागानाही किंवा टेलिफोनवाल्याना जाग येते, रस्ता तयार झाला आहे असा टेलिफोनच जणू त्याना जातो की लगेच केबल टाकण्यासाठी रस्ता खणण्याच्या तयारीत ते तस्त्यावर हल्ला करतात.
रस्त्याच्या बाबतीत मला येथे आणखी जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्ता केवळ वाहतुकीसाठीच वापरायचा असतो ही यांची गैरसमजूत.आपल्याकडे कसे रस्ता हा शक्य झाले तर वाहतुकीसाठी वापरायची चीज आहे.त्याव्यतिरिक्त भाजीविक्रेते, भेळपुरीवाले, किल्ल्या तयार करणारे,या सर्वांना रस्त्याचाच आधार असतो.दुकानदाराना आपला माल गिऱ्हाइकांना दिसेल असा बाहेर ठेवायला रस्त्याचाच वापर करावा लागतो.वाहने पार्क करायला नागरिकांनाही रस्ताच आवडतो,या रस्ताच्याच डाव्या उजव्या बाजूस नागरिकांनी कचरा टाकावा म्हणून मोठ्या कुंड्या ठेवलेल्या असतात पण या कुंड्यांचा नागरिक खोखो खेळण्याच्या खुंटासारखा वापर करून कचऱ्याचा सडा मात्र रस्त्यावरच पडेल याची दक्षता घेतात.आणी इथे मात्र पार्कात फिरायला गेलो तर बरोबर आणलेल्या पाळीव कुत्र्याच्या मालकांना त्या कुत्र्यामागे पिशवी घेऊन धावून त्याची विष्ठा बागेत पडू नये याची काळजी घ्यावी लागते नाहीतर त्यांना जबरदस्त दंड बसतो आपल्याकडे तर काही मानवप्राणीही रस्त्याच्या कडेची शोभा वाढवण्यात धन्यता मानतात.
रस्त्यावर वाहने अतिशय वेगाने जात असतात आणि आणि ती फारच मोठ्या प्रमाणात चारचाकीच असतात. आपल्याकडे दिसणारी वाहनांची विविधता येथे दिसत नाही.आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे रस्त्यावर कोठेच पाळीव अथवा कसलेच प्राणी दिसत नाहीत.याउलट आपल्याकडे पाळीव प्राणी मालकाकडे कामापुरते राहून बाकीचा काळ रस्त्यावरच व्यतीत करतात त्यामुळे आपला रस्ता हे शिक्षणाचे मोठे केंद्रच असतो.अमेरिकेतील मुलांना साधे कोंबडे,गायी,घोडे.इ.प्राणी प्राणिसंग्रहालयातच जाऊनच पाहावे लागतात याउलट आपल्या बालकांना मात्र हती,घोडा,गाय बैल,म्हशी,कधीकधी उंट ,कोंबड्या इ. चे सांगोपांग ज्ञान रस्त्यावरच मिळते त्यासाठी त्यांना प्राणिसंग्रहालयात जावे लागत नाही.फक्त आता वाघ सिंह आणि माशांसारखे जलचर प्राणीच काय ते रस्त्यावर दिसत नाहीत.बोरिवली वगैरे अभयारण्यांच्या शेजारील रस्त्यावर तेही दिसतात अधूनमधून.रस्त्यावरील प्राण्यांची आठवण येताच एका म्हशीने केलेली माझी फजिती आठवल्याशिवाय कशी राहील.नुकतेच लग्न झाल्यावर ऐटीत बायकोला घेऊन एरंडवण्यातून मेव्हण्यांच्या घरातून बाहेर पडून लोकमान्यनगरात जाण्यासाठी निघालो होतो अंगात त्यावेळी चांगलेच म्हणता येतील असे कपडे म्हणजे शुभ्र शर्ट आणि सटिन ब्ल्यू पँट होती̮. लोकमान्यनगरला जाण्यासाठी कर्वे रस्ता ओलांडून कॉजवेवरून( आता तेथे पूल झाला आहे.) चालतच जाता येणे शक्य होते.कॉजवेवर थोडे अंतर आम्ही गेलो तो समोरून म्हशींचा एक घोळका लडिवाळपणे एकमेकांच्या शिंगात शिंगे अडकवत आला त्यातील एका म्हशीला आमचे जोडीने चालणे आवडले नसावे आणि आम्ही जवळून जात असताना तिने शेपटीची एक डौलदार तान घेत समेचा एक फटकारा माझ्या छातीवर असा लगावून दिला की त्यापुढे येसाजी कंकाने ज्या तलवारीच्या एका वारात हत्तीची साँड उतरवली तो वारही फिका पडावा आणि त्या फटकाऱ्याने माझ्या शर्टाची पुढची बाजू खांद्यापासून कमरेपर्यंत जानव्यासमांतर शेणाच्या पट्ट्याने सजून निघाली अर्थातच लगेचच परत घरी प्रवेश करून कपडे बदलूनच मला बाहेर पडावे लागले.
याशिवाय श्वानमित्र संस्थांमुळे कुत्र्यांच्या तर झुंडीच रस्त्यावर फिरत असतात.त्यामुळे आपल्याकडे ज्याविषयी उगीचच शिक्षणतज्ञ आणि राज्यकर्ते यांच्यातच जो चर्चेचा कल्लोळ चालू आहे त्या लैंगिक शिक्षणाचे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर प्रात्यक्षिकही बालकांना रस्त्यावरच पहायला मिळत असल्याने उगीचच त्या विषयावर चर्चासत्रे कशासाठी चालू आहेत, समजत नाही.थोडक्यात रस्ता हे आपल्याकडील विद्यापीठच आहे म्हणाना कुटुंबनियोजनाचा प्रसार व्हावा तसा होत नसल्याने आपल्याकडे रस्त्यांचा लोकसंख्या नियंत्रणासाठीही उपयोग केला जातो त्यासाठी सलमानखानसारख्या ताऱ्यांची मदत होते. त्यामुळे आपल्याकडे डोळे उघडे ठेऊन अगदी काळजी पूर्वक रस्त्यावर चालावे लागते आणि तरीही तुमचे दैवच बलवत्तर असेल तर तुम्ही रस्त्यावर सुखरूपपणे चालू शकता.अशी सवय असल्याने रस्ता ओलांडताना एक वाहन येत आहे म्हणून मी थांबलो तर तो वाहनचालकच थांबून मला रस्ता ओलांडण्याचा आग्रह करू लागला आणि माझे अंतः करण अगदी भरून आले आणि बिचाऱ्याचा हिरमोड करायला नको म्हणून मी त्याच्या विनंतीस मान दिला.
रस्त्याचा असा अगदी मर्यादित वापरच माहीत असल्याने येथील वाहनचालकाना वाहने अगदी जपून चालवावी लागतात.आणि जिकडेतिकडे पाट्या दिसतात " कायद्यानुसार पायी चालणारास अग्रक्रम देणे आवश्यक आहे." आपल्याकडे असे केले तर मला वाटते गाडी चालवणाऱ्याना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालतच जावेसे वाटेल.आणी अशा प्रकारे इंधनाची बरीच बचत होईल.

वारी ५ - (शुक्र., २६/१०/२००७ - ०९:१३)
सुजितचे घर म्हणजे एक सदनिका होती.आपल्याकडे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ घरे बांधून भाड्याने देत होते आणि त्यांचा देखभाल खर्च त्या भाड्यातून निघत नाही असे दिसल्यावर काहीतरी एकमुष्टी रक्कम घेऊन त्या भाडेकरूंच्या नावावर करण्याचा आंतबट्ट्याचा व्यवहार करत होते त्याचप्रमाणे येथे काही खाजगी संस्था अशा प्रकारच्या सदनिका बांधून भाड्याने देतात,मात्र भाडे आकारताना त्या उत्पन्नातून देखभाल व्यवस्थित होईल याची काळजी करतात आणि खरोखरच देखभालही करतात. न्यू जर्सीत मिडलसेक्स मॅनेजमेंटने अशा अनेक सदनिकांची संकुले निर्माण केली आहेत.त्यापैकी हिडनव्हॅली ड्राइव्ह या संकुलामध्ये सुजितची सदनिका होती.स्वयंपाकखोली,दिवाणखाना आणि एकच शयनखोली (थोडक्यात वन बी एच के )अशी रचना होती पण क्षेत्रफळ त्यामानाने बरेच मोठे म्हणजे जवळजवळ ११०० चौरस फूट होते. शिवाय घरात गृहमंडळाकडूनच ए सी. फ़्रीज. वॉशिंग मशीन स्वयंपाकाचा गॅस,या सर्व सोयी दिलेल्या होत्या.त्या संकुलामध्ये चारच इमारती होत्या आणि सर्व तीन मजली म्हणजे तळमजला आणि वर दोन मजले अशा होत्या̱. त्याची सदनिका पहिल्या मजल्यावर होती. आपल्यासारखे जिन्याचे ९-९ पायऱ्यांचे अथवा ४-६-८ असे भाग पाडलेले नव्हते. जिना सरळ खालून सुरू होऊन अठरा पायऱ्यांवरच संपे आणि तो संपला की सुजितचा गाळा. असे जिने आता आपल्याकडील खेड्यापाड्यात किंवा पुण्यातील जुन्या वाड्यातच ( आता किती उरलेत पुणे म.न.पा.च जाणे) पहायला मिळतात सर्व इमारतीच्या बांधकामात लाकडाचा सढळ वापर.म्हणजे छत,जमीन आणि भिंती सगळे लाकडी म्हणजे जिना लाकडीच हे ओघानेच आले.त्यामुळे आजूबाजूला शांतता असल्याने कोणीही बाहेरून येत किंवा बाहेर जात असल्याची वर्दी सगळ्या भाडेकरूंना मिळत असे. जमीन लाकडी असल्याने आपल्या चालण्याचा आवाज नारायण धारपांच्या गूढ कथांतील सत्रार किंवा अशाच पात्राच्या पावलांचा आवाज असल्याचा भास होई.इतके दिवस बरेच वेळा बायको जवळ येऊन उभी राहिली तरी मला पत्ता लागत नसे पण आता मात्र ती घरात कोठेही चालू लागली की भूकंप होऊ लागल्याचा भास होऊ लागला अर्थात ही केवळ तिचीच मक्तेदारी होती अशातला भाग नव्हता.तळमजल्याच्या सदनिकांच्या जमिनी कारपेटने आच्छादित होत्या मात्र वरच्या दोन्ही मजल्यावर जमिनी गुळगुळीत लाकडी पट्ट्यांच्या बनवलेल्या असल्यामुळे आणि त्यावर कारपेट नसल्यामुळे आमच्या चालण्याचे पडसाद आमच्यापेक्षा खालच्या मजल्यावरील भाडेकरूना अधिक जाणवायचे आणि त्याची कल्पना आम्हाला येऊ शकत नसे त्यामुळे आमच्या नादात आणि आमच्या दृष्टीने अगदी हलक्या पावलांनी चाललो तरी आमची चाल त्यांची झोप उडवण्यास पुरेशी होत असे.त्याचा पुढे आम्हास अनुभव येणारच होता.
घराची एकूण रचना केवळ लाकडाच्या वापरामुळे इतकी भूकंपप्रवण होती की जवळच्या स्टेशनवरून गाडी जाऊ लागली की भिंती हादरत. घराच्या खिडक्या पाहून तर मी चकितच झालो कारण जवळ जवळ भिंतीचा अर्धा भाग व्यापणाऱ्या खिडक्यांना फक्त काचेचे तावदान आणि कीटक येऊ नयेत म्हणून बाहेरून बारीक जाळी. आमच्या सुरक्षेच्या कल्पनेला पार सुरुंग लावणारी योजना. मी घर बांधताना काटकसर म्हणून प्रत्येक भिंत एक वीट जाडीची घेतल्याबद्दल मला सर्वानी वेड्यात काढले होते त्यांच्या मते बाहेरील भिंत भक्कम दीड विटेची हवी(त्यावेळी घरे लोडबेअरिंग पद्धतीचीच असत).भक्कम लोखंडी जाळी असणाऱ्या खिडक्या बसवल्या होत्या तरी त्या उचकटून चोरी करण्याचा चोरानी प्रयत्न केला होताच आणि नंतर ते मी ज्या डॉक्टरना विकले त्यानी त्या घराचा इतिहास जाणून घेतल्यावर त्या जाळ्यांवर आणखी एक त्याहून अधिक जाडीच्या जाळीचे आवरण बसवले एवढेच नव्हे तर आतल्या प्रत्येक दाराला त्यानी आणखी एक लोखंडी सरकद्वार (रोलिंग शटर) बसवून घेतले आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हां सगळी शटर्स खालीवर करून दाखवून अभिमानाने मला म्हणाले," तुमच्या घरात ( अजून ते त्या घराला याच नावाने संबोधतात)चोर अगदी आलेच तरी सगळी दारे उघडेपर्यंत सकाळ निश्चित होणार." त्यावेळी मला त्या चोरांची दया आली होती.पण आता मात्र मला माझी काळजी वाटू लागली. अमेरिकेत अगोदरच लहानलहान मुलेही हातात पिस्तूल घेऊन धडाधड दिसेल त्याच्यावर गोळी चालवतात असे ऐकलेले आणि आता या अशा घरात रहायचे ! अमेरिकेतल्या लोकांच्या धाडसाचे मला कौतुक वाटू लागले. मी भीत भीत माझी शंका मुलाकडे व्यक्त केल्यावर तो म्हणाला "काही काळजी करू नका येथे पोलिस लगेच येतात.आणि घरात कोणी रोख रक्कम दागिने अगर सोनेनाणे ठेवत नाही हे चोरानाही माहीत असते." मी मनात म्हटले की त्यामुळेच चोर सरळ बँकाच लुटत असावेत. आपल्याकडे चोर फारसा भेदभाव न ठेवता सगळ्यांचीच सारख्याच ममत्वाने विचारपूस करत असतात अगदी आमदार,खासदार आणि मंत्र्यांचीसुद्धा ! उलट त्यांच्या घरात चोरी म्हणजे तर आपलाच माल आपण परत घेण्यासारखे आहे असे चोराना वाटत असावे.अशाप्रकारे चोरांना मुक्तद्वार असले तरी येथील नागरिक मात्र येथील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पूर्णपणे विसंबून आरामात राहत होते तरी मला मात्र त्या रात्री झोप लागली नाही. खरे तर आमचे सगळे सामान चोरानी पळवले असते तरी त्याची किंमत फार फार तर पाचशे डॉलर झाली असती आणि एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी चोर खिडक्या तोडण्याचे आणि १२८ किलो वजनाच्या आमच्या बॅगा पळवण्याचे श्रम करेल अशी मुळीच शक्यता नव्हती. शिवाय येथील पोलिस आपल्याकडल्यासारखे चोरी होईपर्यंत तेथे गैरहजर राहून चोरांना हातभार लावणारे आणि नंतर आपल्यालाच दटावणारे नसून खरोखरच नागरिकांचे संरक्षण करणे आणि त्याना कायदे पाळायला लावणे हे आपले कर्तव्य आहे असे मानतात याचा अनुभव पुढे आलाच. घरात असताना देखील बाहेरून पोलिसांच्या गाड्या धावत आहेत हे मधूनमधून ऐकू येणाऱ्या सायरनवरून जाणवत असे.
पोलिसांच्या दक्षतेचा आम्हासही अनुभव आलाच.एक दिवस संयुक्ता बाहेरून घरात शिरताना तिला शेजारच्या घरात किंचाळण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा दक्ष नागरिकाप्रमाणे तिने ९११ या क्रमांकावर(पोलिसांना बोलावण्यासाठी) फोन केला तर दोनच मिनिटात पोलिस आले आणि त्यानी तिला कशासाठी फोन केला हे विचारले तेव्हा तिने त्यांना हा प्रकार सांगितला आणि ते शेजारच्या इमारतीत गेले.थोड्या वेळाने परत आमच्या दाराची घंटी वाजली आणि पोलिस "आम्ही चौकशी केली त्या घरातली लहान मुलेच गम्मत म्हणून किंचाळली होती" असे सांगूब तिने फोन केल्याबद्दल तिचे आभार मानून निघून गेले.मला खात्री आहे आपल्याकडे शेजारच्या इमारतीतच काय शेजारच्या घरातून असा आवाज आला असता तरी प्रथम पोलिसाना फोन करण्याच्या भानगडीत सुबुद्ध नागरिक पडलाच नसता पण चुकून अमेरिकेतून नुक्ताच आल्याने त्याने केलाच असता तर प्रथम फोन उचललाच गेला नसता आणि समजा दैवयोगाने उचलला गेलाच असता तर होणाऱे संभाषण असे झाले असते
सु. ना.पोलिसांचा फोन नंबर लावतो.त्यावर
पोलिस स्टेशनमधून
"पर्वती पोलिस ठाणे कोण बोलतय ?काय काम आहे?
सु. ना . - मी अमुक अमुक बोलतोय
"ते समजल हो पण काय काम आहे?"(च्यायला काय कटकट आहे साली! अलिकडे पब्लिक काही स्वस्थ बसू देत नाही )
सु,ना. अहो शेजारच्या इमारतीतून किंचाळण्याचे आवाज येत आहेत.
"मग आम्ही काय कराव अस वाटतय तुम्हाला? थोडा वेळ वाट पाहा होईल शांत आपोआप. नाहीतर आम्हाला इतक्या लांब चक्कर मारायला लावण्यापेक्षा तुम्हीच का जाऊन बघत नाही काय झाले ते? अगदी खून वगैरे झालाच तर बोलवा आन्हाला"
सु.ना . कपाळावर हात मारून घेतो.
अमेरिकेतून भारतात फोन करताना ९१ क्रमांक प्रथम लावावा लागतो त्यात थोडे चूक होऊन जर ९११ लागला तर थेट तो इथल्या पोलिसानाच लागतो आणि मग त्यांच्या तपासणीस तोंड द्यावे लागते. एकदा आमच्या मित्रांच्या मातवंडाने चुकून असाच नंबर लावला आणि दोन मिनिटात पोलिस हजर ! लहान मुलाने चुकून लावला सांगून त्यांचा विश्वास बसला नाही. कारण इथली पोरे पण शहाणी असतात, आईनाप मारू लागले तर लगेच पोलिसाना फोन करतात.म्हण्जे पूर्वी मूल रडू लागले तर आईबाप त्याला पोलिसाला बोलावण्याचा धाक दाखवत तर येथे उलट पोरेच आईबापाना तसा धाक दाखवू लागली आहेत. पोलिसानी घरात येऊन सगळीकडे पाहणी केली आणि खरोखरच काही नाही आईबाप पोराला मारत वगैरे नाहीत याची खात्री झाल्यावरही थोडा वेळ घराबाहेर बसून परत जाताना घरातील व्यक्तींना सांगून निघून गेले.
आणखी एका वेळी मी माझ्या मुलाबरोबर गाडीत बसून स्वाध्याय ला चाललो होतो,दर रविवारी स्वाध्यायसाठी तो मला घेऊन जात असे,पण त्यादिवशी जरा जास्त वेळ लागल्यासारखे वाटले म्हणून मी म्हटले ,"आज फारच वेळ लागतोय!"यावर मुलगा म्हणाला "मामाची गाडी मागून येतेय" मला समजेना आमच्या पोराचा मामा इथे कुठून आला.पाहतो तर पोलिस व्हॅन मागून येत होती. म्हणजे लोकही पोलिसाना एवढे घाबरतात कारण आपण वेगमर्यादा ओलांडली किंवा आणखी काही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केले की ते ताबडतोब आपल्याला पकडणार आणि आपल्याला जबरदस्त दंड तर होणारच शिवाय आपल्या वाहन चालन परवान्यावर एक लाल खूण होणार आणि अशा तीन खुणा पडल्या तर परवानाच जप्त होणार याविषयी सगळ्या नागरिकांना खात्री असतें. तेच आपल्याकडे पाहा बरे खुशाल एकदोघाना गाडीखाली लोळवा कोणी विचारणार नाही आणि तुम्ही चित्रपटतारा वा तारका असाल तर मग काही विचारायलाच नको,तुमच्या गाडीखाली येण्याचे भाग्य ज्यांच्या नशिबी आले असेल आणि चुकून माकून ते जिवंत राहिले असतील तर त्यांनाच जाब विचारला जातो की असे ताऱ्याच्या गाडीखाली येण्याचे धाडसच कसे झाले त्यांचे. जरी कायदा गाढव असतो असे म्हटले जाते तरी आपल्या देशात मात्र कायदा पाळणारा गाढव असतो असे म्हटले जाते किंवा अनुभवास येते .
सगळ्या सुविधा असून या सदनिकेत आमच्या दृष्टीने एक फार मोठी त्रुटी आम्हाला सकाळी उठल्याउठल्या जाणवली ती म्हणजे उठल्यावर बाथरूम आत कोणी गेल्यामुळे बंद असली तर बाकीच्यानी तो/ती बाहेर येईपर्यंत हातावर हात धरून गप्प बसायचे (किंवा तोपर्यंत झोपायचेच)कारण बाथरूम (ज्याला ते रेस्ट रूम म्हणतात) मध्येच वॉशबेसिन, शॉवर आणि कमोड सगळे एकत्र ! याबाबतीत आपली घरे लहान असली तरी किती सोयिस्कर असतात सगळ्या गोष्टी एकत्र नसल्यामुळे एकाच वेळी दात घासणारा,शौचाला जाणारा आणि अंघोळ करणारा अशा तिघांची सोय होते अगदी तशीच वेळ आली तर आणखी एक जण तांब्या घेऊन बाहेरही जाऊन शुद्धी करून घेऊ शकतो अशा बऱ्याच बाबतीत आपण अमेरिकनांपेक्षा कितीतरी पुढारलेले आहोत याचा प्रत्यय आला आणि अभिमान वाटला.
रस्त्यावरही एकदा माझी अशीच पंचाईत झाली होती.मुलाबरोबर गाडीतून जाताना मध्येच मला लघुशंकेची भावना झाली आणि मी मुलाला तसे सांगितल्यावर तो म्हणाला आता रेस्ट एरिया येईपर्यंत थांबावे लागेल आणि ती रेस्ट एरिया बरीच दूर होती तेथपर्यंत मी कसाबसा तग धरू शकलो.आपल्याकडे असे कधीच झाले नसते.कोठेही मनात आले की गाडी रस्त्याच्या कडेला थांबवा आणि कोठेही जा "होल वावर इज युवर्स"(संदर्भः वऱ्हाड चाललेय लंडनला)अर्थात हे विश्वचि माझे विश्रांतिगृह (रेस्टरूम) या आपल्या वृत्तीमुळे आवश्यक असेल तेथेही अशा सोयी करण्याचा विचार आपण करत नाही ही मात्र दुर्दैवाची गोष्ट !
लाकडाच्या सढळ वापरामुळे आगीचा धोका खूपच असतो त्यामुळे प्रत्येक सदनिकेच्या प्रत्येक खोलीत आगसूचक गजर बसवलेला असतो आणि त्याच्या आवाजाने लगेच आगीचे बंब धाव घेतात हे विशेष ! याचा नंतरच्या आमच्या वास्तव्यात अनुभव आलाच.आमच्याच वर राहणाऱ्या एका स्वच्छताप्रेमी भारतीय गृहिणीने रेस्टरूमम्धील बेसिन आणि अंघोळीचा टब यामधील जागा स्वच्छ करण्याचा घाट घातला.त्या भागात पाणी निघून जाण्याची सोय नसल्याने ते पाणी जमिनीत जिरून भिंतीमधील विद्युत्जोडणीच्या तारांवरून ओघळून शॉर्ट सर्किट होऊन आग लागून धूर निघू लागला आणि ताबडतोब सगळ्या इमारतीतील गजर वाजू लागून आगीच्या दोनतीन गाड्या तेथे जमा झाल्या.त्यानुळे पुढच्या वेळी नवरात्र अमेरिकेत साजरे करण्याची आवश्यकता भासली तेव्हा घरात नऊ दिवस लावायचा दिवासुद्धा आम्ही भीतभीतच वापरला.
भिंती खिडक्या याविषयी येवढे बेपर्वाई असणारे लोक दारांच्या कुलुपाविषयी मात्र फारच आग्रही असल्याचे दिसले.त्यामुळे आमच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप लावणे आणि उघडणे आम्हाला कित्येक दिवस कठीण्च जात होते.त्यामुळे मुलगा बाहेर कामावर गेल्यावर आम्ही दोघेच घरात असलो तर बरेच दिवस आम्ही फिरायला दोघे एकदम बाहेर पदत नसू कारण दोघे बाहेर पडलो आणि कुलूप उघडता नाही आले तर काय करता.
प्रत्येक इमारतीसमोर मोकळी जागा होती आणि तेथे गाड्या पार्क करण्यासाठी व्यवस्थित आखीव जागा असत आणि तेथे वास्तव्य करणारालाच तेथे गाडी लावता येई.आमच्या इमारतीतून बाहेर पडल्याव्र उजवीकादे वळून थोडे अंतर गेल्यावर एक मोकळे मैदान होते तेथे पूर्वी रोलर स्केटिंगची सोय असावी हे अमेरिकन स्केटस अशा तेथल्या पाटीवरून समजत होते.त्याच्या थोडे पुढे गेल्यावर लगेचच एका मोठ्या इमारतीत ड्रग फेअर या नावाचे औषधाचे नाव असलेले तरी बऱ्याच वस्तू मिळणारे मॉल,त्याच्याच शेजारी मार्शल्स या साखळी दुकानातील एक मोठे मॉल थोए पुढे त्याच इमारतीस लागून लाँड्री आणखी लागून असलेल्या बर्याच इमारतीत बरेच मॉल्स,ज्वेलरी शॉप्स असा मोठा दुकानांचाच भरणा असलेल्या इमारती होत्या. आणि गाड्या पार्क करण्यासाठी असलेली जागाच आपल्याकडील डेक्कन जिमखाना बसस्टँडपासून गरवारे पुलापर्यंतचे क्षेत्र व्यापेल इतकी होती.

वारी ४ - (मंगळ., २३/१०/२००७ - २०:१३)
लंडनला पोचायला जरी जवळजवळ दहा तास लागले होते तरी घड्याळात मात्र सकाळचे अकराच वाजले होते.आम्ही पश्चिमेला चाललो होतो ना ! हवा चांगली असल्याची घोषणा झाली त्यामुळे लंडन राहिले पण हीथ्रो विमानतळ तरी पाहायला मिळेल अशी आशा होती पण तेथेही आमची पार निराशा झाली. आम्हाला विमानतळावर जाऊ दिलेच नाही त्या ऐवजी बाहेर नेऊन एका अतिशय छोट्या हॉलमध्ये आमची रवानगी झाली.तेथे सगळ्यांना बसायपुरतीही जागा नव्हती आणि टॉयलेटही नव्हते.ज्या पूर्वानुभवी मंडळींनी विमानातील अतिआकुंचित टॉयलेटऐवजी विमानतळावरील प्रशस्त सुविधेचा लाभ घ्यायचे ठरवले होते त्यांची परिस्थिती मात्र फारच बिकट झाली. बाहेर सोडायचेच नव्हते तर व्हिसा तपासण्याची काय आवश्यकता होती कळले नाही.भाग्यच आमचे की सामान ताब्यात घेऊन पुन्हा ते चाळणीखालून न्यावयास लावले नाही कारण ९/११ नंतर प्रवास करणाऱ्या काही मित्रांवर असा प्रसंग आला होता.अर्धा पाऊण तास त्या हॉलमध्ये काढल्यावर पुन्हा आम्हांस विमानात सोडण्यात आले आणि आम्ही पूर्वीच्याच जागी स्थानापन्न झालो.त्यानंतरचा प्रवासही बराचसा झोपेतच झाला.माझ्या मागील आसनावरील प्रवासी बरोबर खाद्यपेयांच्या गाड्या आल्या की जागा होत असे आणि मद्याचा भरपूर मोठा डोस पचवून पुन्हा झोपेच्या अधीन होत असे.नऊ तासांनी न्यूयॉर्कचा जे. एफ्. के. विमानतळ आल्याची घोषणा झाली तेव्हा तेथील घड्याळात दुपारचे चार वाजले होते. आम्हाला आय- ९४ फॉर्म्स प्रत्येकी एक आणि दोघात मिळून एक डिक्लेरेशन फॉर्म भरायला देण्यात आले.मला आमचे दोघांचे फॉर्म्स भरायचे असल्याने आणि अजून डोळ्यांवर झोप असल्याने प्रत्येक वेळी फॉर्म भरताना काहीतरी चूक व्हायची.कधी माझ्या फॉर्ममध्ये बायकोचा पासपोर्ट नंबर तर कधी तिच्या फॉर्ममध्ये माझी जन्मतारीख असे घोटाळे करत मी बरेच फॉर्म्स खराब केले.फॉर्म्स मागण्यासाठी मी बायकोला पाठवत होतो,फॉर्म भरण्याचे काम मी करत असल्याने तिलाही ती जबाबदारी आपली आहे असे वाटत होते पण शेवटी विमान कर्मचाऱ्यांनी आता हे शेवटचेच फॉर्म असे निक्षून बजावून सांगितल्यावर तिनेही मला तसे निक्षून सांगितल्यावर मात्र माझ्या हातून चूक न होता फॉर्म्स भरले गेले.फॉर्म्स अगदी प्रवासाच्या शेवटी दिल्यामुळे भरायला पुरेसा वेळ नव्हता अशी तक्रार बरेचजण करत होते त्याअर्थी त्यांच्याही हातून अशाच चुका झाल्या असण्याची शक्यता वाटली.मी फॉर्म्स भरताना केलेल्या चुका पाहून माझ्या मागे बसलेल्या प्रवाशाने प्राशन केलेल्या पेयाचा परिणाम त्याच्या ऐवजी माझ्यावरच झाला की काय की चुकून हवाई सुंदरीने मला ज्यूसऐवजी आणखी काही दिले अशी शंका सौ.ला आल्याचे तिने बोलून दाखवले.तो प्रवासी मात्र एका झटक्यात फॉर्म भरून मोकळा झाला होता.त्याचे कारण त्याची बायको बरोबर नसल्यामुळे त्याच्यावर कसलेच दडपण नव्हते असे मी तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा परिणाम उलटाच झाला. असो! बाहेर पडताना विमान कर्मचाऱ्यांनी (अगदी सुटलो यांच्या तावडीतून असा चेहरा न करता)हसून आम्हाला निरोप दिला आणि पुन्हा लांबलचक बोगदा मार्गाने बाहेर पडलो.
लगेच इमिग्रेशनसाठी निरनिराळ्या रांगा लागल्या होत्या त्यातील एका रांगेत आम्हाला उभे केले गेले.तेथील कर्मचारी आमचे पासपोर्ट, व्हिसा यांची पाहणी करून आम्ही किती महिने राहायचे याचा विचार करून तसा शिक्का आमच्या प्रवासपरवान्यावर मारत होते.आम्हा दोघांची पाहणी करून आम्ही कोणाकडे आणि कशासाठी चाललो आहोत असे विचारल्यावर आम्ही मुलाला भेटायला आलो आहोत असे सांगितल्यावर त्याचा पत्ता विचारून खात्री करून घेण्यात आली.आणि किती दिवस राहणार असे विचारल्यावर मी इमानेइतबारे चार महिने म्हणून सांगितले त्यावर स्मितहास्य करून मारलेला शिक्का बघून आश्चर्य वाटले कारण त्याने सहा महिन्याचा शिक्का मारला होता.कदाचित आमच्या पूर्वीच्या प्रवाशास त्याने तो शिक्का वापरला असावा तर तोच शिक्का मारावा उगीच कशाला बदलायचा नाहीतरी हा चार महिनेच राहायचे म्हणतोय असा विचार त्याने केला असावा,किंवा चार महिन्या ऐवजी सहा महिनेच काय कितीही काळ राहिला तरी ही मंडळी काही विशेष त्रासदायक होणार नाहीत असाही केला असावा.काहीका असेना इतरांना येणाऱ्या अनुभवाच्या उलट अनुभव आम्हाला आला. कारण काही लोकांना सहा महिने सांगूनही तीनच महिन्याचा किंवा महिन्याचाच परवाना देण्यात आल्याचे अनुभव काही जणांनी निवेदन करून आम्हाला घाबरविले होतेच.आमच्या एका मित्राचा अनुभव मात्र नमुनेदार होता.त्याच्या पूर्वीच्या प्रवाशाने माझ्याचसारखा चार महिने राहण्याचा विचार व्यक्त केला होता त्याला वापरलेला शिक्काच त्या मित्रवर्यांच्यासाठी इमिग्रेशनवाल्याने मारण्यासाठी हात उचलताच या आमच्या मित्रमहाशयानी आपला हात मध्ये घातला कारण त्यांना सहा महिने राहायचे होते.त्या मित्राच्या सावधानतेचे मला तरी कौतुक वाटते कारण आमच्याच भवितव्यतेच्या चिंतेत मी इतका मग्न असतो की आपल्यापुढची व्यक्ती काय बोलते आणि त्यावर काय प्रतिक्रिया होते या गोष्टीकडे लक्ष देणे मला तरी काही जमले नसते. सुदैवाने त्या इमिग्रेशनवाल्यावर त्यांच्या हात मध्ये घालण्याचा काही विपरीत परिणाम झाला नाही आणि त्यांनाही सहा महिन्याचा शिक्का मारून मिळाला.
आता सामान ताब्यात घेण्याची वेळ आली.बॅगेज क्लेम अशी खूण असलेल्या भागात आम्ही प्रवेश केला.तेथे निरनिराळे पट्टे वर्तुळाकार मार्गात फिरत होते आमच्या उड्डाणाचा क्रमांक असलेल्या पट्ट्याजवळ जाऊन आम्ही सामान येण्याची वाट पाहू लागलो.त्यापूर्वी एक डॉलरमध्ये एक ट्रॉली विमानतळावर उपलब्ध होईल अशी सूचना मुलाने देऊन ठेवल्यामुळे एक एक डॉलरची नाणी मुठीत पकडून आम्ही जात होतो पण आम्हाला तेवढाही त्रास होऊ नये अशी अमेरिकनांची इच्छा असावी त्यामुळे त्या पट्ट्यापाशीच सोडलेल्या दोन ट्रॉल्या आम्हाला मिळाल्या आणि फिरत्या पट्ट्यावरून सामान येण्याची वाट पाहू लागलो.आमच्या बॅगांसारख्याच सगळ्या बॅगा दिसत असल्याने आपल्याच बॅगा आपल्याला कशा मिळणार अशी भीती मला पडली होती पण सौ. ने मात्र कशी काय आपली बॅग बरोबर हेरली आणि पट्ट्यावरून खाली खेचलीसुद्धा मग तिच्यापाठोपाठ इतर बॅगांनीही शरणागती पत्करली. विजयी वीरांप्रमाणे आपले सामान दोन ढकलगाड्यांवर चढवून आम्ही आता शेवटचा अडथळा म्हणजे सामानासह अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांच्या चाळणीतून बाहेर पडण्याचा पार करायला निघालो.बाहेर पडताना आपल्या बॅगा उघडायला लावतात आणि त्यातील त्यांच्या दृष्टीने आक्षेपार्ह म्हणजे काही खाद्यपदार्थ वगैरे ( कारण आमच्याकडे बाँब असणे शक्यच नव्हते)काढून बाहेर फेकून देतात का हे पाहणे आणि काही प्रश्न विचारतात का हे पाहणे येवढेच उरले होते.पण तेथेही आम्ही आणि आमचे सामान अगदीच लक्ष न देण्याच्या लायकीचे ठरलो आणि आपल्याला मुळीच भाव न मिळाल्याचे कणभरही दुः ख न होता (उलट थोडासा आनंदच ) आम्ही बाहेर पडलो.आम्ही बाहेर पडत असतानाच सुजितचा आमच्या मुलाचा चेहरा दिसला आणि जीव भांड्यात पडला. पण अनपेक्षितपणे त्याच्याबरोबर एक व्यक्ती दिसली ती होती एक गोरी चष्मा लावलेली मुलगी ! आम्हाला भारतात करावयाच्या तयारीचा मेल करताना त्याने त्याच्या एका मैत्रिणीचे आई वडील नुकतेच येऊन गेल्यामुळे तिने केलेल्या तयारीचा उल्लेख त्यात होता.त्याउपर आणखी काही अधिक आहे की काय अशी शंका मला आली होती आणि आता आम्ही बाहेर पडताच " ही संयुक्ता राव " अशी तिची ओळख करून देताना तिने आम्हाला वाकून नमस्कार केल्यामुळे ती खरी असावी असे वाटले.
आता आम्ही निश्चिंत झालो कारण मुलगा बरोबर होता.न्यूयॉर्क विमानतळाबाहेर पडताना आमच्या सामानाचा ताबा त्या दोघांनी घेतला होता आणि आम्ही त्यांच्याबरोबर चालू लागलो,रस्ता ओलांडण्यापूर्वी संयुक्ताने समोरच्या खांबावरचे बटण दाबले आणि समोरचा दिवा हिरवा होताच आम्हाला चला असे म्हटले.आपण बटण दाबून रहदारी थांबवू शकतो ही गोष्ट आमच्या तर्कशक्तीच्या बाहेरची होती कारण सिग्नल तांबडा असला तरी वाहने थांबत नाहीत हा आमचा सिंहगड रोड अथवा पुण्यातील कोठल्याही रस्त्यावरचा अनुभव ! पुढे तर केवळ आम्ही बटण दाबले म्हणूनच नाही तर आम्ही रस्ता ओलांडतो असे पाहूनही मंत्र्यांच्या गाड्या येताना थांबावी तशी रहदारी थांबते हे पाहून आम्ही अगदी अचंबित झालो.सुजितने आम्ही येणार आमचे सामान बरेच असणार म्हणून एक मोठी गाडी भाड्याने आणली होती.बाहेर भला मोठा वाहनतळ होता आणि त्यात आपली गाडी शोधून त्याने सामान चढवले आणि आमचा अमेरिकेतील रस्त्यावरचा पहिला प्रवास सुरू झाला.
जे. एफ्.के. विमानतळापासून सुजितच्या घराकडे यावयास जवळजवळ दोन अडीच तास लागले̱. गाडीत आमच्या गप्पा चालू असल्याने माझे लक्ष बाहेर जरा कमीच होते,शिवाय सौ̮. ला संयुक्ताशी बोलण्यात अधिक रस होता कारण मला ज्या गोष्टीची शंका होती त्याविषयी तिला खात्रीच होती ज्यावेळी माझे लक्ष बाहेर गेले त्यावेळी आम्ही सुजितच्या घराच्या बरेच जवळ आलो होतो असे तो म्हणत होता आणि रस्त्यावरील दुतर्फा दुकाने आणि हॉटेले यावरील पटेल अश अंड कॅरी, सब्जीमंडी वगैरे वाचल्यावर चिमणराव स्कौटमास्तरांच्या गाडीचे बैल रात्री उलटे फिरून परत पुण्यातच आले तसे आम्ही पण चुकून पुन्हा भारतातच आलो नाही ना असे क्षणभर वाटले पण बरोबर अमेरिकेतील मंडळी असल्याने तसे काही नाही याची खात्री होती.शिवाय दुकाने भारतीय असली तरी रस्त्यावर वाहने शिस्तीत चालत होती त्या अर्थी आपण भारतात असणे शक्य नाही असे वाटले. नंतर मात्र न्यू जर्सी तील हा भाग अगदी मिनिइंडियाच आहे हे समजले.काही दिवसांनी येथील अमेरिकनांनाच गुजराती शिकावी लागेल अशी शक्यता वाटते.कारण येथे भेटणारा कोणताही गुजराती आपल्याशी प्रथम गुजरातीमधूनच बोलू लागते. आपल्या मराठी लोकांचे तसे नाही बरका .ते प्रथम आणि शक्यतो नंतरही इंग्रजीतच बोलण्याचा प्रयत्न करणार. असो तो पुढचा भाग झाला.दोन अडीच तासांच्या छोट्या प्रवासानंतर आम्ही सुजितच्या घरात शेवटी प्रवेश केला त्याचा पत्ता होता ३०९ हिडन वॅली ड्राइव्ह,एन् जे.

वारी ३ - (शनि., २०/१०/२००७ - ०८:४२)
आता अगदी हातातून दोर सुटलेल्या पतंगासारखीच आमची अवस्था झाल्यासारखे वाटले. आम्ही जणू काय एअरपोर्ट झाडायलाच पोचल्यामुळे एक्सरे स्क्रीनिंग सुरू झाल्यावर त्यावर बॅगा चढवणारे पहिले आम्हीच होतो. आमच्या चार मोठ्या आणि दोन लहान बॅगा बेल्टवरून एक्सरे मशीनखालून खडखड करत निर्विघ्नपणे पलीकडे जाऊन पडल्या आणि पलीकडील कर्मचाऱ्याने त्या प्लॅस्टिक बेल्टने सील करून टाकल्यावर विमानतळावर वाचायला म्हणून नेलेले पुस्तक आतच राहिल्याचे ध्यानात आले.पण केबिन बॅगांचे सील महत्त्वाचे नसते हे त्यावेळी तरी माहीत नसल्यामुळे गप्प बसलो. बोर्डिंग पास मिळण्यासाठी आता योग्य कौंटरवर जायचे होते अर्थात तेथेही रांग लावून उभे राहणारे आमच्याशिवाय कोणीच म्हणजे प्रवासी आणि कर्मचारी पण-- नव्हते. बसलो वाट पाहत त्यांच्या येण्याची ! कारण आता सामान त्यांच्या ताब्यात देऊन मोकळे झाल्याशिवाय हालचाल करणे अवघड होते.थोड्या वेळाने त्या कौंटरवरचे कर्मचारी आले आणि आमचे तिकीट पासपोर्ट पाहून आमच्या बॅगांना काउंटरशेजारून जाणाऱ्या पट्ट्यावर आश्रय मिळाला. आम्ही अगदी काटेकोर वजन करून आणल्यामुळे वजन जादा होण्याची शक्यता नव्हतीच त्यामुळे आमच्या चार बॅगा सुरळीतपणे आत गेल्या.आम्हाला ऐल सीट्स (कडेच्या) घ्या असे मुलाने कळवले होतो आणि आम्ही तसे म्हटल्यावर आम्हाला पाहिजे तशा जागांचे बोर्डिंग पासेस मिळाले. यापुढे तिकिटाऐवजी तेच दाखवावयाचे.आता हातात फक्त केबिन बॅग्ज च राहिल्या आणि हलके हलके वाटू लागले.आता इमिग्रेशनमध्ये जाण्यापूर्वी बरोबर आलेल्या सगळ्यांना जाऊन सगळे ठीक जमले असे सांगितले.म्हणजे आता त्यांना सटकायला हरकत नव्हती इमिग्रेशनच्या वाटेने आत गेले की परत बाहेर येता येत नाही,निदान आमच्यासारख्या सामान्य माणसांना तरी ! त्या टेबलापाशी बसणाऱ्या माणसाने आमचा व्हिसा आणि पासपोर्ट पाहून आम्हाला दहा वर्षाचा व्हिसा कसा मिळाला याविषयी उत्सुकता ( आश्चर्य ?)व्यक्त केली.कदाचित नुकताच त्याच्या मुलाला अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला असावा नाहीतर अमेरिकन कॉन्सुलेटने आमच्यावर मेहेरबानी केल्याचे त्याला दु : ख व्हायचे तसे काही कारण नव्हते. त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देताच आम्ही पुढे सटकलो कारण त्याची तशी अपेक्षा नसावी आणि आम्हाला उत्तर माहीत नव्हते.यापुढील भागात एका चौकटीतून प्रवेश करावा लागत होता.त्या चौकटीच्या बाहेर ठेवलेल्या टोपलीत आपले बूट,घड्याळ, पर्स , पँटचा बेल्ट, काढून ठेवावे लागते.(घाईघाईत जॉर्जसाहेबानी त्यावेळी बेल्टबरोबर इतर कपडेही उतरवले असावेत) त्या टोपल्या केबिनबॅगांसह चाळणीखालून जातात आणि पलीकडे जाऊन पडतात, आपण मात्र त्या चौकटीतून प्रवेश करायचा त्यावेळी मेटल डिटेक्टर सर्वांगावरून फिरवून आपण विमान उडवण्याच्या तयारीत आलो नसल्याची खात्री करून घेण्यात येते.पलीकडे जाताना सौ.च्या अंगावरून मेटल डिटेक्टर फिरवल्यावर आवाज आल्यामुळे मी घाबरलो पण नंतर ते चुकीचे निदान झाल्याचे कळले आणि मग आम्ही केबिनबॅगांसह विमानात चढण्याच्या लायकीचे ठरवल्यावर आम्हाला पलीकडे प्रवेश मिळाला. बोर्डिंग पासवरच कोणत्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून विमानात प्रवेश करावा लागेल याची नोंद असते त्या भागात जाऊन ते द्वार उघडण्याची आम्ही तेथे असलेल्या अनेक आरामशीर खुर्च्यांपैकी आम्हाला सोयिस्कर वाटणाऱ्या खुर्च्यांत बसून वाट पाहू लागलो.
यापूर्वी विमानप्रवासाचा अनुभव नसल्यामुळे चित्रपटात नायक नायिका विमानाला लावलेल्या शिडीवरून उतरताना आपल्या आईवडिलांकडे पाहून हात हालवताना पाहिल्यामुळे आपणही तसेच प्रवेशद्वार उघडल्यावर विमानात शिडीने चढणार अशा कल्पनेने," पायऱ्या जरा जपून चढ " अशी सूचना सौ. ला देण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात सहा वाजल्यामुळे आम्हाला " एअर इंडियाच्या न्यूयॉर्कला जाणाऱ्या उड्डाणातील प्रवाशांनी तयार राहावे" अशी सूचना मिळाली व आम्ही लगबगीने तयार झालो.प्रथम व्हीलचेअरवर बसणारे आणि बालके बरोबर असणारे प्रवासी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास च्या प्रवाशांना आत सोडण्यात आले त्यानंतर आमच्या आसनक्रमांकानुसार आम्हाला आत सोडण्यात आले.आत गेल्यावर बऱ्याच लांबलचक बोगद्यासारख्या मार्गाने आम्ही चालू लागलो.तो मार्ग इतका लांबलचक होता की हे आता आम्हाला जे. एफ् . के. पर्यंत चालतच नेतात की काय असे वाटू लागले तोच समोर एक प्रवेशद्वार आणि त्यात हसतमुखाने उभे राहून आमचे स्वागत करणारे हवाई सुंदरी आणि इतर कर्मचारी दिसल्यावर आपण विमानानेच जाणार याची खात्री वाटून जिवात जीव आला.हवाई सुंदऱ्या बहुतेक सेवानिवृत्तीपूर्वीचा शेवटचाच प्रवास करायला निघाल्या असाव्यात. अर्थात आमच्यासारख्या सेवानिवृत्त होऊनच प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना योग्य असली तरी इतर प्रवाशांची मला दया आली.त्यांनी आम्हाला आमच्या हातातील बोर्डिंग पासेस पाहून आम्ही कोठे जायचे याविषयी दिग्दर्शन केले आणि त्यांच्या सूचनेनुसार आमच्या आसनक्रमांकाकडे जाऊन हाशहुश करत बसलो.
विमानात शिरल्यावर परत बरोबर घेतलेल्या पुस्तकाची आठवण झाली.ते पुस्तक केबिन बॅगमध्ये होते आणि केबिनबॅग आत शिरताच नेहमीच्या तत्परतेने डोक्यावरील सामान ठेवण्याच्या जागेत ठेवल्याचेही स्मरण झाले.ते काढून घ्यायचा विचार करतो तोच विमानातील कर्मचारी आणि हवाई सुंदऱ्या सगळ्या वरच्या कप्प्यांची झाकणे जोरात आवाज करत लावून जाताना बेल्ट बांधायला आणि मोबाईल बंद करायला सांगून गेल्या.तेव्हा मला बेल्टची आठवण झाली . त्याची टोके माझ्याच अंगाखाली गेलेली काढून लावायला गेलो तेव्हा एक टोक शेजारील सौ, च्या सीटचेच हातात आले आणि ते ओढून बेल्ट बांधायच्या प्रयत्नात तिच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होऊन सगळ्या प्रवाशांना ऐकू येईलशा आवाजात " अहो माझा बेल्ट कशाला ओढताय ?" अशी माझी कानउघाडणी झाल्यावर आणि तिनेच माझ्या बेल्टचे तिच्याच अंगाखाली गेलेले टोक माझ्या हातात दिल्यावर मला बेल्ट लावणे शक्य होऊन कर्तव्यपूर्तीचा आनंद झाला. आता विमान चालू होण्याची आम्ही वाट पाहू लागलो सुरवातीला बराच काळ फक्त घरघराटच ऐकू येत होता आणि वैमानिकाच्या सूचनेवरून आम्ही उड्डाण करत आहोत येवढे समजले पण विमान जागा सोडायला तयार नव्हते. अर्थात आमच्या नेहमीच्या एस् .टी. च्या प्रवासाप्रमाणे सर्व प्रवासी स्थानापन्न झाल्यावर या बसचा टायर पंक्चर झाल्यामुळे सर्व प्रवाशांनी खाली उतरून दुसऱ्या बसमध्ये बसावे अशी सूचना विमानप्रवासात होत नसावी अशी आशा मला होती. सुदैवाने वैमानिकाने काही तांत्रिक कारणामुळे विमान सुटायला उशीर होत असल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली आणि माझा जीव थोडासा भांड्यात पडला कारण तांत्रिक अडचणीमुळे किती विलंब होईल याचा अंदाज नव्हता पण लगेचच पुन्हा घरघर सुरू होऊन विमान गजगतीने चालू झाले.ते बराच वेळ चालले आणि पुन्हा थांबले मग परत ते उलट्या दिशेने धावू लागले पुन्हा ते थांबले आणि आता कसे काय होणार अशा चिंतेत मी असतानाच ते एकदम वेगाने योग्य दिशेने धावू लागले ते आता मात्र उड्डाण करायचेच या करारानेच ! आणखी वीसपंचवीस सेकंदातच जमिनीशी संपर्कामुळे चाकांचा होणारा खडखडाट एकदम बंद होऊन आपण हवेत तरंगत आहोत याची जाणीव झाली. आमची आसने खिडकीजवळ नसली तरी शेजारच्या खिडकीतून आपण मुंबईच्या आकाशात विहार करू लागल्याचे आणि खालील रस्ते,इमारती.माणसे लहान होत जात आहेत हे समजत होते. समोरच्या पडद्यावर विमानाचा वेग, जमिनीपासून उंची निघण्याची वेळ गंतव्य स्थान आणि अंतर तेथे पोचण्याची वेळ या गोष्टी दिसू लागल्या.विमान योग्य त्या उंचीवर स्थिर झाल्यावर विमान वर जाताना कानाला दडे बसण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्वानुभवी माणसांच्या सल्ल्यानुसार कानात घालण्यासाठी कापसाचे बोळे बरोबर घेतले होते त्यांची आठवण आता झाली आणि आता कानात बोळे घालायचे काही कारण नाही हे समजले..पुस्तक काढावे काय असा विचार करत होतो पण तेवढ्यात समोरील पडद्यावर संकटकाळी तुमच्या डोक्यावरील ऑक्सिजन मास्क कसा वापरायचा किंवा विमान पाण्यात पडल्यास लावावयाचे लाईफ जॅकेट कसे वापरायचे याचे दिग्दर्शन झाले.त्यानंतर आता बेल्ट सोडायला आणि हालचाली करायला हरकत नाही अशी सूचना मिळाल्यावर मी वरून पुस्तक काढावे काय याचा विचार करू लागलो,तेवढ्यात मनोरंजनासाठी विमानात खुर्चीच्या मागील पिशवीत हेडफोन होते.ते खुर्चीस असलेल्या कनेक्शन पॉंईंटला जोडल्यावर आणि कानाला लावल्यास संगीत अथवा समोर चालू असलेल्या चित्रपटातील संवाद ऐकणे शक्य होते.हे लक्षात आले.पण येथेही बसच्या प्रवासाचाच अनुभव माझ्या वाटणीस आला. अगदी वातानुकूलित लक्झरी बसने प्रवास केला तरी नेमकी माझ्याच खुर्चीची पाठ हटवादीपणे आपला ताठ बाणा सोडायला तयार होत नाही.आणि रात्रभर इतर लोकांचे घोरणे मला ताठ मानेने आणि पाठीने मला ऐकून घ्यावे लागते.येथे मी कानाला हेडफोन लावल्यावर काहीच ऐकू येत नव्हते मात्र नेहमीप्रमाणे कनेक्शन करण्यात चूक करणारी माझी बायको मात्र संगीत ऐकण्यात ( की समोरील चित्रपट बघण्यात) गुंग झाली.मी तिला तसे सांगताच तिने मी लावलेल्या कनेक्शनची पाहणी केली आणि ते बरोबर असल्याचे प्रमाणपत्र देताच विमानसुंदरीस बोलावून तिला माझी अडचण सांगितल्यावर आता विमान चालू झाल्यावर काही करता येत नसल्याबद्दल तिने दिलगिरी व्यक्त केली.व ती उदार मनाने मी स्वीकारली.(कारण दुसरा पर्यायच नव्हता)आमच्या बायकोने आपल्या कानाला हेडफोन लावून माझ्याशी बोलण्याचे कनेक्शन तोडून टाकले होते. त्यामुळे मी मात्र समोरच्या खुर्चीच्या पाठीवर असलेल्या पुस्तिकेत विमान समुद्रात पडल्यास तरंगण्यासाठी दिलेले जाकीट कसे फुगवावे आणि वापरावे किंवा खुर्चीच्याच वरून येणारा ऑक्सिजनचा मुखवटा तोंडावर कसा चढवावा याविषयी दिलेल्या सूचना वाचत बसलो.आणि इतरेजन संगीत चित्रपटाचा आस्वाद घेत असताना विमान समुद्रात केव्हा पडते याची वाट पाहत बसलो. अर्थात त्या सूचनांचा एवढा अभ्यास केल्यामुळे विमान खरोखरच समुद्रात पडल्यास मी वाचणार होतो अशातला भाग नव्हता फार तर बुडता बुडता ( आपल्या पेश्याला अनुसरून) त्या विषयावर एकांडे लेक्चर देऊ शकलो असतो.पण त्यातही दुः खाची बाब ही की हा लेक्चर देता देता (तानाजी जसा लढता लढता) मेला असे सांगायला तरी कोणी उरेल की नाही याचीही शंकाच होती.पण थोड्या वेळाने सौ. ने उदार मनाने आपल्या खुर्चीचे कनेक्शन मला दिले आणि मलाही संगीत ऐकू येऊ लागले.आणि थोड्याच वेळात तिच्या औदार्याचे कारण कळले.एक म्हणजे चित्रपटाची भाषा तिला कळत नव्हती. अर्थात ती मलाही फार समजत होती अशातला भाग नव्हता, संगीताच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची एकच कॅसेट एअर इंडियाच्या साठ्यात उपलब्ध होती आणि प्रत्येक पंधरा मिनिटांनी तीच पुन्हा पुन्हा लावली जात होती,थोडक्यात वीस तासाच्या प्रवासात सर्व गाणी अथवा ख्याल प्रवाशाला मुखोद्गत व्हावेत अशी एअर इंडियाची इच्छा असावी.इतर चॅनेलवरील रॉक आणि पॉप संगीतात आम्हा दोघांनाही मुळीच रस आणि गम्य नव्हते.खाद्यपेयांच्या ट्रॉलीज मधून मधून येत होत्या पण नेमका तो मंगळवार असल्यामुळे आणि तो आमचा उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांच्या खानपानापैकी सुका मेवा काही फळे आणि चहा आणि काही शीतपेयांचाच काय तो आम्ही समाचार घेऊ शकलो. मधल्या काळात मोठ्या धाडसाने मी केबिन बॅग काढून त्यातील पुस्तक काढून वाचायला सुरवात केली आणि रात्री १२ पासून डोळ्याला डोळा न लागल्याने मला हळूहळू झोप लागली आणि जाग आली तेव्हा लंडनचा विमानतळ आला आता पट्टे आवळा अशी सूचना ऐकूनच.

वारी २ - (शुक्र., १२/१०/२००७ - १३:१७)
अमेरिकेचा प्रवेशपरवाना अर्थात व्हिसा विनासायास मिळाला आणि तोही दहा वर्षाचा ही आमच्या दृष्टीने फारच मोठी उपलब्धी होती. सुजितने म्हणजे -माझ्या मुलाने एअर इंडियाच्या विमानप्रवासाची तिकिटे पाठवलीच होती.तरी त्याच्याकडून तिकिटे मिळण्यापूर्वी विमानप्रवासाची तिकिटे मिळवण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला होताच.कारण आमच्या पूर्वानुभवी मित्रानी निरनिराळ्या विमानकंपन्या एकाच प्रवासासाठी वेगवेगळी भाडी आकारतात येवढेच काय पण निरनिराळ्या प्रवासी कंपन्या पण त्यात आणखी काही सवलती देतात आणि त्यात किफायतशीर भावात तिकिट खरेदी करून बरेच पैसे वाचवता येतात असा मोलाचा सल्ला दिला.आमचा यापूर्वीचा प्रवासाचा अनुभव मराठवाड्यात अधिक काळ कंठल्यामुळे म.रा.मा.प.मं (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ) पुरताच मर्यादित असल्यामुळे विमानप्रवासास निघणे हे आमच्या दृष्टीने बिगरीतल्या मुलाला एकदम एस. एस. सी च्या परीक्षेला बसविण्याचाच प्रकार होता त्यामुळे निरनिराळ्या प्रवासी कंपन्यांकडून ऐकलेली माहिती फक्त ऐकून घेणेच आमच्या आवाक्यात होते,त्यातही एअर इंडियाने आमच्या प्रवासाची तारीख मे महिन्यातील असल्यामुळे आणि आम्ही चौकशी मार्चमध्ये करत असल्यामुळे एक एप्रिलपासून दर बदलणार आहेत असे सांगून आम्हास लोंबकाळत ठेवले आणि इतर कंपन्यांविषयी आम्ही साशंक होतो. आश्चर्य म्हणजे एअर इंडियाचे दर हे नेहमीच बदलत असतात आणि त्याची पक्की माहिती कोणत्याच प्रवासी कंपनीकडे नसते असे पुढे अनुभवास आले.अलितालियाने ज्येष्ठ नागरिकासाठी काही सवलत देण्याची तयारी दाखवली होती. टाइम्स ऑफ इंडियात मात्र निरनिराळ्या प्रवासी कंपन्या अगदी कमी भाड्यात अमेरिकेला अथवा जगात कुठेही नेण्याची तयारी दाखवणाऱ्या जाहिराती देत होत्या.आमच्या साडूंना मी फोन करून विचारले कारण त्यांचा एक पाय नेहमी विमानातच असतो तर त्यानी एअर फ्रान्स ची तिकिटे ब्लॉकच करून टाकली. एअर फ्रान्सचे भाडे बरेच जास्त म्हणजे इतर काही कंपन्यांपेक्षा माणशी वीस हजार रुपये अधिक होते अर्थात ब्लॉक करताना पैसे द्यावे लागत नसल्यामुळे मला फारसा धक्का बसला नाही.आमच्यासारख्या परत येणाऱ्या व्यक्तींसाठी तिकिट परतीचेच असते आणि एकेरी प्रवासाच्या भाड्याशी तुलना करता ते बरेच कमी पडते.तसेच तुम्ही चार महिने रहाणार की सहा महिने यावरही तिकिटाचे दर अवलंबून असतात. परतीची तारीख निश्चित नसल्यास घेतलेल्या तिकिटास खुले किंवा ओपन तिकिट म्हणतात,पण काही विमानकंपन्या अशी तिकिटे देत नाहीत आणि दिल्यास जास्त भाडे लावतात सुदैवाने या सर्व माहितीच्या गोंधळातून सुजितने एअर इंडियाचे ओपन तिकिट पाठवून आमची सुटका केली अर्थात त्याने पाठवले नसते तर मी शेवटी एअर इंडियाचेच तिकिट घेतले असते याला दोन कारणे होती.एक म्हणजे एअर इंडियाचे विमान त्यावेळी सहार (मुंबई) विमानतळावरून निघून लंडन मार्गे जे.एफ.के.(न्यूयार्क) विमानतळावर उतरे आणि या प्रवासात लंडनला एक थांबा असला तरी विमान आणि विमानतळ बदलावा लागत नव्हता ( आताही तीच परिस्थिती आहे) आणि दुसरे एअर इंडियातील खानपान सुविधा आमच्यासारख्या शाकाहारी मंडळींना योग्य होती.
आता यापुढील तयारी म्हणजे सामान काय आणि किती न्यायचे याची! पण ही तयारी सौ.ने आणि त्याशिवाय आम्ही जाणार याची वर्दी लागलेल्या आणि ज्यांचे पाल्य अमेरिकेत आहेत अशा आमच्या मित्र आणि मित्र नसलेल्याही लोकानी अगोदरच सुरू केलेली दिसली.कारण आम्हाला बऱ्याच लोकांचे प्रेमळ आवाजात फोन येऊ लागले की आमच्या बॅगेत थोडी जागा असेल तर त्याना काहीतरी पाठवायचे आहे.एक दिवशी सकाळीच आमचा फोन खणाणला आणि मी कानाला लावताच पलिकडून 'मी देशपांडे बोलतोय" असे शब्द ऐकू आले.देशपांडे हे नाव आमच्या कुलकर्णी नावाइतकेच सर्वसमावेशक असल्याने ' आपण कोणते देशपांडे" अशी पृच्छा मी केली त्याव्र त्यानी सांगितलेले नाव माझ्या परिचयाचे नव्हते पण त्यानी त्यांचा मुलगा आमच्या मुलाचा मित्र असल्याची माहिती देऊन अगदी थोडेसे सामान आमच्याबरोबर पाठवायचे आहे असे सांगितले.त्यांचे सामान नेणे ही आमची जणु जबाबदारीच आहे असा त्यांचा सूर वाटल्याने मी 'माझ्या मुलाने काही तसा उल्लेख केला नाही" असे त्यांच्या कानावर घातले तेव्हां"असे कसे म्हणता असे एकमेकाला साह्य करावे लागते "असा उपदेश करायला सुरवात केल्यावर मात्र मला फार आनंद झाल्याचे मी न दर्शवल्यामुळे देशपांडे साहेबानी माझा नाद सोडला.
सामान काय न्यावयाचे यावर बरीच चर्चासत्रे झाली सुजितला आवश्यक वस्तूंची यादी त्याने दिलीच होती. आम्हाला त्यावेळी प्रत्येकी ३६ किलो वजनाच्या प्रत्येकी दोन बॅगा आणि केबिनमध्ये प्रत्येकी सात ते दहा किलो वजनाची एक बॅग नेण्याची मुभा होती, बॅगाचे आकारमानही निश्चित केलेले होते. अशा प्रकारच्या बॅगा आमच्याकडे असणे शक्यच नव्हते त्यामुळे संन्याशाच्या लग्नाप्रमाणे आम्हाला बॅगेपासून तयारीला लागणे आवश्यक होते, त्या बॅगा आणल्यावर त्या आपल्याला खेळण्यासाठी आणल्या आहेत अशी आमच्या नातवाने समजूत करून त्यावर उड्या मारून बॅगा पुरेश्या दणकट आहेत याची शहानिशा करून दिली.त्यानंतर त्या बॅगात सामान भरण्याचे आणि काढण्याचे काम जायच्या आधल्या दिवसापर्यंत चालू होये कारण सामानाचे वजन जरा जास्त झाले तर ते काढायला लावतात असे ऐकले होते.त्याशिवाय अमुक वस्तु घेऊन जाता येत नाही तमुक वस्तु अमेरिकेच्या विमानतळावर काढून फेकून देतात असे पूर्वानुभवी लोकानी आम्हाला घाबरवण्याचे बरेच प्रयत्न केले. अर्थात त्यांच्या मते असा मोलाचा सल्ला देऊन ते आमच्यावर उपकारच करत होते.या सल्ल्यांमुळे आमचे बॅगा भरण्याचे काम दुपटीने वाढले होते कारण बॅगेत गेलेली प्रत्येक वस्तू एकदोनदा तरी बॅगेबाहेर काढली जाऊनच शेवटी बॅगेत स्थानापन्न होत असे.त्यानंतर वजन बरोबर ३६ किलो करण्यासाठी बऱ्याच वस्तूना आपली जागा बदलावी लागली.वजनाविषयी मी एवढा काटेकोर कॉलेजात केमिकल बॅलन्स वापरतानाच झालो होतो आणि त्यानंतर कधीतरी बायकोसाठी दागिना ( अशी वेळ क्वचितच आली) घ्यायला सोनाराकडे गेलो तेव्हां ! मात्र त्यानिमित्ताने वजनमापक काटा घरी आला आणि त्याचा उपयोग घरातील व्यक्तीची वजने करण्यातही झाल्यामुळे सौचे केवळ मानसिक बलच नव्हे तर शारीरिक बलही माझ्यापेक्षा जास्त आहे हे सप्रमाण सिद्ध झाले .
अमेरिकेत जाताना स्वत: साठी मात्र फारसे काही न्यावे लागत नाही म्हणजे अमेरिकन लोक कपड्यांविषयी (आणि कपडे घालण्याविषयीही) फारसे आग्रही नसल्यामुळे केवळ लज्जारक्षणापुरते कपडे नेले तरी चालते,मग हौस म्हणूनच ज्यादा कपडे न्यायचे असल्यास न्यायचे , शिवाय उन्हाळ्यातच आम्ही जात असल्याने थंडीसाठी खास काही नेणे आवश्यक नव्हते.
त्यामुळे माझे काम फारच सोपे झाले. अर्थात बायकांना हे लागू पडत नसल्याने सौची बॅग नेहमीप्रमाणेच हाउसफुल्ल होती.
या वयात परदेशी(येवढेच काय पण परगावीदेखील) जाताना न विसरता नेणे आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे आमची नेहमीची औषधे आणि अमेरिकेत जाताना त्याचबरोबर आवश्यक म्हणजे आरोग्यविमा.कारण अमेरिकेत तुमचा विमा नसेल तर डॉक्टर तुमच्या अंगाला हातही लावायला घाबरतात म्हणे!आणि तोही थोडाथोडका नाही तर पाच लाख डॉलर्स ची भरपाई करण्याइतका हवा असा मुलाचा आग्रह ! बरे खर्चाची सबब सांगितली तर तो पैसे पाठवायला तयार असल्याने नकार देता आला नाही त्यामुळे वाया जाणार याची खात्री असली तरी जनरल इन्शुअरन्स कं ला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयांचा नैवेद्य दाखवून आलो.येवढे करूनही आमच्या एका मित्राला एक दात काढण्यासाठी अमेरिकेत आलेला खर्च भारतात येऊन पाच सहा महिने झाले तरी त्याची भरपाई झाली नव्हती असा त्यांचा अनुभव पण गाठीशी बांधला. दुसऱ्या एका मित्राचा अनुभव वेगळाच होता.तो चार महिनेच अमेरिकेत रहाणार असल्याने त्याने विमा तेवढ्याच मुदतीचा घेतला होता पण त्याना मुक्काम वाढवावा लागला म्हणून विम्याची मुदत संपल्यादिवशी ते विमा कंपनीकडे निघाले आणि जातानाच जिन्यात पडून पायाला फ्रॅक्चर झाले प त्यांचे नशीब येवढे खराब की त्याच दिवशी मुदत संपल्यामुळे त्याना एकही पैसा खर्चाची भरपाई मिळाली नाही.
बॅगा भरल्यानंतर आम्ही निघायला सिद्ध झालो म्हणायला हरकत नव्हती
आमच्याशी फोनवर बोलून आणि एक मोठा विरोप (ईमेल) पाठवून सुजितने सहार विमानतळावर प्रवेश केल्यापासून ते केनेडी ( जे. एफ .के.) विमानतळातून बाहेर पडेपर्यंत कायकाय करावे लागते,कोठे काय खबरदारी घ्यायला हवी याविषयी बऱ्याच सूचना दिल्या होत्या.परीक्षेला बसणाऱ्या मुलासारखा मी त्या डोक्यात घोळवत होतो शिवाय जे पूर्वी जाऊन आले होते त्यानी त्यांच्या मुलांना द्यायचे गाठोडे आमच्या बॅगमध्ये बसू शकले नाही तरी निराश न होता आपल्या अनुभवाचे भले मोठे गाठोडे आम्हाला बरोबर देण्यात कुचराई केली नव्हती शिवाय बरोबर आमचे भारतातील चिरंजीव आणि अनुभवी मंडळी होती कारण आम्ही पुण्याहून प्रथम आमच्या साडूंकडे उतरून मग सहार विमानतळावर गेल्याने आमच्या विरोधास न जुमानता त्यानी विमानतळावर आमच्या सोबत येण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि त्यामुळे मी आता अगदीच हलक्या मनाने निघत होतो कारण काही अडचण आलीच तर त्यांचा मदतीचा हात सदैव पुढे होताच̱.एअर इंडियाच्या विमानाची सहार विमानतळावरून सुटण्याची वेळ सकाळी ६-३० अशी दिसायला सोयिस्कर असली तरी त्याअगोदर तब्बल चार तास विमानतळावर हजर रहावे असा शिरस्ता असल्याने घरातून पहाटे दोन अडीच अशा अगदी अडनेड्या वेळेला निघावे लागते.त्यात लवकर उठण्यासाठी लावलेला गजर एकचा न लागता चुकुन १२ चाच लागल्यामुळे भलत्याच वेळी आम्ही उठून बसलो आणि त्यानंतर झोप येणे शक्य नव्हते,अर्थात अगोदरही फार झोप लागली होती अशातला भाग नव्हता.त्यामुळे विमानतळावर आम्ही पहाटे एक दीडलाच डोळे चोळत पोहोचलो.
यापूर्वी दोनदा या विमानतळावर सुजितला सोडण्यासाठी आलो होतो पण त्याचे लुफ्तान्साचे तिकिट असल्याने त्यावेळी वेगळ्या टर्मिनलवर गेलो होतो.त्यावेळी २ए आणि २बी अशी टर्मिनल्स होती. आता २सी हे नवे स्थानक झाले होते आणि त्यावरून केवळ एअर इंडियाच्याच विमानांचे उड्डाण होणार असल्याने अगोदरच आडवेळ असल्याने तेथे इतका शुकशुकाट होता,की त्या विमानतळावरूनच आपले विमानोड्डाण होणार आहे यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण केवळ अनुभवी मंडळी बरोबर होती म्हणूनच मी तग धरला.बाहेरच बऱ्याच ढकलगाड्या पडल्या होत्या त्यातीलच दोन आमच्याबरोबर आलेल्यानी आमच्या हातात सोपवून आमचे सामान त्यावर चढवून आता निघा अशी खूण केल्यावर कळले की आता खऱ्या अर्थाने आम्ही परदेशपर्यटनासाठी निघालो कारण यापुढे आम्हाला साथ देणारी मंडळी आत येऊ शकणार नव्हती.ती बाहेरूनच आम्हाला धीर देण्याचे काम करू लागली.येऊनजाऊन बाहेर ती उभी असल्याने जर तशीच काही अडचण आलीच तर किंवा बॅगेतील सामान काढावेच लागले तर परत घेऊन जाण्यासाठी ती तेथे असल्याने आमची पंचाईत होणार नव्हती.

वारी --१ तयारी - (बुध., १९/०९/२००७ - २१:०३)
(ज्यांची मुले परदेशात गेली आहेत वा जाऊन स्थायिक झाली आहेत अशाना परदेशगमन हे वारीसारखे नित्यकर्म होते. अशा वारीतील काही अनुभव
काशीस जावे नित्य वदावे असे जुन्या काळी म्हणजे ६०-७० वर्षापूर्वी (किंवा त्याहीपूर्वी)म्हटले जायचे.त्यावेळीच्या मध्यमवर्गीयांच हे स्वप्न असायच.त्यावेळच्या लोकांची स्वप्नही फारशी उच्च प्रतीची नसायची,त्यातले हे त्यामानाने बरेच वरच्या दर्जाचे ! इंग्रजांच्या काळात इतकी सुरक्षितता होती की काठीला सोने लावून खुशाल काशीयात्रा करून यावे असे त्या लोकांच म्हणण असल तरी इंग्रजान काठीला लावायला सोनच इतक कमी ठेवल होत की काठीला सोन बांधून काशीला जाऊ इच्छिणारा त्याअगोदर स्वर्गाचीच वाट धरायचा.
पण आता मात्र जो तो काशीलाच काय परदेशातच पळतोय.मात्र स्वतःच्या खर्चाने परदेशी जाण्यापेक्षा परदेशी कंपनीने किंवा आणखी कोणी आमंत्रित केले म्हणून आणि पेपरात फोटो वगैरे छापून येऊन परदेशी जाण्यातली ऐट काही वेगळीच! तसा स्वखर्चाने जाणाऱ्याना फोटोही स्वखर्चाने (जाहिरातीच्या दरात)छापून घेता येतो म्हणा ! सरकारी खर्चाने जाता येण्यासाठी तुम्ही मंत्री अगर किमान नगरसेवक तरी असावे लागते.मग स्वदेशात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीची पहाणी परदेशात करण्याच्या महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात तुमचा समावेश होऊ शकतो.
मी अभियांत्रिकी पदवीधर असलो तरी त्या काळात अभियंत्याना परदेशी पाठवणे भारतीय कंपन्याना कमीपणाचे (पेक्षा अनावश्यक आणि खर्चिक) वाटे, तरीही जी काही थोडीफार शक्यता असे तीही मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होऊन आपल्या वाट्याला येणार नाही याची काळजी घेतली होती. नाही म्हणायला तशी एक शिष्यवृत्ती होती. त्यात तंत्रशिक्षकाना (त्यावेळच्या) पश्चिम जर्मनीस पाठवण्यात येई. ती शिष्यवृत्ती घेऊन प्राध्यापक प. जर्मनीस जाऊन काय शिकून येत कोणास ठाऊक कारण या योजनेतून जाऊन येणाऱ्या प्राध्यापकानी तेथे काय शिकवण्यात आले याविषयी कधी एक चकार शब्द उच्चारल्याचे ऐकिवात नाही शिष्यवृत्ती देण्यापूर्वी अशी अटच तंत्रशिक्षण खात्याकडून घालण्यात येत असावी.याबाबतीत सर्वच सरकारी खात्याइतकेच किंवा जरा अधिकच हे खाते दक्ष ! ( त्यावेळी अण्णा हजारे यांचे माहितीच्या अधिकारासाठीचे उपोषण व्हायचे होते.) त्यामुळे शिक्षकाने आपली पात्रता वाढवू नये आणि एकाद्याने स्वत: च्या प्रयत्नाने वाढवलीच तर तिचा उपयोग तंत्रशिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तरी करू नये असा दंडकच त्या काळी होता. तरीही मी नुकताच नोकरीला लागल्यामुळे या सगळ्या खाचाखोचा मला माहीत नसल्यामुळे त्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यावर मी खरेच आपण प. जर्मनीला जाणार अशा गोड धुंदीत काही दिवस वावरलो त्यासाठी जर्मन शिकण्याचा उपद्याप पण केला.पण मंत्री नगरसेवक अशा महत्त्वाच्या व्यक्तीना महत्त्वाच्या कामासाठी परदेशात पाठवण्यातच सरकारच्या परदेशी चलनाची (अक्षरशः)वाट लागत असल्याने प्राध्यापकाना परदेशात पाठवून त्यांचा दर्जा वाढवण्याची चैन सरकारला परवडण्यासारखी नव्हती त्यामुळे माझा परदेश या शब्दाशी संबंध केवळ परदेश शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना लागणारी शिफारसपत्रे देण्यापुरताच काय तो राहिला पण माझ्या हातावर विधात्याने मारून ठेवलेली परदेशगमनाची रेखा अशी थोडीच वाया जाणार होती? त्यामुळे मुलगा परदेशी गेल्यामुळे का होईना आम्हालाही परदेशगमनाचा योग आलाच पण तो त्यानंतर जवळ जवळ ३५-३६ वर्षानी म्हणजे मी सेवानिवृत्त झाल्यावर !
आमचे चिरंजीव माझ्यासारखे " असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" म्हणून कोणी आपल्याला परदेशी पाठवील अशा भ्रमात न रहाणारे असल्यामुळे अभियांत्रिकी पदवी प्राप्त होताच आम्हाला पत्ताही लागू न देता त्याने खटपट करून एक दिवस आपण अमेरिकेत जाणार आहोत असे जाहीर केले.अर्थात मला जे जमले नाही ते त्याने जमवल्याचा आम्हाला आनंदच झाला. तो जाऊन दोन वर्षे झाल्यावर तो आता लवकर परत येत नाही अशी खात्री झाल्यावर मात्र एकदिवस आम्हाला जावे लागेल अशी आशा वाटू लागून पारपत्र म्हणजे पासपोर्ट मिळवण्याच्या मागे आम्ही लागायचे ठरवले.अशा बाबतीत चालढकल करण्यात मी पटाईत आहे. पण त्यावेळी मी औरंगाबादला होतो आणि तेथे पासपोर्ट ऑफिस नुकतेच निघाले होते आणि ही बातमी फारच कमी लोकाना माहीत होती इतकी की मी त्या ऑफीसमध्ये गेलो तेव्हा तेथे पासपोर्टसाठी फॉर्म मागायलासुद्धा माझ्याव्यतिरिक्त फक्त एकच गृहस्थ तेथे असलेल्या एकुलत्या एक खिडकीपाशी होता.त्यामुळे फार लांबलचक रांग आहे अशा छान कारणासाठी माझा पासपोर्ट काढण्याचा विचार रद्द करणे मला शक्य झाले नाही. या वेळी आम्हाला परदेशी पाठवण्याचा जणु चंगच दैवाने बांधला होता .
पारपत्रासाठी अर्ज करण्याचा विहित नमुना मिळाल्यावर तो घरी आणून त्यावर पुरेशी धूळ जमण्याची मी वाट पाहिलीच त्याशिवाय अर्जासोबत जोडावयास लागणाऱ्या एका प्रमाणपत्राची त्रुटी माझ्याकडे होती . म्हणजे आमच्या लग्नाचे प्रमाणपत्र माझ्याकडे नव्हते (.पूर्वी नवराबायकोचा एकमेकावर भरभ्क्कम विश्वास असल्यामुळे अशा प्रमाणपत्राची गरज पडत नसावी) आणि ते मिळवण्यासाठी पुन्हा लग्न करणे शक्य नव्हते.त्यासाठी एक शपथपत्र करून भागणार होते असे या गोष्टीचा अनुभव असणाऱ्या माझ्या मित्राने मला सांगितले पण त्यासाठी लागणाऱ्या स्टॅंपपेपरचा नेहमीप्रमाणे दुष्काळ होता.अर्थात मला चालढकल करायला आणखीच चांगले कारण मिळाले. तेवढ्यात माझ्या आणखी एका मित्राची मुलगी परदेशी गेलेली असल्याने तोही माझ्याशी या विषयावर बोलल्यावर आणि तो माझ्याहूनही चालढकलप्रवीण असताना त्याने पारपत्र काढलेसुद्धा हे ऐकल्यावर मात्र मी एकदम जागृत झालो पण त्याने माझ्यावर आणखी एक बोंबगोळा टाकला. त्याने सांगितले की आपण सरकारी सेवेत असताना पारपत्र काढायचे असल्यास संबंधित खात्याच्या प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र लागते.म्हणजे थोडक्यात माझ्या थोड्याफार झालेल्या मानसिक तयारीला खीळ घालण्याचे काम या बातमीने केले.त्यतल्यात्यात सुदैवाची गोष्ट एवढीच होती की असा अर्ज मला आमच्या महाविद्यालयाच्याच कार्यालयात देऊन तो पुढे तंत्रशिक्षण संचालकांकडे पाठवण्याची विनंती केली की भागणार होते आणि अशा लिखापढीत शिक्षकी पेशात असल्याने मी चांगलाच तयार असल्याने असा अर्ज कार्यालयात सादर करून माझे वाट पहाण्याचे व्रत मी इमाने इतबारे चालवले.तेवढ्या काळात लग्नाच्या प्रमाणपत्राविषयी हालचाल करावी असा मी मानसिक प्रयत्न करत होतो कारण शारीरिक हालचाल होण्यासाठी मनाची तयारी आवश्यक असते ना ! पण तेवढ्यात मला आठवले की फार पूर्वी सौभाग्यवतीस तिचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची इच्छा झाली असताना लग्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता पडली होती. त्यावेळी पाच रुपयाच्या स्टॅंपपेपरवर लग्न केल्याचे शपथपत्र तिला विद्यापीठात सादर करावे लागले होते. माझ्या वकील मित्रानेच तो स्टॅंपपेपर आणून मला कोर्टाची पायरी चढायला लावले होते. न्यायाधीशमहारांजांशी हस्तांदोलन करण्याचा अगाऊपणा माझ्या हातून घडत होता तो त्याने मोठ्या शिताफीने मध्ये पडून टाळला होता. त्या शपथ पत्राची प्रत विद्यापीठास तिने दिली होती अर्थात मूळ प्रत घरातच असण्याची शक्यता होती आणि या वेळी मात्र आमच्या दोघांच्याही व्यवस्थितपणामुळे ते शपथपत्र सापडायला मुळीच त्रास झाला नाही. मात्र हे पाच रुपयाचे प्रमाणपत्र चालते की नाही अशी शंका आम्हा दोघानाही वाटत होती कारण मला तद्विषयक सल्ला देणाऱ्या मित्राला त्यासाठी कमीतकमी वीस रुपयांचा तरी स्टॅंपपेपर लागतो असे सांगण्यात आले होते तरीही आता तरी तेच द्यायचे आणि बघू पुढे काय होते ते असा निर्णय आम्ही घेतला. आणि आम्ही चेंडू तंत्रशिक्षण संचालकांकडे टोलवल्यामुळे सध्यापुरतातरी तो विषय पार विसरून गेलो .
मला परदेशात जायची मुळीच घाई नाही हे आमच्या तंत्रशिक्षण कार्यालयासही समजल्यामुळे नेहमीची दफ्तरदिरंगाई न करता एक दिवस अगदी अलगदपणे ना हरकत प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात अवतीर्ण झाले. त्यानुसार मी परदेशात कुठल्याही प्रकारचे गैर वर्तन न करण्याच्या बोलीवर तसे प्रमाणपत्र मला देण्यात येत आहे असे लिहिले होते.मी बायकोसह जात आहे हे कळले असते तर त्यानी अशी शंकाही व्यक्त केली नसती अशी मला खात्री वाटते.
पारपत्र दाखल करण्यासाठी काही लोक मध्यस्थ वापरतात. हे मध्यस्थ अर्ज कार्यालयात दाखल करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा इतरांचा अनुभव आहे. आणि अजूनही औरंगाबादच्या पारपत्र कार्यालयास म्हणावी तशी ऊर्जितावस्था प्राप्त झालेली नसल्याने केवळ अर्ज दाखल करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी असे मला वाटले नाही.आता मात्र पारपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात कसलाच अडथळा न उरल्याने मला दोघांचे अर्ज दाखल करावे लागले. मला पारपत्र मिळण्याची मुळीच घाई नाही याची कुणकुण पारपत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कशी लागली देव जाणे आणि त्यामुळे या कामासाठी विलंब लावण्याचा त्यांचा उत्साहच नष्ट झाला असावा ! पण तरीही काही अडथळे शिल्लक होतेच, काऱण मी महाविद्यालयातून एक दिवस घरी आलो तेव्हा घरी पोलिस येऊन गेल्याची सुवार्ता सौ. ने माझ्या कानावर घातली . सुदैवाने त्यावेळपर्यंत दूरदर्शनवर मालिकांचा सुळसुळाट झाला नव्हता त्यामुळे त्या बातमीने माझ्या मनावर कसलीच उलटसुलट प्रतिक्रिया झाली नाही शिवाय मालिकेत अशा वेळी त्या भागाचा शेवट करून प्रेक्षकाना पुढील दिवसापर्यंत टांगून ठेवतात तसे काहीही न करता लगेचच तो पारपत्रासाठी पोलिस तपास करायला आला होता हेही तिने सांगून टाकले. अशा वेळी पोलिस कार्यालयात जाऊन त्यांची गाठ घेऊन योग्य ती दक्षिणा द्यायची असते असे शहाण्या माणसांनी सांगून ठेवले आहे.खर तर मला पारपत्र मिळायला कितीही उशीर झाला तरी हरकत नाही अशी माझ्या मनाची तयारी असल्याने त्या शहाण्या माणसांचा सल्ला पाळण्याचे मला कारण नव्हते. पण " होणारे न चुके जरि तया ब्रह्मा असे आडवा " असे म्हणतात ना ! त्यामुळे आमच्या पोलिस तपासातही काही अडचण राहिली नाही असेही सौ. ने मला सुनावले. त्याचे कारणही तसेच मजेदार होते.त्यावेळी औरंगाबादला असणारे पोलिस कमिशनर तिच्या नात्यात होते आणि ते एकदोनदा आमच्या घरी आल्याचे तपासणी करणाऱ्या पोलिसाने पाहिले होते ते तुमचे कोण एवढ्या प्रश्नाचे उत्तर आमची तपासणी विशिष्ट प्रकारे न करण्यास पुरेसे झाले. आणि खरोखरच एक दिवस रजिष्टर पोस्टाने आमचे दोघांचेही पासपोर्ट घरबसल्या आमच्या हातात पडले
पारपत्र जरी १९९९ च्या शेवटीशेवटी मिळाले तरी अमेरिकेला जाण्याचा योग मात्र तब्बल तीन साडेतीन वर्षानी म्हणजे २००२ च्या मे महिन्यात आला.खरे तर आता योग आणणे आमच्याच हातात होते पण मी नोकरी करीत असताना गेल्यास फार दिवस रहाता येणार नाही अशी शक्यता होती. असे घाईघाईने जाऊन येण्यात आता आम्हाला स्वारस्य नव्हते. जायचे तर आरामशीरपणे जाऊन यावयास हवे असे आम्हास वाटत होते. आणि त्याप्रमाणे मी सेवानिवृत्त झाल्यावर आता आम्हाला जाण्यास काही अडचण नाही या कल्पनेने चिरंजीवानी आम्हाला तिकिटे आणि यू.एस. भेटीचे निमंत्रणही पाठवून दिले असे निमंत्रण व्हिसा मिळण्यासाठी आवश्यक असते म्हणे.
त्यामुळे तिकिट मिळाल्यामुळे आता व्हिसा मिळवण्याच्या मागे लागणे आवश्यक होते.या बाबतीत आपण भारतीय जितके उदारहृदयी तितकेच हे अमेरिकन लोक संकुचित वृत्तीचे ! त्यामुळे अमेरिकन कॉन्सुलेटसमोर व्हिसा मिळवण्यासाठी उत्सुक भारतीयांच्या रांगा लागलेल्या असतात असा पूर्वी जाऊन आलेल्यांचा अनुभव होता.त्यांनी सांगितलेल्या हकीकतींवरून त्यासाठी अर्ज भरून दिल्यावर महिन्यादोनमहिन्यानी मुलाखतीला बोलावतात ,तेथे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या प्रश्नाच्या फैरीला तोंड द्यावे लागते.ते काय विचारतील याचा नेम नाही, अमेरिकेला कशाला जाताय , कुणाकडे जाताय,तिथे जाऊन काय करणार,तेथे तुमचा खर्च कोण करणार एक ना दोन अरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात.आमच्याकडे पहा बरे कसे आवजाव घर तुम्हारा.कोण आल कोण गेल याकडे लक्ष देण्याचा आगाऊपणा आम्ही करतो तरी का? मुळीच नाही.काही दिवस त्यांना घुसखोर म्हटले तरी नंतर तेच आमच्यावर दादागिरी करू लागतात. बरेचदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकही आमच्याकडे येऊन गेल्यावर मग आम्हास जाग येते आणि त्यानंतर त्यांचा पाहुणचार करायचा राहिला ही रुखरुख दूर करण्यासाठी त्यांना आपल्याकडे पाठवावे म्हणून पोर्तुगाल,पाकिस्तान अशा मित्रांची विनवणी करावी लागते. आपली ही सहिष्णुतेची ऐतिहासिक परंपरा कोठे आणि हे अमेरिकन लोक म्हणजे असहिष्णुतेचा कळस. बोटाचे ठसे काय , समोरून बाजूनी फोटो काय काही विचारू नका?जॉर्ज फर्नंडिससारखे लढाऊ व्यक्तिमत्वसुद्धा यांच्या तडाक्यातून सुटले नाही तेथे आमच्यासारख्यांची काय कथा !त्यातून ९/११ नंतर मामला अधिकच कडक झालेला.
मुलाखतीला गेलेल्या एका मित्राने मुलीच्या बाळंतपणासाठी जातो असे सांगण्याचा त्याच्यामते चतुरपणा केला तर त्यासाठी तुम्हाला जायच कारण नाही आमच्या देशात हॉस्पिटलात सगळ व्यवस्थित करतात असे सांगून त्याला माघारी पाठवण्यात आले तर दुसऱ्या एका असाच चतुरपणा करणाऱ्या मित्राच्या बायकोला तुम्ही एकट्या मॅनेज करू शकाल का असे विचारून तिला एकटीलाच व्हिसा देऊन मुलीच्या बापाला हात चोळत गप्प बसवले.आमच्या एका स्नेह्याच्या भावी जावयाच्या अडचणीमुळे त्यानी मुलीला वेगळ्या पद्धतीने व्हिसा मिळवून देऊन अमेरिकेत पाठवले आणि लग्न अमेरिकेत करण्याचा घाट घातला तर आता तिच्या आईबापानाच व्हिसा मिळून लग्नास हजर रहाता येईल की नाही अशी पंचाईत निर्माण झाली आहे अशा व्हिसाविषयक कहाण्या ऐकून आपल्याला व्हिसा न मिळाल्यामुळे आपले पोराने पाठवलेले तिकिट रद्द करावे लागते की काय अशी भीती मला पडली. पण या सर्व संकटांना तोंड देऊन जाण्याचा प्रयत्नही मी कदाचित करणार नाही या शंकेने बुशमहाराजांनी प्रसन्न होऊन त्याच सुमारास एक नवी योजना अमलात आणण्याचा सुविचार केला होता.
आमच्याचबरोबर आमचे आणखी एक मित्रही त्यांच्या मुलाच्या अडचणीवर मात करण्यासाठी अमेरिकेला प्रथमच निघाले होते. म्हणजे आमच्या वयाचे पालक अमेरिकेतील मुलांकडे जातात ते आपल्या सुनेच्या अथवा मुलीच्या प्रसूतीसाठी म्हणजे ड्यूटीवर आणि आमच्यासारखे जाणारे म्हणजे सुट्टीवर जाणारे अशी वर्गवारी करण्यात येते त्यामध्ये ते ड्यूटीवर जाणार होते अर्थात त्यांचे जाणे अधिक महत्त्वाचे होते त्यामुळे जोडीदार म्हणून त्यांना बरोबर घेऊन जावे असा विचार मी केला आणि एका सुप्रभाती आम्ही दोघे पुण्यातील व्हिसाऑफिसला गेलो. अर्थात तोपर्यंत बुशमहाराजांचे हृदयपरिवर्तन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोचली नसल्याने आम्ही आपले आपल्याला मुलाखतीला बोलावल्यास मराठीत बोलायचे की इंग्लिशमध्ये बोलायचे याविषयीच चर्चा करत होतो कारण अमेरिकन इंग्लिश उच्चार आम्हाला कळणार नाहीत तेवढेच आमचे फर्डा इंग्रजी त्यांना समजणार नाही (कारण दोघेही प्राध्यापक)अशी दुहेरी खात्री आम्हाला होती त्यामुळे हा प्रश्न दुभाषाची मदत घेऊन सोडवायचा निर्णय आम्ही करत होतो.व्हिसा ऑफिसच्या पायऱ्या चढण्यापूर्वी एक सुटाबुटातील व्यक्ती हातात बॅग घेऊन उभी होती. त्यामुळे तिला पहाताच आम्ही आपले त्या इमारतीत व्हिसासाठी आवेदनपत्र कोठे मिळेल याची चौकशी केली आणि अहो आश्चर्यम् जणु आमचीच वाट पहात असल्यासारखी त्या व्यक्तीने आपल्या बॅगेतून सरळ व्हिसासाठी लागणारे आवेदनपत्रांचे नमुनेच काढून दिले आणि त्यानंतर जी बातमी सांगितली त्यामुळे आम्हाला आनंदाने वेडच लागायचे राहिले कारण त्याच वर्षी बुशसाहेबानी कृपावंत होऊन पेटी परवाना पद्धत (ड्रॉप बॉक्स )ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली होती.त्यानुसार पुण्यातील नागरिकांना पुण्यातील कॉन्सुलेटच्या ऑफिसमध्ये अर्ज सर्व प्रमाणपत्रांसह आणि आवश्यक शुल्काच्या धनादेशासह दाखल केल्यावर तसे प्रमाणपत्र मिळेल, आणि चार पाच दिवसात तुमच्या घरच्या पत्त्यावर कोरियरने व्हिसाच येईल,ते प्रमाणपत्र दाखवल्याव्वर ते तुमच्या हाती पडतील असे सांगण्यात आले आणि अत्यानंदाने ते आवेदनपत्राचे नमुने घेऊन आम्ही घरी परतलो. ते भरून त्यासोबत योग्य रकमेचा धनादेश मिळवण्यासाठी मी जवळची आणि आपली म्हणून महाबँकेत गेलो तर त्यानी तुम्ही बँकेचे खातेदार आहात का अशी सुरवात केल्यावर कदाचित व्हिसा ऑफिसपेक्षाही इथले लोक अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे असे वाटून मी दुसऱ्या पण जवळच्याच बँकेतून ड्राफ्ट काढला आणि दुसऱ्याच दिवशी सर्व कागदपत्रांसह सौभाग्यवतीलाही घेऊन व्हिसा ऑफिसला गेलो तिला मुलाखतीसाठी नाही तरी निदान ऑफिस कसले आहे हे कळावे आणि मला जरा नैतिक धैर्य प्राप्त व्हावे म्हणून ! आम्हाला कसलेच प्रश्न न विचारता आमचे कागदपत्र खिडकीतील गोऱ्या महिलेने घेतले आणि तपासून आम्हाला तशा अर्थाची पावती दिली.आणि चार दिवसानी घरच्या पत्त्यावर व्हिसा येईल ही पावती देऊन ते ताब्यात घ्या असे तिने सांगितल्यावर मोठ्या धाडसाने मी मग आम्हाला दहा वर्षाचा व्हिसा मिळेल का असा प्रश्न विचारल्यावर तिने हे मुंबईच्या ऑफिसमधील लोक ठरवतील असे सांगून आमची बोळवण केली चार दिवस जीव टांगणीला लागल्यावर अखेर पाचव्या दिवशी खरोखरच कूरियरने दोघांचे व्हिसा (की व्हिसे ?) आले आणि अहो आश्चर्यम् ! आम्हाला चक्क दहा वर्षाचा अनेकप्रवेशी ( मल्टिपल एंट्री ) व्हिसा मंजूर होऊन आला होता.

Subscribe to:
Posts (Atom)